वर्षाची अखेर भारतीय बुद्धिबळप्रेमींसाठी सुखद होणार ?

 


 या २०२२ वर्षाची अखेर भारतीय बुद्धिबळप्रेमींसाठी सुखद होण्याची दाट शक्यता आहे . कारण २६ डिसेंबरपासून काझकिस्तानच्या आलमाटी या शहरात रंगणाऱ्या बुद्धिबळाच्या जलद (रॅपिड ) या  प्रकारच्या खेळातील  बुद्धिबळाचा  विश्वविजेता ठरवण्यासाठी होणारी स्पर्धा तसेच २९ आणि ३० डिसेंबरपासून अति जलद ( ब्लिट्झ ) या  प्रकारच्या खेळातील  बुद्धिबळाचा  विश्वविजेता ठरवण्यासाठी होणारी स्पर्धा . बुद्धिबळ क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते महिला आणि पुरुष या वर्गात होणाऱ्या या स्पार्धांमध्ये भारतीय बुद्धिबळपटूंना विजयश्री मिळण्याची खूप मोठी संधी आहे जर हि शाक्यता वास्तवात उतरली तर भारतीय बुद्धिबळप्रेमींची वर्षअखेर गोड होणार हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे या आधी ग्रँडमास्टर विश्वनाथन आंनद यांनी २०१७ या वर्षी खुल्या गटात जलद बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद आपल्या खिश्यात घातले होते तर ग्रँडमास्टर कोनेरू हंपी यांनी२०१९  या वर्षी महिला गटात या वर्षी जलद बुद्धिबळ स्पर्धेदरम्यान जलद प्रकारात विश्वविजेतेपदाला गवसणी घातली होती.

    स्पर्धात्मक पातळीवर बुद्धिबळ खेळाडूंना दोन्ही खेळाडूंना एक घड्याळ देण्यात येत  खेळाडूने खेळी केल्यावर आपल्या घडाळ्याचे बटन दाबायचे असते खेळाडूने बटन दाबल्यावर त्या खेळाडूंचे घड्याळ बंद पडते आणि प्रतिस्पर्ध्याचे सुरु असते .जर एखाद्या खेळाडूने चाली करण्यास जास्त वेळ लावला तर त्याची जास्त वेळ संत एखाद्या खेळाडूने कमी वेळ लावल्यास त्याची बरीच वेळ शिल्लक

राहते जर एखाद्या खेळाडूची वेळ शिल्लक राहिली आणि एखाद्या खेळाडूची वेळ संपल्यास वेळ संपणाऱ्या खेळाडूची स्थिती कितीही उत्तम असली तरी तो खेळाडू हरतो बुद्धिबळाच्या पारंपरिक प्रकारात (क्लासिकल )प्रत्येक खेळाडूला दिंड तास देण्यात येतो तर जलद प्रकारात हीच वेळ प्रत्येकी १५ ते २० मिनिटे असते तर अति जलद स्पर्धेत हीच वेळ ५ मिनिटे ते १० मिनिटे इतकी दिलेली असते आपण पारंपरिक बुद्धिबळ स्पर्धेला क्रिटेटमधील टेस्ट मॅचची उपमा दिली तर जलद प्रकारास (रॅपिड ) वन डे आणि अति जलद प्रकारास (ब्लिट्झ ) टी २० म्हणता येऊ शकते डिसेंबरच्या शेवटच्या आठवाड्यत जलद आणि अतिजलद प्रकारातील सामने खेवण्यात येणार आहेत  

    बुद्धिबळ  क्षेत्रात कार्यरत व्यक्तींच्या मते पुरुष खेळाडूंच्यापेक्षा महिला बुद्धिबळ खेळाडूंना विजयाची अधिक शक्यता आहे १०३ खेळाडू खेळत असणाऱ्या महिलांच्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर हारिक द्रोणवली आणि कोनेरू हंपी, यांना अनुक्रमे सहावे आणि सातवे मानांकन मिळाले आहे या दोन खेळाडूंसह ग्रँडमास्टर आर वैशाली , ग्रँडमास्टर पद्मिनी राऊत , ग्रँडमास्टर तानिया सचदेव . आणि मराठमोळी नागपूरच्या रहिवाशी ग्रँडमास्टर दिव्या देशमुख या भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत पुरुष संघाचा विचार करता नाशिकचे भूषण तरुणाईचे आयकॉन सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी , ग्रँडमास्टर अर्जुन एरिगासी ग्रँडमास्टर  निहाल सरीन , ग्रँडमास्टर पेंटाला हरीकृष्णा , ग्रँडमास्टर डी गुकेश , ग्रँडमास्टर सूर्या शेखर गांगुली , ग्रँडमास्टर  एसएल नारायनन 

ग्रँडमास्टर अरविंद चितांबरम हे भारताच्या पुरुष संघाचे प्रतिनिधित्व करतील गेल्या दीड ते पावणेदोन वर्षात अबुधावी ,दुबई , कोलकत्ता आदी जगभरात विविध ठिकणी झालेल्या स्पर्धा भारतीय बुद्धिबळपटूंनी आरामात जिंकल्या आहेत त्यामुळे  तोच  झंझावात कायम राखत भारतीय  ही स्पर्धा आपल्या खिश्यात घालतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे जे आपल्या सर्व भारतीयांसाठी अभिनंदनास्पद आहे यात शंका नसावी 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?