संसदेच्या अधिवेशनातून


  सध्या नवी दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे सध्या सुरु असणारे संसदेचे अधिवेशन १७ व्या लोकसभेचे दहावे अधिवेशन आहे . कोणत्याही संसदेने आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यास त्या लोकसाभेची एकूण १५ अधिवेशने होतात त्या नुसार सध्या कार्यरत असणाऱ्या लोकसभेची अजून ५ अधिवेशने शिल्लक आहेत  आपल्या संसदीय प्रणालीनुसार प्रत्येक वर्षात ३ संसदेची अधिवेशने होतात जी पावसाळी हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशने म्हणून ओळखली जातात . १९५२ रोजी आपल्या देशात पहिल्यांदा लोकसभा अस्तित्वात आली . तिचे पाच वर्षानंतर विसर्जन होऊन पुढील ५ वर्षांनी पुढील लोकसभा अस्तित्वात आली त्या हिशोबाने सध्या १७ वी लोकसभा कार्यरत आहे तर सध्या सुरु असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य असलेले खासदार देशासाठी महतवाच्या असणाऱ्या विविध प्रश्नावर सरकारच्या मंत्रालयाला प्रश्न विचारत आहेदेशासाठीअत्यंत महत्वाचे असणारे परराष्ट्र मंत्रालय देखील यातून सुटले नाहीये ७ डिसेंबरला अधिवेशन सुरु झाल्यापासून हा लेख लिहण्यापर्यंत ( १३ डिसेंबर सायंकाळ )राज्यसभेत  विचारण्यात आलेलं एकूण तेरा प्रश्न हे परराष्ट्र मंत्रालयाशी संबंधित होते  या १३ पप्रश्नांपैकी २ प्रश्नाची उत्तरे भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिली तर उर्वरित प्रश्नाची उत्तरे परराष्ट्र मंत्रालयाच्या राज्यमंत्र्यांनी दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दुसऱ्या कार्यकाळात   तीन खासदार राज्यपरराष्ट्र मंत्री आहेत सध्या सुरु असणाऱ्या या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये १३ डिसेंबरच्या सायंकाळपर्यँत विचारण्यात आलेल्या १३ प्रश्नांपैकी ११ प्रश्न   अतारांकित होते तर फक्त दोन प्रश्न तारांकित होते

  या प्रश्नामध्ये भारतीयांना परदेशात नोकरी देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सीच्या वाढत्या संख्येबाबत केंद्र सरकारची भूमिका काय ? या वाढणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सीपैकी ज्या  नोंदणीकृत नाहीत अश्या ट्रॅव्हल एजन्सी च्यामाध्यमातून परदेशी गेलेल्या भारतीयांना भारताबाहेर काही अडचण आल्यास सरकारचे काय धोरण आहे ? भारतीयांना अमेरिकेच्या व्हिसा घेताना प्रचंड प्रमाणात कालावधी लागतो त्याबाबत केंद्र सरकारने काय पाऊले उचलली आहेत . श्रीलंकेच्या तुरुंगात कैद असलेल्या तामिळी मच्छीमारांच्या सुटकेबाबत केंद्राचे प्रयत्न कसे सुरु आहेत ? तसेच भारतीय सीमेपासून जवळ मात्र पाकिस्तानी हद्दीत असणाऱ्या कर्तारपूरच्या गुरुद्वाराला भेट देण्यस्साठी किती लोकांना व्हिसा

