भारत आणि आग्नेय आशियातील संबंधाची नवी पहाट

         


     भारताच्या ईशान्य भारतातील राज्याकडून नकाश्यात  पूर्वेकडे नजर फिरवायला सुरवात केल्यावर आपणास ऑस्टेलियायापर्यंत १० वेगवेगळे देश दिसतात भारतीय संस्कृती आणि चिनी संस्कृतीचा मिलाफ असणाऱ्या या देशाच्या भूभागाला इंडोचायना असे एकत्रित रित्या संबोधले जाते . सध्या जगाचा राजकारणाचा बिंदू ज्या इंडो पॅसिफिक भागात स्थिर झाला आहे  त्या भूभागातील बराच मोठा भूभाग या देशांनी व्यापला आहे . त्या देशांनी विविध कारणांनी स्थापन केलेल्या अशियन संघटनेचा भारत हा प्रमुख निरीक्षक देश आहे  भारताचे परसदार म्हणून ओळखले जाणाऱ्या या देशांशी भारताचे पूर्वीपासून घनिष्ट संबंध आहेत . तिथे अनेक हिंदू देवतांची मंदिरे आहेत भारत देखील हे संबंध अधिक दृढ व्हावे यासाठी नेहमीच या देशांशी विविध प्रकारे राजनैतिक संबंध ठेवत आला आहे  .     

             याच मालिकेचा भाग म्हणून ११ ते १३ नोव्हेंबर या तीन दिवसात भारताचे उपराष्ट्रपती जयदीप धनखरं  अशियन -भारत Commemorative परिषद आणि 17 व्या  पूर्व आशिया शिखर परिषदेसठी कंबोडिया या देशात जाणार आहेत .यावेळी त्यांच्याबरोबर भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर असतील  कंबोडिया सध्या अशियन परिषदेची अध्यक्षता करत असल्याने उराष्ट्रपती जयदीप धनखरं आणि परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर हे कंबोडियास भेट देत आहेत यावेळी ते 12 नोव्हेंबर 2022 रोजी नोम पेन्ह येथे आसियान-भारतCommemorative   परिषदेला उपस्थित राहतील. या वर्षी आसियान-भारत संबंधांचा 30 वा वर्धापन दिन आहे त्यानिमित्याने  हे वर्ष आसियान-भारत मैत्री वर्ष म्हणून साजरे केले जात आहे.13 नोव्हेंबर 2022 रोजी, उपराष्ट्रपती 17 व्या पूर्व आशिया शिखर परिषदेत सहभागी होतील ज्यात अशियन देशांचा   तसेच भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया  ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका आणि रशिया.या आठ सहभागी देशांचा समावेश आहे या परिषदेदरम्यान उपराष्ट्रपती आणि पररराष्ट्रमंत्री या देशांशी विविध करार करतील नोम पेन्हहून परतताना, उपराष्ट्रपती, कंबोडियन वारसा स्थळांच्या जतन आणि जीर्णोद्धाराच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सिएम रीपलाही भेट देतील.

     भारताप्रमाणेच या सर्व देशांना चीनकडून मोठा धोका वाटतो यातील अनेक देशांशी चीनचे सीमेबाबतचे विवाद आहेत .काही महिन्यापूर्वीच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथसिंग यांनी या संघटनेच्या काही देशांबरोबर संरक्षण साहित्याचा खरेदीबाबत मोठे करार देखील केले आहेत स्वस्तात जागतिकपर्यंत करण्याच्या हेतूने सुद्धा अनेक भारतीय या प्रदेशास वर्षभर भेट देत असतात . भारताबरोबर हे सर्व देश सुद्धा वसाहतवादाचे शिकार झाले होते .

लेखाच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे जगाचा राजकारणाचा बिंदू या देशांच्या प्रदेशात स्थिरावतो आहे आंतराष्ट्रीय व्यापारातील  मोठी मालवाहतूक या प्रदेशातून होते . माजी पंतप्रधान पी नरसीव राव यांच्या कार्यकाळात सुरु झालेल्या लुक ईस्ट पॉलिसीच्या यशस्वीतेसासाठी या  देशांची मोलाची भूमिका  आहे  या प्रदेशातील देश एकेकाळी जागतिक अर्थव्यस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजवात होते त्याकाळी या देशांचा उल्लेख अशियन टायगर असा केला जात असे मात्र काही आर्थिक संकटामुळे त्यांच्या अर्थव्यवस्था पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे क्षणाधार्त कोसळल्या . भारत हि उभारती जगातील महासत्ता आहे त्या देशांना विकासाच्या मूळ प्रवाहात येण्यासासाठी भारताचा मोठ्या प्रमाणत फायदा होणार आहे त्या पार्श्वभूमीवर आपण या परिषदेकडे बघायला हवे . 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?