स्वागत उत्तरायणचे

    


आपल्या भारतात काही कालावधी अत्यंत महत्वाचे समजले जातात. उत्तरायण हा अशाच महत्वाचा कालावधी म्हणजे उत्तरायण . .जो२२ डिसेंबर पासून २१ जून पर्यंत असतो मित्रानो हा कालावधी सूर्याचा भासमान भ्रमणामुळे निर्माण होणारा एक भौगोलिक चमत्कार आहे  पृथ्वी सूर्याभोवती फिरते , हे आता सर्वमान्य झाले आहे . याचा आपल्याला दृष्यपरिणाम म्हणजे सूर्याचे रोज बदलणारे स्थान . सामान्यतः आपण सूर्य पूर्वेला उगवतो असे मानतो . मात्र संपूर्ण वर्षात फक्त दोनच दिवस असतात ज्या दिवशी सूर्य वास्तविक पूर्व दिशेला उगवतो . अन्य दिवशी तो पूर्व दिशेपासून काही अंश उजव्या अथवा डाव्या बाजूला म्हणतात . यास सूर्याचा भासमान भ्रमण मार्ग म्हणतात . आपण शेजारील चित्रात तो बघू शकतातया भासमान भ्रमणात सूर्य  जेव्हा त्याच्या डाव्या  हाताच्या
सगळ्यात कडेच्या बिंदूपर्यत पोहोचतो . ज्या बिंदूपासून तो परत    उजवीकडे भासमान भ्रमण सुरु करतो तो दिवस म्हणजे उत्तरायण सुरु होण्याचा दिवस जो  या वर्षी गुरुवार २२ डिसेंबर २०२२  रोजी आहे

   मित्रानो , उत्तरायण सुरु झाल्याने आता दिवसाचा कालावधी हळूहळू वाढत जाईल . ही प्रक्रिया  २२ जून२०२३  पर्यंत सुरु राहील . त्यामध्ये २१ मार्च मध्ये सूर्य आभासी विषवृत्तावर असतो त्यावेळी दोन्ही गोलार्धात दिवस १२ तासांचा दिवस आणि १२ तासांची रात्री असते आपल्या भारतीय पंचांगानुसार पूर्वी या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असे मात्र पृथीच्या परांचन गतीमुळे तो सध्या १५  जानेवारीला होतो . हे सूर्याचे मकर राशीत भासमान भ्रमण आपण मकर संक्रांत म्हणून साजरे  करतो  खरेतर हा  उत्तरायण सुरु झाले याचा आनंदोत्सोव असतो . महाभारत युध्द्धच्या वेळी सुद्धा पितामह भीष्म यांनी आपले प्राण उत्तरायण सुरु होण्यापर्यंत रोखून धरले होते .हिंदू धर्मीयांमध्ये उत्तरायणला देवांचा दिवस  आणि असुरांची रात्र समजली जाते . रात्र असल्याने असुरांची ताकद कमी होते असे समजले जाते  तिथीचा विचार करता यावेळी तिथीच्या वृधींची संख्या काहीशी कमी होते

          पृथीवर विविध ऋतू निर्माण होण्यासाठी हे उत्तरायण आणि दक्षिणायन महत्वाची भूमिका बजावतात . या दिवशी उत्तर गोलार्धात वर्षातील सगळ्यात छोटा दिवस आणि सगळ्यात मोठी रात्र असते तर दक्षिण गोलार्धात वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सगळ्यात छोटी रात्र असते . या दिवसापासून उत्तर ध्रुवावर दिवस होण्यास सुरवात होते . तर अशा हा दिवस जो आपल्यासाठी अत्यंत महतवाचा आहे . तर एकमेकांना उत्तरायण दिनाच्या शुभेच्छा देऊन आपण हा दिवस साजरा करूया , मी तर चाललो हा दिवस साजरा कारण्यासाठी आपण येताय ना ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?