भारत बांगलादेश मैत्री अतूट !


बांगलादेश एकेकाळी संपूर्ण पाकिस्तानची अर्थव्यवस्था चालवणारा भूभाग . १९६५ साली प्रसिद्ध झालेल्या एका आकडेवारीनुसार संपूर्ण पाकिस्तानच्या जीडीपीत ६५ % हुन थोडेसे अधिकचे योगदान हे त्यावेळच्या  पूर्व पाकिस्तानचे( पूर्व पाकिस्तानला आज आपण बांगलादेश म्हणून ओळखतो )   होते त्यावेळी पाकिस्तानला मिळणाऱ्या परकीय चलनाचा विचार करता त्यातील खूप मोठा मोठा म्हणजे ६५ ते ७० % वाटा हा त्यावेळचा पूर्व पाकिस्तानमधून   करण्यात येणाऱ्या निर्यातीचा असे पाकिस्तानची सध्याची राजधानी इस्लमबाद ची उभारणी करण्यासाठी केलेल्या खर्चातील खूप मोठा वाटा हा त्यावेळच्या पूर्व पाकिस्तान (आताच बांगलादेश ) मधून मिळालेल्या करांतुन मिळालेल्या उत्तापाचा होता   मात्र सत्तेतील वाटा जवळपास नगण्यच . देशातील आर्थिक विकासात मोठा वाटा उचलून देखील पश्चिम पाकिस्तान (आताच पाकिस्तान ) ची वसाहत असल्या सारखी वागणूक मिळत असल्याने देशाची निर्मिती झाल्यावर २४ वर्षातच पाकिस्तानपासून स्वतंत्र होत जगाच्या नकाश्यात स्वतंत्र देश म्हणून ओळख निर्माण करणारा देश म्हणजे बांगलादेश . देशाचा जीडीपी मोजण्याचा ज्या विविध पद्धती आहेत त्यापैकी जीडीपी पर कॅपिटा या पद्धतीचा विचार केल्यास  सध्या  आशिया खंडातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणारा देश . समाजातील स्त्रियांचे शिक्षणाचे प्रमाण  , लोकांना मिळणाऱ्या वैद्यकीय
सुविधा , लोकांना उपलब्ध असणाऱ्या प्रसाधनगृहांची संख्या, लोकांच्या पक्क्या  घराची संख्या  सारख्या मानवास जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींचा  विचार करून तयार करण्यात येणाऱ्या मानवी राहणीमान निर्देशकांच्या काही घटकामध्ये भारतापेक्षा खूपच सरस कामगिरी करणारा देश म्हणजे बांगलादेश . तर अश्या बांगलादेशचे वाणिज्य मंत्री टिपू मुन्शी हे २२ आणि २३ डिसेंबर रोजी भारताच्या भेटीवर येत आहे त्यावेळी ते भारताचे वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतील

भारताच्या मदतीने जगात स्वतंत्र अस्तिव मिळालेल्या  बांगलादेशचा भारताबरोबर मोठा व्यापार आहे .दक्षिण आशियाचा विचार करता भारताचा सर्वात मोठा व्यापारी साथीदार म्हणजे बांगलादेश . तर बांगलादेशचा विचार करता त्यांचा आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा व्यापारी साथीदार म्हणजे भारत कोविड च्या वैश्विक साथीमुळे दोन्ही देशातील व्यापारात   व्यत्यय आला असूनही,  आर्थिक वर्ष  आर्थिक वर्ष२०२० -२१  मध्ये १०

अब्ज ७८ लाख अमेरिकी डॉलरचा व्यापार झळा तर  आर्थिक वर्ष २०२१ _२२ मध्ये त्या मध्ये जवळपास ४४ % टक्क्यांची वाढ झाली यावेळी  दोन्ही देशात १८ अब्ज १४ लाख अमेरिकी डॉलरचा व्यापार झाला यावरून भारत बांगलादेश यांच्यातली व्यापारी संबंध लक्षात येतात

याच व्यापारी संबंधांना बळकटी आणण्यासाठी या वर्षांचा सुरवातीला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हयांनी बांगलादेशला भेट दिली असताना दोन्ही देशांमध्ये   Comprehensive Economic Partnership Agreement (CEPA) करण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या होता या प्रकारचा करार  दोन्ही देशामध्ये करण्याचा निर्णय बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारत भेटीवर आल्या असतानाच झाला होता . २२ आणि २३ डिसेंबर रोजी बांगलादेशचे वाणिज्य मंत्री टिपू मुन्शी या कराराला अधिक गती येण्यासासाठी प्रयत्नशील राहतील तसेच भारताकडून गहू आयात करण्याविषयी बोलणी करण्याची शक्यता आहे रशिया युक्रेन युद्धामुळे जगभरात वाढलेली महागाई आणि अन्नधान्याचा तुटवडा   विचारत घेऊन भारताने कमी उत्पन्न असलेल्यारताने अफगाणिस्तान, म्यानमार, सुदान आणि येमेनसह गरजू देशांना 1.8 दशलक्ष टनांहून अधिक गहू निर्यात केला आहे.त्याच प्रकारची मदत मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल  बांगलादेशातील ताग आणि ज्यूटपासून बनवलेल्या उत्पादनांवर डम्पिंगविरोधी शुल्काचा मुद्दाही ते उपस्थित करू शकतील . भारताने जानेवारी २०१७ मध्ये बंगलादेशातील ज्यूटवर अँटी-डंपिंग शुल्क लागू केले होते जे या वर्षी ३१  डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आले आहे.

परदेशातून मोठ्या प्रमाणत आयात होणाऱ्या मात्र आपल्या देशात सुद्धा काही प्रमाणत तयार होणाऱ्या उत्पादनांच्या बाबतीत  स्वदेशातील उत्पादकांचा हिताचा विचार करत देश आयातीबाबत काही बंधने टाकू शकतो . हि बंधने शक्यतो परदेशातून आयात होणाऱ्या मालाची किंमत स्वदेशी उत्पादक  आकरत असलेल्या किंमतपेक्षा कमी असल्यास त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ परदेशी उत्पादकांचा आहारी जाऊन स्वदेशी उत्पादकांना बाजरपेठेतून

पाय काढावा लागू नये यासाठी लावण्यात येतात त्यास  डम्पिंगविरोधी शुल्क असे म्हणतात अश्या प्रकारे शुल्क आकारल्यास आयात काही प्रमाणत महाग होऊन स्वदेशी उत्पादकांच्या बरोबरीने परदेशी उत्पादकांना किमती ठेवाव्या लागतात .ज्यामुळे निकोप स्पर्धा होते भारताने या प्रकारचे शुल्क बांगलादेशातील ज्यूट उत्पादकांना लावले आहे त्यामुळे बांगलादेश भारतावर काहीसा नाराज आहे

ईशान्य भारतात केंद्र सरकार मोठ्या प्रमाणत विकासप्रकल्प उभारत आहे ज्यामध्ये बांगलादेशचे मोलाचे सहकार्य मिळत आहे त्या पार्श्वभूमीवर या आर्थिक घडामोडी भारतासासाठी अत्यंत महतवाच्या आहेत


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?