भारताचे अशांत शेजार

   

  पाकिस्तान आणि बांगलादेश भारताचे . दोन शेजारी एक पूर्वेकडे आहे एक पश्चिमीकडे .कोणे एकेकाळी एकाच देशाचे भाग असलेले मात्र कालांतराने विविध कारणास्तव विभक्त होऊन दोन स्वतंत्र झालेले हे दोन देश   ते विभक्त होऊन आज ५० वर्षे झाल्यावर पुन्हा एकदा हे देश एका सामान कारणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत ते म्हणजे देशातील केंद्रीय सत्तेने सत्ता सोडावी या साठी प्रमुख विरोधी पक्षांनी आंदोलन आणि त्यास मिळणारा अभूतपूर्व पाठिंबा या दोन्ही देशातील आंदोलनाने विविध प्रकारचे हिंसक स्वरूप धारण केले आहे पाकिस्तनमध्ये या आंदोलनदरम्यान पाकिस्तानचे प्रमुख विरोधी पक्षनेते इम्रान खान यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला ,ज्यातून ते बचावले तर बांगलादेशमध्ये झालेल्या आंदोलनात एका आंदोलकास १० डिसेंबर रोजी प्राणास मुकावे लागले दोन्ही देशातील केंद्रीय सत्तेच्या कालावधी दीड वर्ष बाकी असताना ते देशाची स्थिती हाताळण्यास असमर्थ ठरले आहेत त्यांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था ढासळली . देशाचे परराष्ट्र धोरण स्वतःच्या देशाच्या हिताचा विचार न करता अन्य देशाला अनुकूल ठरेल अश्या पद्धतीने या सरकारने राबवले असा दोन्ही देशातील विरोधी पक्षांचा आरोप आहे त्यामुळे देशातील केंद्रीय सत्तेत राहण्याच्या अधिकार नाही सरकारने त्वरित नव्याने निवडणुका घ्याव्यात या प्रमुख मागणीसाठी  दोन्ही देशातील विरोधी पक्षनेते आंदोलने करत आहेत पाकिस्तानमध्येया वर्षाच्या  एप्रिल अखेरीपासून सुरु असलेल्या आंदोलनाने आंदोलनाने ऑक्टोबरपासून जोर धरला तर या २०२२ वर्षाच्या सुरवातीपासून सुरु असणाऱ्या आंदोलनाने बांगलादेशात  आता अत्यंत प्रचंड वेग पकडला आहे
       १० डिसेंबररोजी झालेल्या आंदोलनाच्या वेळी आमचे दोन हजार कार्यकर्ते पकड्ण्यात येऊन त्यांच्यावर अयोग्य पद्धतीने गुन्हे दाखल केले आहेत असा आरोप बांगलादेशमधील प्रमुख विरोधी पक्ष बांगलादेश  नॅशनॅलिस्ट पार्टी   या पक्षाकडून करण्यात येत आहे तर बांगलादेशमधील सरकारने फक्त एक हजार कार्यकर्त्यानाना पकडले आणि समज देऊन सोडून देण्यात आलेअसे स्पष्टीकरण देण्यात आले आहे या आदोलनात पोलिसांनी आंदोलन नियंत्रणात
आणण्याच्या प्रयत्ननात एक आंदोलकी ठार झाला आहे विद्यमान सरकारने देशाला चीनच्या दावणीला बांधले त्यामुळे अमेरिका आणि पाश्चात्य युरोपीय देशात होणारी बांगलादेशची निर्यात रोडावली असा आरोप करत बांगलादेश सरकारने त्वरित राजीनामा देऊन नव्याने निवडणूक घ्याव्यात सरकारने राजीनामा दिल्यावर सर्व पक्षांचे काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात यावे , हि बांगलादेश मधील विरोधकांची प्रमुख मागणी आहे आपल्या मागणी संदर्भात सरकारवर दबाव टाकण्यासाठी बांगलादेशमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या सर्वांच्या सर्व म्हणजे सातही खासदारांनी राजीनामा दिला आहे मात्र ३६९ सदस्य असलेल्या बांगलादेशच्या संसदेत ७ सदस्यांनी राजीनामा दिल्याने तेथील पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर काहीही दबाव पडणार नसल्याचा अंदाज राजकीय तज्ञाकडून व्यक्त करण्यात येत आहे 
