जी २० म्हणजे काय रे भाऊ ?

   


   १६ नोव्हेंबर नंतरचे पुढील एक वर्ष भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे कारण १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी इंडोनेशिया येथील बाली शहरात जी २० या समूहाचे १७ वे अधिवेशन झाल्यावर जी २० चे अध्यक्षपद भारताला मिळणार आहे .  जगतातील प्रमुख १९ देशांचा आणि युरोपीय युनियन समूह असणारा जी २० हा समूह जगातील एक प्रमुख आर्थिक गट आहे  या अश्या समूहाचे अध्यक्षपद भारताला मिळत असल्याने या समूहाविषयी एक जागरूक नागरिक म्हणून आपणस माहिती असणे आवश्यक आहे चला तर जाणून घेऊया जी २० या समुहा विषयी

.       जी २० मध्ये सहभागी असणाऱ्या देशांच्या जीडीपीच्या विचार करता या सर्व देशांचा जीडीपी एकत्रितरित्या जगाच्या एकत्रित जीडीपीच्या ८८ % आहे जगाच्या एकूण व्यापाराच्या ७७ % व्यापार या समूहाच्या देशातील आहे  जगातील एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकसंख्या या देशात राहते तर जगाच्या एकूण जमिनीच्या एकूण जमिनीच्या क्षेत्रफळापैकी जवळपास ५० % या देशांनी व्यापलेला आहे त्यामुळे जगातील हा समूह आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आह जगात २१० देश आहेत त्यातील  १९ देश आणि एका संघटनेचा समूह म्हणून याकडे दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही १९९९ मध्ये अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांसाठी एक बैठक म्हणून सुरुवात करून, G२० राज्य आणि सरकार प्रमुखांचा समावेश असलेल्या वार्षिक शिखर परिषदेत विकसित झाला आहे. त्या व्यतिरिक्त, शेर्पा बैठका (नेत्यांमध्ये वाटाघाटी आणि एकमत निर्माण करण्याचे प्रभारी), कार्य गट आणि विशेष कार्यक्रम देखील वर्षभर आयोजित केले जातात.त्यातील प्रमुख कार्यक्रम म्हणजे यात सहभागी देशाच्या सरकारी प्रमुखांची बैठक होय जी येत्या १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी बाली शहरात होणार आहे त्यांनतर या समूहाचे

अध्यक्षपद  वर्षभरासाठी भारताकडे येईल जी २० च्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार G२०  हे जगातील प्रमुख विकसित आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना जोडणारे धोरणात्मक बहुपक्षीय व्यासपीठ आहे. भविष्यातील जागतिक आर्थिक वाढ आणि समृद्धी सुरक्षित करण्यासाठी कार्य करणे ही G२० ची धोरणात्मक भूमिका आहे.

जी २० या समूहाची स्थापना १९९९ सप्टेंबर  २६ रोजी करण्यात आली   या संघटनेची स्थापना १९९०च्या दशकात  दक्षिण पूर्व आशिया  आणि दक्षिण आशिया खंडात आलेल्या आर्थिक संकटाची पुनरावर्ती होऊ नये या उद्देश्याने त्या मुळे करण्यात आली या संघटनेत ऊत्तर अमेरिका खंडातील कॅनडा , अमेरिका मेक्सिको , दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझील अर्जेंटिना युरोप खंडातील युके , फ्रांस , जर्मनी रशिया  , आशिया खंडातील भारत , जपान चीन सौदी अरेबिया , दक्षिण कोरिया , इंडोनेशिया , जपान तुर्कीये ( पूर्वीचे नाव तुर्की )आफ्रिका खंडातील दक्षिण

आफ्रिका आणि ऑस्टेलिया हे देश तर युरोपीय युनियन हि संघटना आदी सदस्य आहेत या संघटनेची अध्यक्षीय कार्यवाही  troika.या गटातर्फे करण्यात येते या गटात मागील वर्षी अध्यक्ष असणारा देश या वर्षी अध्यक्ष असणारा देश तसेच पुढील वर्षी अध्यक्ष असणारा देश या तीन देशांचा समावेश होतो भारत अध्यक्षपदी असताना  troika. या गटात भारताबरोबर इंडोनेशिया आणि ब्राझील हे दोन देश असणार आहेत भारतने आपला अध्यक्षपदाचा अधिकार वापरत बांगलादेश युनाटेड अरब अमिरात . सिंगापूर स्पेन इजिप्त ,ओमान , मॉरिशियस , नेदरलँड आणि नायजेरिया या देशांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे त्यामुळे या देशांशी भारताचे विशेष व्यापारी संबंध प्रस्थापित होतील   त्यामुळे हे अध्युक्षपद भारताला अत्यंत महत्त्वाचे आहे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?