हत्तीने गाढवाला पूर्णतः लोळवले

 


      ८ नोव्हेंबर २०२२ रोजी अमेरिकेत काँग्रेसच्या अर्थात तेथील संसदेच्या निवडणुका झाल्या . काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांसाठी झालेल्या या निवडणुकीचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास हत्तीने  गाढवाला पूर्णतः लोळवले असेच करावे लागेल . आपल्या लोकसभासदृश्य असलेल्या  हाऊस ऑफ रिपेझँटिव्ह मध्ये  डेमोक्रेटिक पक्षाला बहुमत मिळणार नाही हे निवडणूकपूर्व मतदारकल चाचणीत यादीच स्पाष्ट झाले होते . मात्र आपल्या राज्यसभा समकक्ष असलेल्या सिनेटमध्ये डेमोक्रेटिक  पक्ष काही प्रमाणात बहुमत मिळवेल अशा अंदाज व्यक्त करण्यात येत आहोत मात्र प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालात रिपब्लिकन पक्षाला दोन्ही सभागृहात बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाले हा लेख लिहण्यापर्यंत ४३५ जागांसासाठी झालेल्या हाऊस ऑफ रिपेन्झटिव्हच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला १९८ जागा मिळाल्या आहेत . तर  डेमोक्रेटिक पक्षाला १७६ जागा मिळाल्या असून रिपब्लिकन पक्षाला सभागृहात बहुमत मिळण्यसासाठी फक्त २० जागांची गरज आहे तर सिनेट या आपल्या राज्यसभागृह समकक्ष असलेल्या सभागृहात ४८ जागा रिपब्लिकन पक्षाला मिळलेल्या आहेत तर   डेमोक्रेटिकपक्षाला पाठिंबा देणाऱ्या एका अन्य सदस्यांसह डेमोक्रेटकीक पक्षाला ४७ जागा मिळाल्या आहेत तर दोन जागा अन्य पक्षांकडे आहेत  अनेकांना दोनच
पक्ष असल्याचे वाटते त्यांना मी सांगू शकतो कि अमेरिकेत बहुपक्षीय लोकशाही आहे मात्र एकूण मताच्या साडे ९८ ते ९९ टक्के मते रिपब्लिकन आणि डेमोक्रेटिक उमेदवारच घेतात अन्य पक्षाच्या उमेदवारांचे अस्तिव फक्त मतपत्रिकेएव्हढेच असते असे म्हटल्यास वावगे ठरू नये इतपत त्यांचे अस्तिव असते तर अश्या पक्षांकडे १०० सदस्यांच्या सिनेटमध्ये ३ जागा आहेत त्यातील एक जण   डेमोक्रेटिक पक्षाला समर्थन देत आहे  ८ नोव्हेंबरला अमेरिकेतील ५५ पैकी ३९ गव्हर्नच्या निवणुका देखील झाल्या याठिकाणी सुद्धा हत्तीने मुसंडी मारलेली आहे ते बघता रिपब्लिकन पक्षाला अपेक्षित असणाऱ्या सुधारणा होण्यासाठी प्रक्रियांची गती वाढेल हे नक्की 

 अमेरिकेच्या राजकारणात अध्यक्षांच्या ४ वर्षाच्या वाटचालीतील शेवटची २वर्षांची वाटचाल कशी असेल ? याची पायाभरणी या निकालातून होत असल्याने यास अमेरिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्व्वाचे आहे . अमेरिकेच्या प्रशासनाकडून घेण्यात येणाऱ्या निकालाचा जगावर सुद्धा परिणाम होत असल्याने आपल्यासाठी देखील  त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत  डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन पक्षाच्या देशांर्गत प्रश्नाबाबत विविवध मते आहेत त्यातील बंदूक बाळगण्याचा अधिकार आणि महिलांना गर्भपाताचा अधिकार या देशांर्गत मुद्याचा विचार करता  डेमोक्रेटिक पक्षाची भूमिका हि बंदूक बाळगण्यावर काही प्रमाणात बंधने घालण्याची तसेच महिलांना गर्भपाताचा अधिकार देण्याविषयी अनुकूलता दर्शवणारी आहे तर रिपब्लिकन पक्षाची भूमिका बंदुके बाळगण्यावर काहीही बंधने  नको तसेच महिलांच्या गर्भपाताच्या अधिकारावर बंधने लादणारी आहे महिलांच्या प्रश्नाबाबत अशी भूमिका घेणारा पक्ष सत्तेत