देण्यात आला , भाविकांना सरकारतर्फे काही सोयीसवलती उभारण्यात आल्या आहेत का .तसेच पाकिस्तानकडून भारतीय नागरिकांना देण्यात आकारण्यात येणाऱ्या २० अमेरिकी डॉलरची फी माफ करण्याबाबत सरकारने काही पाऊले उचलली आहेत का ? केरळ राज्यात असणाऱ्या पासपोर्ट सेवा केंद्राची आणि पोस्टाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या पासपोर्टची सद्यस्थिती काय आहे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी 26 मे 2022 रोजी चेन्नई येथे झालेल्या एका समारंभात पंतप्रधानांना राज्यातील भारतीय मच्छिमारांच्या भल्यासाठी श्रीलंकेतून कचथीवू परत आणण्याची विनंती केली होती, हे खरे आहे का ? रशिया-युक्रेन संघर्ष लवकर निकाली काढण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग अवलंबण्याची गरज असताना सरकारकडून काही राजनैतिक पुढाकार घेण्यात आला आहे का;श्रीलंकेच्या नौदलाकडून वारंवार अटक आणि नौका जप्त केल्या जात असून त्यामुळे अनेक भारतीय तमिळ मच्छिमारांचे जीवनमान उद्ध्वस्त होत आहे   त्याबाबत   सरकार काय करत आहे ? जगाच्या विविध भागात काम करणाऱ्या तेलंगणा राज्यातील मूळ रहिवाशांचा अधिकृत डेटा मंत्रालयाकडे आहे का; असल्यास, तेलंगणातील मूळ रहिवासी संबंधित देशांमध्ये काम करणार्‍यांचे जिल्हावार तपशील काय आहेत ? परदेशात काम करणार्‍या तेलंगणातील मूळ रहिवाशांच्या कल्याणाचे रक्षण करण्यासाठी कोणतीही देखरेख यंत्रणा कार्यरत आहे का;तसे असल्यास, अशा यंत्रणेचे तपशील, त्यांच्या देशनिहाय संपर्क तपशीलांसह? भारतीय नागरिक असंणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात राहत असताना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी केंद्राच्या काय योजना 
आहेत ?पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेशी दौऱ्यावर किती खर्च झाला ? वंदे भारत मिशन अंतर्गत मे 2020 ते मार्च 2021 दरम्यान परत आलेल्या भारतीय नागरिकांची एकूण संख्या किती आहे ? सरकारने मिशनच्या प्रत्येक टप्प्यातील एकूण उड्डाण्यांमध्ये देशांतर्गत कनेक्टिंग फ्लाइट्सचा समावेश केला आहे का;?केला असल्यास त्याची कारणे काय होती परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर सूचीबद्ध केलेली संख्या ही मायदेशी परतलेल्या नागरिकांच्या वास्तविक संख्येच्या जवळपास दुप्पट आहे हे सत्य आहे का; आणि हे खरे असल्यास त्याची करणे काय होती ?नायजेरियाजवळ एमटी हिरोइक इडम या ताब्यात घेतलेल्या जहाजाची सुटका करण्यासाठी सरकारने केलेली कारवाई;काय होती हे जहाज ताब्यात घेण्याचे कारण आणि क्रू मेंबर्सच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सरकारने ज्या पद्धतीने हस्तक्षेप केला;ती काय होती ? आणि सदर घटनेत  अटकेत असलेल्या क्रू मेंबर्सची सुटका करून भारतात परत आणणे केव्हा अपेक्षित आहे?  या प्रश्नाचा समावेश आहे
 विचारलेल्या प्रश्नांवरून आपण प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रित्या निवडून दिलेले खासदार फक्त संसदेत गोंधळच घालत नाहीत तर सरकाराला विविध प्रशांबाबत धारेवर धरण्याचे कार्य सुद्धा करतात मात्र दुर्दैवाने संसदेत गोंधळ झाला तर आणि तरच त्याच्या बातम्या होतात किंवा एखाद्या विधेयकावर चर्चा झाली तरच संसदेत कामकाज झाले असे समजण्यात येते मात्र ते चुकीचे आहे हे वरील प्रशांवरून आपणास समजते वरील कोणताही प्रश्न हा विधेयक नाही मात्र तरी देखील त्याचे महत्व कमी नाही कोणी कितीही टीका करो आपली लोकशाही सशक्त आणि लोकांनाउत्तरदायी आहे हेच या प्रश्नातून समजत आहे , हे मात्र नक्की 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?