बांगलादेशमधील राजकीय संकट अधिकच गहिरे !

       


  बांगलादेशमधील राजकीय दिवसोंदिवस संकट अधिकच गहिरे होत असल्याचेतेथून येणाऱ्या बातम्यांनी स्पष्ट होत आहे . बांगलादेशमधील सत्तारूढ शेख हसीना सरकारने राजीनामा देऊन त्वरित नव्या निवडणूक घ्याव्यात , या प्रमुख  मागणीसह अन्य काही मागण्यासाठी बांगलादेश मधील प्रमुख विरोधी पार्टी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी ने देशभर आंदोलने निषेध मोर्च्याचे आयोजन केले आहे ज्यास जनतेतून मोठ्या प्रमाणत पाठिंबा मिळत आहे बांगलादेश मधील सर्वात मोठी इस्लमिक पार्टी असलेल्या जमात इस्लामी या पक्षाकडून देखील विरोधी पक्षाला समर्थन देण्यात आले आहे . आंदोलनाची वाढती व्याप्ती बघत सरकारकांकडून जमात इस्लामी या पक्षाचे  अध्यक्ष असलेल्या हाफिकूर रहमान यास १५ डिसेंबरला अटक करण्यात आली ,गेल्या काही वर्षांपासून बांगलादेशमध्ये धार्मिक कट्टरता मोठ्या प्रमाणत वाढत आहे ज्याचा फटका अल्पसंख्यकांना मोठ्या प्रमाणत बसत आहे त्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठ्या इस्लामिक पक्षच्या प्रमुखाला अटक होणे हि फार मोठी गोष्ट आहे हा लेख लिहण्यापर्यंत बांगलादेशातून याची हिंसक प्रतिक्रियाउमटल्याची बातमी नसली तरी बांगलादेशमधील सामाजिक परिस्थिती बघता याचे मोठे प्रतिसाद उमटतील हे नक्की कदाचित तुम्ही हा लेख वाचत असताना ते उमटण्यास सुरवात झालेली असेल . 

        जमात--इस्लामीच्या अनेक सदस्यांना २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने १९७१च्या बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान युद्ध अपराध केल्याबद्दल दोषी ठरवले होते. त्याच्या पाच प्रमुख नेत्यांना २०१३ ते २०१६ दरम्यान युद्ध गुन्हे केल्याबद्दल फाशी देण्यात आली होती.अतिउजव्या कट्टरपंथी मानल्या जाणार्या,या संघटनेसह तिच्या विविध गटांना भारत आणि श्रीलंकेने दक्षिण आशियातील दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे.बांगलादेशमध्ये, जमात--इस्लामीला २०१२ पासून निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्या पूर्वी ,

हा पक्ष हा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) चा प्रमुख सहयोगी होता आणि त्यांच्या युतीने २००१ ते २००६  दरम्यान देशाचा कारभार हाकला .जमात--इस्लामीचे प्रसिद्धी सचिव मतिउर रहमान अकंद यांनी माध्यमांशी या बाबत बोलताना  सांगितले की, "गेल्या  १५ वर्षांपासून पक्षावर सुरू असलेल्या अन्यायकारक दडपशाहीचा हा आणखी एक भाग आहे."

        बांगलादेशमधील विद्यमान सरकारवर जनतेचा विश्वास नाही किंबहुना या आधी झालेल्या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकीत म्हणजे २०१४ आणि २०१८ साली झालेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणत गैरव्यवहार करून विद्यमान सरकार सत्तेत आल्याने जनतेचा विश्वासतेव्हा देखील नव्हता आज २०२२ साली सरकारच्या आतापर्यंतच्या कार्यकाळामुळे उरला सुरला विश्वास देखील सरकारने गमवला आहे . तरी जनतेने त्वरित निवडणूक घेऊन सत्ता सोडावी तसेच भष्ट्राचारच्या खोट्या आरोपाखाली शैक्ष हसीना सरकारने तुरुंगात बंदिस्त केलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट  पार्टीच्या  महत्वाच्या नेत्या ७६ वर्षीय खालिदा झिया यांची तत्काळ मुक्तता करावी या मागणीसाठी बांगलादेश मधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या नेर्तृत्वात विरोधी पक्ष या २०२२ वर्षाच्या सुरवातीपासून आंदोलनं करत आहेत ज्यास डिसेंबर महिन्यात अत्यंत वेग आला आहे तत्परण्ट काहीसे शांततेत असणाऱ्या या आंदोलनाने आता उग्र हिंसक रूप घेतले आहे 