आल्यामुळे येत्या काही दिवसात अमेरिकेत महिलांचे आंदोलन उभे राहू शकते तसेच गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही 

     जर अंतरराष्ट्रीय पातळीवर परिणाम करणाऱ्या प्रश्नाबाबत दोन्ही पक्षांची भूमिका विचारात  घेतल्यास रिपब्लिकन पक्षाची भूमिका इतर देशांच्या नागरिकांना कामासाठी व्हिसा देणे  तसेच  कालांतराने त्यांना ग्रीनकार्ड देणे याबाबत काहीशी प्रतिकूल आहेत त्यांच्या आमटे अमेरिकेच्या रोजगारवर पहिल्यांदा अमेरिकन लोकांचाच अधिकार आहेत अमेरिका फर्स्ट हि त्यांची भूमिका आहे अमेरिकेने व्हिसा आणि ग्रीन कार्ड बाबतचे नियम अधिक कडक करावे असे त्यांचे मत आहे . डेमोक्रेटिक पक्षाचे याबाबत मत परिस्थिती जैसे थे ठेवावी यात मोठा बदल करण्यात येऊ नये अशी आहे  भारतातील आय टी सेक्टरचा विचार करता  डेमोक्रेटिक पक्षाची भूमिका अधिक अनुकूल आहे कोव्हीड १९ च्या पश्चात तर हि भूमिका अत्यंत महत्वाची आहे भारताचा अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्राचे मोठे योगदान आहे या सेवा क्षेत्राचा मोठा हिस्सा भारतातील आय टी क्षेत्र व्यापते जर अमेरिकेत व्हिसा आणि ग्रीनकार्ड विषयक तसेच आऊट सोर्सविषयीचे नियम बदलले तर त्यांचा मोठा परिणाम भारतावर देखील होणार हे सांगायला कोण्या ज्योतिष्याची गरज नाही  हा बदल स्कारात्मकतेकडे झुकण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे अधिक्य अमेरिकेत होणे भारताला काहीसे वाईट म्हणता येईल . मात्र हे पूर्णतः वाईटच असेल असे समजण्याचे काही कारण नाही कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षांपदाच्या काळात भारत आणि अमेरिकेत व्यापारविषयक अनेक करार

झाले दोन्ही देशातील व्यापारात भारताला अनुकूल होईल अशी वाढ झाली जागतिक स्तरावर क्याड सारख्या अनेक व्यासपीठावर अमेरिकेने भारताला सहभागी करून घेतले . चीनबाबत भारताला अनुकूल ठरेल अशी भूमिका घेतली . पाकिस्तान बरोबर संबंध काहीसे कमी केले डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले होते हे आपण विसरायला  नको त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे मताधिक्य वाढणे भारताला फायदेशीर देखील ठरू शकते  

जागतिक प्रश्नाबाबत बोलायचे झाल्यास रिपब्लिकन पक्षाची जागतिक हवामानबदलाविषयीची भूमिका बरीच वादग्रस्त आहे ग्रीनहाऊस परिणाम होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वायूचे उत्सर्जन कमी कारण्याबाबत कारवायांच्या उपाययोजनांबाबत रिपब्लिकन पक्षाची मते प्रतिकूल आहेत या मुद्यांवर त्यांची भारताबरोबर प्रचंड मतभेत आहेत मात्र गेल्या काही काही कालावधीत अमेरिकेने भोगलेल्या नैसर्गिक संकटामुळे या मतात काही अंशी फरक पडू शकतो मात्र तो फारसा नसेल हेही स्पष्ट आहे 

एकंदरीत अमेरिकेतील हा सत्ताबदल भारतासह जगाला खूप काही देणारा आणि खूप काही हिरावून घेणारा असे दोन्ही विरोधी गोष्टी एकाचवेळी असणारा आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?