      बांगलादेश सरकारच्या मते त्यांचे परराष्ट्र धोरण कोणत्याही देशाच्या दावणीला बांधले गेलेले नाही त्यांनी चीनसह . जपानभारत आणि शक्य तितक्या देशांकडून मदत मिळवत देशाची अर्थव्यवस्था अत्यंत मजबूत स्थितीत आणली आहे भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ होत आहेत भारताबरोबर व्यापार वाढण्याबरोबर दोन्ही देशातील दळवणवळणांत देखील सुधारणा होत आहे बांगलादेशातील सध्या सुरुअसलेले तिन्ही विकासकामे हि जपानच्या मदतीने सुरु आहेत आमच्याकाळात अमेरिका आणि पश्चिमी युरोपीय राष्ट्रांशी बांगलादेशची निर्यात मोठ्या प्रमाणत वाढली आहे त्यामुळेच जिडीपी पर कॅपिटल च्या संदर्भात बांगलादेश आशिया खंडात क्रमांक एकची अर्थव्यवस्था झाला आहे तसेच पूर्वी बांगलादेशच्या संविधानात एखाद्या सरकाने राजीनामा दिल्यावर निवणुकीच्या काळात सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याची तरतूद असली तरी ती २०११ साली आलेल्या घटना दुरुस्तीने काढून टाकण्यात आली आहे त्यामुळे आता तसे करणे संविधानाचे उल्लंघन ठरेल 
         सध्या भारत पूर्वांचलच्या विकासासाठी अनेक प्रकल्प राबवत आहे त्याला विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी उर्वरित देशाशी संपर्क वाढवण्यासाठी अनेक पर्यायी व्यवस्था करत आहेत त्यातील बहुतांशी मार्ग बांगलादेशमधून ईशान्य भारतात जातात ईशान्य भारतात दशतवाडी कारवाया करणारे अनेक गट बांगलादेशातून  मदत घेतात . या गटावर कारवाई करण्यसाठी आणि ईशान्य भारताचा अधिक विकास होण्यासाठी भारताला बांगलादेश अत्यंत महत्वाचा आहे ईशान्य भारत हा भारतासाठी आग्येय आशियाचे प्रवेशद्वार म्हणून काम करतो या ईशान्य भारतात विकास प्रक्लप उभेल्यास या देशांबरोबर संबंध दृढ होण्यास भारताला मदत ह होईल . जर बांग्लादेशमध्ये राजकीय स्थिरता असेल तर भारताचा हेतू सहजतेनं सिद्ध होऊ शकतो त्यामुळे बांगलादेचे राजकारण श भारतासाठी अत्यन्त महत्वाचे  आहे  
           पाकिस्तानचा विचार करता इम्रान खान पाकिस्तानी पंजाब आणि खैबर ए पख्तुनत्वा ((पूर्वीचा वायव्य सरहद्द प्रांत ) या प्रांतातील विधानसभा कधी विसर्जित करतात याकडे सर्व पाकिस्तानचे लक्ष लागलेले आहे पाकिस्तानात पूर्व विधानसभा आणि केंद्रीय सत्तेच्या निवडणुका एकत्रच होतात त्यामुळे देशाच्या एकूण विधानसभेच्या जागांपैकी ६६ % जागांवर निवडणुका होत असल्याने पुन्हा दीड वर्षाने निवडणूका घेतल्यास प्रचंड प्रमाणत पैसे विनाकारण खर्च होईल तरी पंजाब आणि  खैबर ए पख्तुनत्वा ((पूर्वीचा वायव्य सरहद्द प्रांत ) च्य निवडणुका घ्याव्यात असा सूर
उमटत आहे  इम्रान खान यांच्यामते फेब्रुवारीपर्यंत निवडणुका होणे आवश्यक आहे त्यामुळे निवडणुकीसाठी पाकिस्तानी संविधानानुसार असणारी ९० दिवसाचे काळजीवाहक सरकारचे बंधन बघता मी देशातील राजकीय स्थितीचा अंदाज घेता डिसेंबर पर्यंत विधानसभा विसर्जित करेल 
पाकिस्तान मध्ये अशांतता निर्माण झाल्यास त्याचा परिणाम भारताच्या मध्य आशियातील देशांच्या संबंधासह काश्मीच्या शांतेवर होत असल्याने पाकिस्तानात शांतता असणेच भारताला पूरक आहे  
एकंदरीत भारतासाठीयेणारे काही दिवस कसोटीचे आहेत .हेच खरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?