2023वर्ष भारतीय उपखंडासाठी अत्यंत महत्तवाचे.

 

 भारताबरोबर सीमा शेअर करणाऱ्या नेपाळ या देशात त्यांच्या संसदेसाठी नुकतेच मतदान झाले.या निवडणूकीत चीन समर्थक कम्युनिस्ट पार्टीचे सरकार नेपाळमध्ये आले. ज्यांनी सत्तेत येवून चार दिवस पुर्ण होत नाहीत तोच ,चीनबरोबर सबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करणे सुरु केले,ज्यासाठी चीनबरोबर रेल्वेमार्गाने संपर्क साधणे सुलभ होण्यासाठी करावयाचा प्रयत्नांना गती देणे सुरु केले. त्या पार्श्वभूमीवर 2023साल भारतीय उपखंडासाठी अत्यंत महत्वाचे आहे.2023 या वर्षी जर पुर्वनियोजीत कार्यक्रमात बदल न झाल्यास सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानात आणि आँक्टोबर महिन्यात बांगलादेशात तेथील संसदेच्या निवडणूका आहेत.        
    भारताबरोबर सगळ्यात जास्त भुसीमा बांगलादेश शेअर करतो . बांगलादेशमधून येणाऱ्या घुसखोरीचा मुद्दा इशान्य भारतातील राज्ये आणि पश्चिम बंगाल यांच्या विधानसभेच्या निवडणूकीत आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत कळीचा ठरत असतो. सध्या इशान्य भारतासाठी केंद्र सरकारकडून अनेक विकास प्रकल्प राबवण्यात येत आहेत. उर्वरीत भारताबरोबर इशान्य भारताचा संपर्क वाढवण्यासाठी बांगलादेशातून रेल्वे सुरु करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येत आहे. त्यामुळे इशान भारताचा विचार करता बांगलादेश अत्यंत महत्तवाचा आहे. सध्या भारताचे शेजारील देशांशी सबंध अधिक मैत्रीपुर्ण करण्याबाबत विशेष प्रयत्न सुरु आहेत. ज्या अंतर्गत भारतातून बांगलादेशात जाण्यासाठी विविध रेल्वेमार्गावर प्रवाशी रेल्वेगाड्या सुरु करण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. मैत्रीपुर्ण सबंधाचा भाग म्हणून  भारत आणि भारताचा मित्र देश असलेल्या जपानमार्फत बांगलादेशात विविध विकासकामे सुरु आहेत. भारतविरोधी आघाडी तयार करण्याचा कामातील एक भाग म्हणून चीनचा बांगलादेशला आपल्या जाळ्यात खेचण्याचा प्रयत्न सुरु आहे.सध्या बांगलादेशातील अर्थव्यवस्था काहीसी डळमळीत झाली आहे.जर अर्थव्यवस्था  आताच सुधारली नाही तर तो देश श्रीलंकेच्या वाटेवर जावू शकतो,असी भिती व्यक्त करण्यात येत आहे. भारताला आपल्या शेजारी श्रीलंकेसारख्या दिवाळखोर देशांची संख्या वाढणे परवडनारे नाही. त्यामुळे या निवडणूका आपल्यासाठी देखील महत्वाचा आहेत.
   सध्या बांगलादेशात भारत समर्थक शेख हसीना या पंतप्रधान आहेत. त्या बांगलादेशाच्या निर्मितीत मोठे योगदान असलेल्या अवामी लिग या पक्षाचे प्रतिनिधित्व करतात.बांगलादेशचे राष्ट्र पिता म्हणून मान्यता असणाऱ्या शेख मुजिबुर रहेमान यांच्या त्या कन्या आहेत.{त्यांचा सर्व परीवाराची (ज्यामध्ये त्यांचा आईवडील भावंडे आत्या,काका, मामा मावशी यांच्या परीवारासह)1975आँगस्ट15रोजी हत्या करण्यात आली आहे.मात्र त्यावेळी त्या लंडनला असल्याने त्या वाचल्या.} मात्र सध्या बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष बांगलादेश नँशनालिस्ट पार्टीतर्फे त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनास कट्टर धार्मिक विचार असलेल्या संघटनेचा, पक्षाचा देखील पाठिंबा मिळत आहे.  बांगलादेशातील विरोधी पक्षाच्या आंदोलनास जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. बांगलादेशात सध्या धार्मिक कट्टरता चिंताजनक पद्धतीने वाढत आहे.
