शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजे काय ?


येत्या २०२३ वर्षात शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन  या आर्थिक संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे येणार आहे   जगातील सर्वात मोठे  पादेशिक संघटन म्हणून शांघाय कॉ ऑपरेशन ओळखले जाते या समुदायाचे अध्यक्षपद एका वर्षासाठी भारताकडे येणार आहे ज्यामुळे भारताचा व्यापार वाढण्यासाठी मोठ्या प्रमाणत मदत होईल त्यामुळे सध्याच्या जगातील मंदीसदृश्य वातवरणात भारतीय अर्थव्यवस्थेला काहीशी उर्जितावस्था प्राप्त होईल ज्याचा  अंतिमतः फायदा आपल्यास होत असल्याने आपणास या समुदायाची माहिती असणे ,एक जागरूक नागरिक म्हणून असणे आवश्यक आहे चला तर जाणून घेउया शांघाय को ऑपरेशन म्हणजे काय ? 

 या संघटनेत  चीन रशिया कझागिस्तान उझबेकिस्तान किर्गिस्तान ताजिकीस्तान रशिया भारत पाकिस्तान  हे देश पूर्णवेळ सदस्य आहे तर आर्मेनिया नेपाळ श्रीलंका अझरबैजान कंबोडिया हे निरीक्षक आहेत युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाचा भाग असणारा मध्य आशियातील तुर्कमेनिस्तान हा देश याचा सदस्य देश नाहीये तुर्कमेनिस्तान या देशाचा अपवाद वगळता मध्य आशियातील चारही  यू. एस. एसआर चा भाग असणारी इस्लामी राष्टे  या संघटनेची सदस्य राष्ट्रे आहेत . सुमारे तीन वर्षांपूर्वीच्या यू. पी. एस. सी. च्या परीक्षेत कोणता मध्य 

आशियातील देश शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशनचा सदस्य देश नाही ? असा प्रश्न आला होता यू पी एस. सी च्या परीक्षेत प्रश्न रिपीट होत नसले तरी एम पी एस सी च्या परीक्षेत प्रश्न रिपीट होऊ शकतात त्या पार्श्वभूमीवर एम पी एस सी च्या विद्यार्थ्यांनी यावर अधिक भर देणे आवश्यक आहे

या समुदयाचे व्यापक स्वरूपातील कार्य जरी २००१ पासून सुरु झालेले असले तरी चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान या देशांनी १९९६ एप्रिल २६ रोजी चीनच्या शांघाय या शहारत या देशांच्या प्रमुखांनी शांघायमधील सीमावर्ती क्षेत्रांमध्ये लष्करी विश्वास निर्माण करण्याच्या करारावर स्वाक्षरी करून शांघाय फाइव्ह गट तयार केला गेला.24 एप्रिल 1997 रोजी त्याच देशांनी रशियातील  मॉस्को,  येथे झालेल्या बैठकीत सीमावर्ती भागात लष्करी दल कमी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.] 20 मे 1997 रोजी रशियाचे अध्यक्ष बोरिस येल्त्सिन आणि चीनचे अध्यक्ष जियांग झेमिन यांनी "बहुध्रुवीय जग" या घोषणेवर स्वाक्षरी केली रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, कझाकचे अध्यक्ष नुरसुलतान नजरबायेव, चीनचे अध्यक्ष जियांग झेमिन, किर्गिझचे राष्ट्राध्यक्ष अस्कर अकायेव आणि ताजिकचे अध्यक्ष इमोमाली रहमोन, एकेकाळी शांघाय फाइव्हचे नेते होते.

शांघाय फाइव्ह गटाची त्यानंतरची वार्षिक परिषद 1998 मध्ये कझाकस्तानमधील अल्माटी येथे, 1999 मध्ये  किर्गिस्तान देशातील बिश्केक,  येथे  आणि 2000 मध्ये ताजिकिस्तान देशातील दुशान्बे,  येथे झाली. दुशान्बे शिखर परिषदेत सदस्यांनी "इतर देशांच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यास विरोध करण्यास सहमती दर्शवली. 'मानवतावाद' आणि 'मानवी हक्कांचे रक्षण' या बहाण्या; आणि पाच देशांचे राष्ट्रीय स्वातंत्र्य, सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि सामाजिक स्थैर्याचे रक्षण करण्यासाठी एकमेकांच्या प्रयत्नांना पाठिंबा

देण्याचे ठरवले  2001 मध्ये, वार्षिक शिखर परिषद  परत शांघायला झाली  तेथे पाच सदस्य राष्ट्रांनी प्रथम उझबेकिस्तानला शांघाय फाइव्ह यंत्रणेत प्रवेश दिला (अशा प्रकारे त्याचे शांघाय सिक्समध्ये रूपांतर झाले). त्यानंतर सर्व सहा राष्ट्रप्रमुखांनी 15 जून 2001 रोजी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या घोषणेवर स्वाक्षरी केली, ज्यामुळे शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन हि संघटना अधिकृत रित्या स्थापन झाली जून 2002 मध्ये, SCO सदस्य देशांच्या प्रमुखांची रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे बैठक झाली. तेथे त्यांनी एससीओ चार्टरवर स्वाक्षरी केली ज्यामध्ये संस्थेचे उद्दिष्टे, तत्त्वे, संरचना आणि ऑपरेशनचे स्वरूप स्पष्ट केले गेले

२००५ च्या जुलै महिन्यात  कझाकस्तान देशातील अस्ताना, शहरात झालेल्या शिखर परिषदेत, भारत, इराण, मंगोलिया आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींनी प्रथमच SCO शिखर परिषदेत भाग घेतला होता भारत या संघटनेच्या निरीक्षक म्हणून २००५ पासून काम करत होता तर सन २०१७ पासून या संघटनेच्या भारत पाकिस्तानसह पूर्णवेळ सदस्य झाला मागच्या वर्षी २०२१ साली  इराण या संघटनेचाअर्धवेळ निरीक्षक सदस्य झाला जो पुढील वर्षी भारत या संघटनेचा अध्यक्ष असताना पूर्णवेळ सदस्य होणार आहे या संघटनेतील चीन पाकिस्तान या जोडगोळीतील भारत विरोधी कारवाया रोखण्यस्साठी भारताला इराण इराण हा महत्त्वाचा साथीदार ठरू शकतो या संघटनेच्या नावात शांघाय असले तरी याचे मुख्यालय चीनची राजधानी बीजिंग शहरात आहे पाकिस्तानला आपण मुस्लिम बांधवांचा देश म्हणत असलो तरी पाकिस्तानचा  अधिकृत धर्म हा सुन्नी इस्लाम आहे तर इराणचा अधिकृत धर्म हा शिया इस्लाम आहे शिया आणि सुन्नी या फरकासह अन्य काही मुद्यांवर पाकिस्तान आणि इराण यांचे तीव्र मतभेत आहेत सध्या भारत याच इराणच्या मदतीने मध्य आशियातील देशांशी आणि अफगाणिस्तानशी वायपर करतो त्या पार्श्वभूमीवर भारत अध्यक्ष असताना इराणचा समावेश या संघटनेत होणे खूपच आनंदायक आहे

जागतिक आर्थिक स्थिती डळमळीत असताना त्याचा वाईट परिणाम होण्यास हे अध्यक्षपद साह्य करेल असा विश्वास  व्यक्त करण्यात येत आहे ती खरोखरीच फलद्रुप होईल अशी अशा बाळगूया

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?