भारतियांनो तुमची घटिका भरली


भारतियांनो तुमची घटिका भरली आहे . हे सिद्ध करणारा अहवाल नुकताच जागतिक बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे या अहवालानुसार येत्या नजीकच्या भविष्यकाळापासून मोठ्या तापमानाचा  भारतातला जगात सर्वाधिक फटका बसणार आहे यासह भारतात उन्हाळ्याचा कालावधी वाढणार आहे उन्हाळा लवकर सुरु होऊन उशिरा संपणार आहे . Climate Investment Opportunities in India's Cooling Sector या नावाचा हा अहवाल "India Climate and Development Partners' Meet या दोन दिवशीय परिषदेत मांडण्यात आला केरळ सरकारच्या सहकार्याने  जागतिक बँकेमार्फत या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते तिरुअतनपूरम या शहरात ही परिषद झाली

या अहवालात सांगण्यात आले आहे की, त्यात पुढे म्हटले आहे की, दक्षिण आशियाचा विचार करता या वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे  ज्यामध्ये एक मनुष्य दिवसभरत  ८ तास काम करतो जर दोन माणसांनी प्रत्येकी ८ तास काम केले तर ते काम १६ तास होईल या पद्धतीने मोजल्यास   वर्षभरात  मनुष्य काम करू शकतील अश्या  १०१  अब्ज तासांपेक्षा जास्त तास काम होऊच या उन्हामुळे  शकले नाहीये भारतात जवळपास ७५ % नागरिक काम करताना प्रत्यक्ष 

सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असतात वाढत्या उन्हामुळे त्यांचा काम करण्याच्या क्षमतेवर मोठ्या प्रमाणत परिणाम  होईल ज्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम होण्याचा अंदाज या अहवालामध्ये व्यक्त करण्यात  आला आहे    

   जागतिक व्यवस्थापन सल्लागार कंपनी, मॅकिन्से अँड कंपनीच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की वाढत्या उष्णता आणि आर्द्रतेमुळे हरवलेल्या कार्यक्षमतेमुळे या दशकाच्या अखेरपर्यंत   भारताचे  GDP च्या 4.5 टक्के -नुकसान  होईल जागतिक स्तरावर भारत जगात सर्वाधिक औषधें निर्माण करतो या औषधांपैकी अन्येक औषधे साठवायला शीतगृहे लागतात त्यांची संख्या भारतात खूपच कमी असल्याने भारतातील अनेक औषधे वाया जातात ज्यामुळे या औषधांच्या निर्यातीतून मिळणारे परकीय चलन भारतास मिळत नाही सध्या तापमान वाढत असल्याने हे  औषधे वाया जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढू शकते असेही या अहवालात सांगण्यात आले आहे 

या पार्श्वभूमीवर भारतात काय चालू आहे ? याचा आढावा घेतल्यास समोर येणारे चित्र फारसे उत्साहवर्धक नाहीये तामिळनाडू विरुद्ध केरळ , कर्नाटक विरुद्ध तामिळनाडू केरळ विरुद्ध कर्नाटक . हिमाचल प्रदेश विरुद्ध लडाख , तेलंगणा विरुद्ध ओडिसा आसाम विरुद्ध अरुणाचल प्रदेश . कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र ., तेलंगण विरुद्ध महाराष्ट्र पंजाब विरुद्ध हरियाणा, हरियाणा विरुद्ध राजस्थान  या सारखे  देशातील प्रदेशामध्ये पाण्याच्या वाटपावरून आणि प्रदेशाच्या मालकी हक्कावरून प्रचंड वाद आहेत ज्याला देशातील राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी मोठ्या प्रमाणत वाढवत आहेत त्यामुळे  सर्व देशाला ज्यामध्ये ते ज्या प्रदेशाचे प्रतिनिधित्व करताततो भाग सुद्धा समाविष्ट आहे  भेडसावणाऱ्या या सारख्या प्रश्नाबाबत पुरेशी चर्चा होत नाहीये मी वर सागितलेलली  देशांतर्गत वादाची ही प्रातिनिधिक

आहेत देशातील प्रादेशिक वादांची यादी केल्यास ती याच्या सहज तिप्पट ते चोपट्ट होईल या संकटाचा सामना कोणत्याही राज्याला स्व सामर्थ्यवर करता येणे अशक्य आहे त्यासाठी देशातील सर्व राज्यांची एकजूट आवश्यक आहे मात्र या सारखे वाद त्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करू शकतात या संकटाचा सामना करताना पाणी वाटपाचे मुद्दे  मोठ्या प्रमाणत अडचणीचे ठरू शकतात ज्यामुळे दक्षिण भारतात जिथे पाण्याची उपलब्धता ऊत्तर भारतापेक्षा कमी आहे मात्र कावेरी नदीच्या पाण्यासारखे भयानक स्थितीचे वाद आहेत तिथे गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात आमची पिके उन्हामुळे जळत असताना आम्ही त्यांना पाणी देयचे सोडून तुम्हला का पाणी देयचे यावरून कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये गंभीर स्थिती होऊ शकते त्यामुळे या प्रकारचे वाद मिटवण्यातच भारताचे हित असल्याचे याअहवालातून दिसून येत आहे , हे नक्की 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?