यामुळे शेख हसीना यांचे सरकार काहीसे अडचणीत आहे. विरोधी पक्षांची प्रमुख मागणी सध्याचा सरकारने त्वरीत राजीनामा देवून नव्याने निवडणूका घ्याव्यात असी आहे. मात्र शेख हसीना यांनी डिसेंबर महिन्याचा अखेरच्या आठवड्यात देशात मुदतपूर्व निवडणूका कदापी होणार नाही. विद्यमान सरकारचा विहीत कालावधी पुर्ण झाल्याशिवाय निवडणूका होणार नसल्याचा पुनरुच्चार केला आहे. मात्र देशातील आंदोलनाची तीव्रता बघता त्या आपल्या विधानावर किती काळ टिकून राहतील याबाबत हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.
बांगलादेशातील विद्यमान विरोधी पक्ष असलेला बांगलादेश नँशनालिस्ट पार्टी हा सत्तेतील पक्षाच्या तूलनेत कमी भारत समर्थक आहे.. मात्र सध्या सुरु असलेल्या आंदोलनात हा पक्ष विद्यमान सरकारने देशहिताला तिलांजली देत देश चीनच्या दावणीला बांधल्याचा आरोप केला आहे.चीन आणि भारताचे शत्रुत्व आहे.त्या पार्श्वभूमीवर विद्यमान विरोधी पक्ष बांगलादेश नँशनालिस्ट पार्टी सत्तेत आल्यास आपली पारंपरिक भुमिका सोडत भारताच्या समर्थनाची भुमिका घेतो की, ही त्याची फक्त आंदोलनपुरतीच भुमिका आहे, हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.
    पाकिस्तानचा विचार केला असता ,सध्या पाकिस्तानात मुदतपूर्व संसद विसर्जीत करुन नव्याने निवडणूका घ्याव्यात ,या मागणीसाठी विरोधी पक्षनेते इम्रान खान यांचे आंदोलन सुरु आहे. ज्यास मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. आंदोलनात महामोर्च्या दरम्यान गुजरानवाला येथे इम्रान खान यांच्यावर झालेला हल्ला हा पुर्वनियोजीत होता, हे पुढे पोलीस तपासणात उघड झाल्याने इम्रान खान यांचे बळ काहीसे वाढले आहे. देशाची अर्थव्यवस्था
प्रचंड अडचणीत असल्याने इम्रान खान यांना आंदोलनासाठी महत्वाचा मुद्दा हाती आला आहे. इम्रान खान यांचे आंदोलन बघता देशात मुदतपूर्व निवडणूका होण्याची दाट शक्यता आहे.
भारतातील  दहशतवादी कारवाया, काश्मीरचा प्रश्नावर पाकिस्ततर्फे आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये विनाकारण  किती अप्रचार केला जातो , अफगाणिस्तानला भारतातून होणाऱ्या मदतीला पाकिस्तानकडून किती अटकाव होतो,आदि प्रश्नांची उत्तरे पाकिस्तानात कोणाची राजवट आहे?यावर ठरत असल्याने पाकिस्तानातील निवडणूका भारतासाठी सुद्धा महत्वाचा ठरतात.
इम्रान खान त्यांच्या कट्टर भारतविरोधी भुमिकेसाठी ओळखले जातात. पाकिस्तानमधील सध्याचे राजकारण बघता ते पुन्हा सत्तेत येणार हे100%सत्य आहे. मात्र पाकिस्तानची आर्थिक स्थिती बघता आणि पाकिस्तानी अर्थव्यवस्थेत भारताशी होणाऱ्या व्यापाराचे स्थान बघता ते पुन्हा सत्तेत आल्यानंतर तसीच भुमिका घेतात का? हे आपल्या भारतासाठी महत्तावचे आहे. त्यामुळे पाकिस्तानी राजकारण कोणत्या अंगाने जाते,हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे.
एकंदरीत 2023 हे वर्ष भारतासाठी महत्तवाचे आहे, हेच खरे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?