डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा पाकिस्तानसाठी अत्यंत मह्त्वाचा

 


डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण ५ डिसेंबर रोजी पाकिस्तनाल त्यांच्या कर्जाच्या १ अब्ज अमेरिकी डॉलर चा हप्ता द्यावा लागणार आहे . त्यानंतर पाकिस्तानकडे फक्त ६ अब्ज अमेरिकी डॉलर शिल्लक राहणार आहे  या ६ अब्ज अमेरिकी डॉलर्सपैकी बहुसंख्य रक्कम हि सौदी अरेबिया  . युनाटेड अरब अमिरात ,चीन या देशानी पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत गुंतवलेले पैसे आहेत पाकिस्तानला ते वापरता येणे अवघड आहे पाकिस्तानला नैसर्गिक इंधनाबाबत मोठ्या प्रमाणात परकीय खर्च करावा लागतो पाकिस्तानची आर्थिक स्थिती बघता पहिले इंधन घेणे मग त्याचे पैसे देणे हे जगातील अनेक देशांना मिळणारी सवलत पाकिस्तानला मिळणे अशक्य आहे . या आर्थिक अडचणीमुळे पाकिस्तान श्रीलंकेप्रमाणे आर्थिक दिवाळखोर होण्याचा धोका निर्माण झाला आहे . पाकिस्तान दिवाळखोर होतो का हे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरवातीच्या दिवसात स्पष्ट होईल श्रीलंका आर्थिक दिवाळखोर झाला तेव्हा देशात राजकीय अस्थिरता नव्हती पाकिस्तानच्या नशिबी हे सुख देखील नाहीये आज पाकिस्तानात मोठ्या प्रमाणात राजकीय अस्थिरता आहे एप्रिल २०२२ पर्यंत देशाच्या पंतप्रधानपदी असणारे जे सध्या पाकिस्तानच्या प्रमुख विरोधी पक्षनेते आहेत असे  इम्रान खान यांनी त्यांच्या आंदोलनामुळे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणत अस्थिरता आहे 

 इम्रान खान यांच्या आंदोलनादरम्यान इम्रान खान यांनी २६ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानी पंजाब आणि खैबर ए पख्तुन्वा ( पूर्वीचे नाव वायव्य सरहद प्रांत )या प्रांतातील विधानसभा (पाकिस्तानी शासनव्यस्थेचे  नाव सुभा ए असेम्ब्ली ) विसर्जित करून त्या ठिकाणी नव्याने निवडणुका घेण्याची घोषणा केली . पाकिस्तनच्या संविधानानुसार (एकहत्तर  का आईनं ) नुसार प्रांतीय विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना मुख्यमंत्र्यांवर अविस्वासाचा प्रस्ताव दाखल करता येत नाही सध्या पाकिस्तानी पंजाब आणि   खैबर ए पख्तुन्वा या दोन्ही विधानसभेचे अधिवेशन सुरु आहे ते कितीही दिवस चालू ठेवायचं याचा निर्णय त्या विधानसभेचे अध्यक्ष घेत असतात जे इम्रान खान यांच्या पक्षाचेच आहेत त्यामुळे विरोधकांना आपला मुख्यमंत्री आणता येणे अवघड आहे त्यामुळे डिसेंबरच्या तीन ते चार तारखेपर्यंत पाकिस्तानी पंजाब आणि   खैबर ए पख्तुन्वाच्या मुखमंत्री आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी विधानसभा रद्द करण्याची मागणी केल्यास ती मागणी रद्द करणे तेथील राज्यपालांना मान्य करावीच लागेल त्यामुळे तिथे ९० दिवसात निवडणूक घ्याव्याच लागतील पाकिस्तानमध्ये असणाऱ्या चारही विधानसभेच्या (पाकिस्तानी पंजाब,   खैबर ए पख्तुन्वा, बलुचिस्तान आणि सिंध ) एकूण जागा ८२८ आहेत त्यातील पंजाब आणि  खैबर ए पख्तुन्वा यांच्या एकूण जागा ५६८ सुमार  होतात  त्यामुळे सुमारे ६६ % टक्क्याहून अधिक जागांवर निवडणुका होत असल्याने पाकिस्तानमध्ये सर्व जागांसाठी निवडणूक घेणे सरकारला भाग पडेल असे बोल न्यूज या वृत्तवाहिनी च्या बातमीत सांगण्यात आले आहे इम्रान खान यांच्या आंदोलनाची हीच प्रमुख मागणी असल्याने हा इम्रान खान यांच्या मास्तर स्ट्रोक असल्याचे सांगण्यात या बातमीत पुढे सांगितले आहे पाकिस्तानची आर्थिक स्थिती वाईट असताना तेथील राजकारण मोठ्या वाईट स्थितीवर पोहोचल्याने त्याचा अधिकच वाईट परिणाम पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीवर झाला आहे 

     हिंदू पुराणामध्ये महिषासुर आणि देवी यांच्या युद्धाचे वर्णन करताना महिषासूरचे रक्त जमिनीवर पडताच त्यातून पुन्हा राक्षस तयार होऊन तो देवीशी युद्ध करायला लागे असे वर्णन आहे आपल्या भारताच्या संदर्भात सध्या पाकिस्तान हा महिषासुरासारखा आहे त्याचे जितके तुकडे पडतील त्या प्रत्येक तुकड्यातुन दहशतवादी तयार होऊन ते भारताशी युद्ध करायला लागतील समजा चार तुकडे झाले तर चार वेगवेगळे दहशतवादी देश भारताशी युद्ध करायला लागतील त्यामुळे पाकिस्तान अखंड राहण्यातच भारताचे हित आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?