८ नोव्हेंबर आहे खास !

     


  मंगळवार ८ नोव्हेंबर विज्ञानप्रेमींसाठी अत्यंत खास असणार आहे . कारण या दिवशी दोन खगोलीय घटनांची  पर्वणी विज्ञान प्रेमींना मिळवणार आहे त्यातील चंदग्रहणाविषयी आपणास माहिती असेलच . दुसऱ्या एका घटनेविषयी फारच कमी बोलले जात आहे मात्र दुसरी घटना अत्यंत दुर्मिळ आहे . सुमारे ४० ते ४२ वर्षातून ही घटना एकदाच घडते .  मानवी आयुष्य १०० वर्षांचे मानल्यास हि घटना आयुष्यात दोनदाच दिसू शकते  या उलट ग्रहणाचा विचार करता सूर्य आणि चंद्र  ग्रहणाचा विचार करता वर्षभभरात एकत्रितपणे पाच  ते सहा  ग्रहणे जगभरात अनुभवायास येतात म्हणजेच आपण समजू शकतो ग्रहण सोडून होणारी दुसरी घटना किती दुर्मिळ आहे 

           तर ही दुर्मिळ घटना आहे युरेनस आणि चंद्र या ग्रहांची युती . यावेळी आपणास चंद्रबिंब युरेनस ग्रहावरून जात्ताना दिसेल ८ नोव्हेंबरला मध्यरात्री ११ वाजता ते ९ नोव्हेंबरला पहाटे २ पर्यंत हा चमत्कार बघण्याच्या सर्वोत्तम कालावधी आहे या तीन तासात जे  आपण जे अनुभववू ते खरोखरीच अदभूत असेल हे नक्की .  मात्र युरेनस ग्रह हा मानवी डोळ्यांना  दिसत नाही फक्त दुर्बिणीतूनच तो दिसू शकतो . त्यामुळे हा श्रुष्टि चमत्कार बघण्यासाठी तुमच्यकडे दुर्बीण असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे दुर्बीण असेल तर या दुर्मिळ खगोलीय घटनेचा आनंद आपण लुटू शकाल . या वेळी सूर्य पृथ्वी आणि युरेनस यातील यातली अंतर सर्वात कमी असेल कोणत्याही ग्रहाचे


सर्वोत्तम  दर्शन करण्यासाठी तो आपल्या पृथ्वीच्या जेव्हढा जवळ असेल तितके उत्तम असते त्यामुळे ८ नोव्हेंबर हा दिवस युरेनसचे अवलोकन करण्यासाठी सर्वात ऊत्तम दिवस असेल हे नक्की 

   चंद्रग्रहण हा चमत्कार आपल्या भारतात पूर्णपणे दिसणार नाहीये .पृथ्वीच्या  सावलीत शिरताना चंद्र आपणास दिसणार नाही आपल्या भारतात चंद्र.पृथ्वीच्या सावलीत शिरल्यावर चंद्रोदय होत असल्याने हे होत आहे मात्र युरेनस आणि चांद यांच्या युतीबाबत अशी गोष्ट नाहीये हि घटना सुरवातीपासून आपणास बघता येणार आहे . सध्या दक्षिणायन सुरु असल्याने आपणस चंद्रबिंब काहिस्या दक्षिणेला दिसेल अर्थात पौर्णिमा नुकतीच संपल्याने (८ नोव्हेंबर सायंकाळी सव्वापाच ) असल्याने आकाश्यात चंद्रबिंब सहजतेने दिसेल मात्र निरीक्षण करणाऱ्यांस झाड वगैरेचा अढथळा येऊ नये म्हणून हि एक सूचना 

ग्रहणंच नव्हे कोणताही खगोलीय अविष्कार बघण्यात काहीही अशुभ नाही पूर्वी खगोलशात्र फारसे प्रगत नसल्याने अज्ञानातून या समजुती होत्या मी स्वतः गेल्या कित्येक वर्षांपासून माझ्या राशीला ग्रहण अशुभ असल्याचे सांगून देखील सर्व ग्रहणाचा आनंद घेतला आहे माझेर काहीही वाकडे अशुभ झालेले नाही आपण देखील सर्व खगोलीय अविष्कार बघा युरेनस आणि चंद्र यांची युती बघणे अवघड असले तरी त्याच दिवशी होणारे चंद्र ग्रहण आणि याच  आठवड्यात शनिवार १२ नोव्हेंबर रोजी होणारी चंद्र आणि मंगळ युती नक्कीच बघा मंगळ हा ग्रह मानवी डोळ्यांना सहजतेने दिसत असल्याने हा खगोलीय चमत्कार आपण सहजतेने बघू शकतो .मग बघणार ना खगोल चमत्कार . 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?