      बंगलादेश मधील राजकारणाचा विचार करता ते बांगलादेशमधील पहिले लष्करी हुकूमशहा लेफ्टनंट जनरल झियाउर रहमान यांच्या पत्नी खालिदा झिया आणि बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मेहबूर रहमान यांच्या एकंवेव जिवंत कन्या शेख हसीना यांच्या भोवती केंद्रित झाले आहे बांगलादेश पाकिस्तानपासून स्वातंत्र्य झाल्यापासून ४ च वर्षात अर्थात १९७५ ऑगस्ट १५ रोजी बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मेहबूर रहमान यांची त्यांच्या सर्व परिवारासह हत्या करण्यात आली होती त्यावेळी स्वतः शेख मेहबूर रहमान ,त्यांची पत्नी त्यांची बांगलालादेशमधील सर्व अपत्ये , त्यांची बहीण ,बहिणेची अपत्ये बहिणीचा नवरा, भाऊ . भावजय , भावाची सर्व अपत्ये , मेहुणी (पत्नीची बहीण ) मेहुणीची अपत्ये मेहुणीचा नवरा , मेहुणा (पत्नीचा भाऊ ) मेहुणीची पत्नी आणि त्यांची अपत्ये यांची हत्या करण्यात आली मात्र

या सर्व हत्याकांडात त्यांची त्यावेळी लंडनला शिकणारी मुलगी मात्र वाचली ती वाचलेली मुलगी  म्हणजेच शेख हसीना ज्या सध्या बांगलादेशच्या पंतप्रधान आहेत ज्यांनी आयुष्याचा मोठा भाग दिल्लीत एक सर्वसामान्य विद्यार्थी म्हणून घालवला आहे या काळात त्यांची आणि भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्याबरोबर चांगली मैत्री होती 

     या मुळेच असेल कदाचित   शेख हसीना या भारत समर्थक म्हणून ओळखल्या जातात ज्यावेळी त्या बांगलादेशात सत्तेत असतात त्यावेळी भारत बांगलादेश संबंध अत्यंत मधुर असतात . सध्या शेख हसीना सत्तेत असल्यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यात अनेक प्रकल्पांचे काम सध्या सुरु आहेत तसेच अनेक प्रकल्प नियोजनाच्या वेगवेगळ्या टप्यावर आहेत भारताला ईशान्य भारतात विकासकामे करताना ईशान्य भारताशी उर्वरित भारताशी संपर्क वाढवायला बंगलादेशचे मोठे सहकार्य होत असते पश्चिम बंगालच्या सिलिगुडी कोरिडॉरमधून ईशान्य भारतात प्रवेश करण्याचा सध्याच्या मार्गाला सक्षम पर्याय म्हणून बांगलादेशमधून रेल्वे नेता येऊ शकते का ? याबाबत दोन्ही देशामध्ये सध्या नियोजन सुरु आहे  तसेच ईशान्य भारतातील फुटीरवादी गटाविरोधात कार्यवाही करण्यासाठी बांगलादेशचे सहकार्य मोठ्या प्रमाणत मिळत असते  बांगलादेशमद्या कशी स्थिती आहे यावर आसाम , मेघालय त्रिपुरा पश्चिम बंगाल या सारख्या राज्यामध्ये सामाजिक शांतात बिघडवऱ्या सीमेपार घुसखोरी होते का ? या गोष्टी अवलुबुन आहेत त्यामुळे शेख हसीना यांचे सरकार राहते का ? हा प्रश्न भारतासासाठी सुद्धा महत्त्वाचा ठरतो 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?