सिंहावलोकन २०२२ भारताचे शेजारी

   


 सध्या चालू ग्रेनीयन कॅलेंडर संपण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक आहेत . त्यामुळे हे दिवस सरत्या वर्षाचा आढावा घेण्याचे आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये . हे सरते २०२२ वर्ष भारताच्या सीमा लागलेल्या देशांचा विचार करता अत्यंत वादळी ठरले . भारताच्या सर्व शेजाऱ्याच्या बाबत हे वर्ष अनेक घडामोडींची भरलेले राहिले . ज्यामध्ये श्रीलंकेत आर्थिक स्थितीमुळे उद्भवलेली अराजकतेची स्थिती , पाकिस्तानातील राजकीय अंदाधुंदी , नेपाळ मधील सत्तेचा पेचप्रसंग , बांगलादेशमधील पंतप्रधानविरोधात सुरु असणारे आंदोलन , अफगाणिस्तानच्या विविध फतव्यामुळे ढासळली त्यांची आर्थिक स्थिती , अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात सीमेवर झालेल्या चकमकी , चीनमध्ये राष्ष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या विरोधात उठाव झाल्याची शक्यता , चीनचे सर्वेसर्वा म्हणून शी जिनपिंग यांचा झालेला उदय ,आदी विविध  घडामोडींचा विचार करावाच लागेल

     गेल्या वर्षाचा शेवटच्या काही महिन्यापासून  ढासळत असलेली श्रीलंकेची अर्थव्यवस्था या वर्षी पूर्णतः ढासळली . नैसर्गिक इंधनाची अभूतपूर्व टंचाई श्रीलंकेत निर्माण झाली . माहागाईचा दर अतिशय प्रचंड प्रमाणत वाढला सन १९४८ ला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासूनची सर्वात वाईट आर्थिक स्थिती देशाने यावेळी अनुभवली .देशाच्या पंतप्रधानाने देश आर्थिक दिवाळखोर झाल्याचे संसदेत जाहीर केले   देशातील आर्थिक स्थिती हाताळता न आल्याने


देशाच्या राष्ट्रपती ,पंतप्रधान यांनी देश सोडला , संतप्त नागरिकांनी देशाच्या पंतप्रधानाचे खासगी घर पेटवून दिले . राष्ट्रपतींच्या सरकारी निवासस्थानकावर नियंत्रण मिळवत तेथील वस्तूंची तोडफोड केली . देशात आर्थिक प्रश्नावरून गृहयुद्ध पेटते का ?असे वाटवेअशी स्थिती निर्माण झाली . शेवटी श्रीलंकेत  काळजीवाहू सरकार स्थापन करण्यात येऊन त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत मागितली सध्या श्रीलंकेची आर्थिक स्थिती सुधारत असली तरी अशक्यच आहे 

राजकीय संसदेचा अस्थिरतेचा शाप लागलेल्या पाकिस्तानात यंदा एप्रिलपासून राजकीय लाथाळ्यांना मोठ्या प्रमाणत सुरवात झाली सध्याचे सरकार देशाची स्थिती हाताळण्यास पूर्णतः अपयशी ठरले आहे असा आरोप करत यावर्षाच्या एप्रिल महिन्यात इतरवेळी एकमेकांचा अपमानच करणाऱ्या पक्षांनी एकत्र येत त्यांच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव त्यांच्या संसदेत मंजूर करून घेतला आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू शहाबाज शरीफ यांनी  पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली हे सत्तांतरण अमेरिकेच्या  मदतीने झाले आहे जे जन मताच्या विरोधात आहे विरोधकांना मी त्यांच्या भष्ट्राचाराविरोधी मोहीम सुरु केल्याने त्यांनी त्यापासून वाचवण्यस्साठी त्यांनी हे सत्तांतरं केले त्यांचा हेतू पाकिस्तानचे कल्याण नसून स्वकल्याण आहे असा आरोप करत इम्रान खान यांनी आंदोलन सुरु केले जे आता अत्यंत निर्णायक स्थितीत पोहोचले आहेया खेरीज पाकिस्तानने या वर्षी त्यांच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी पूर अनुभयवाला 

 पाकिस्तान  आणि अफगाणिस्तान हे संबंध देखील या वर्षी बरेच तणावाचे राहिले पुरुषांच्या क्रिकेट आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघाच्या समर्थकांनी दुबईमध्ये एकेकाच्या विरोधात मारामारी केली तसेच दोन्ही देशाच्या सीमेवर बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या ज्यामध्ये दोन्ही देशातील निष्पाप नागरिकांचा बळी गेला दोन्ही देशातील व्यापार बंद झाला याबाबत बोलणी करायला गेलेल्या पाकिस्तानच्या उप्परराष्ट्रमंत्री हिना रबानी खान यांना अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्याने भेट नाकारली अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथे पाकिस्तानच्यावकिलातीसमोर मोठा स्फोट झाला ज्यातून पाकिस्तानचे अफगाणिस्तानमधील राजदूत आणि त्यांचा वाहन चालक अत्यंत थोडक्यात  बचावले अफगाणिस्तानच्या तालिबाईं राजवटीचे भयानक परिणाम या वर्षी दिसून आले तेथील आरोग्यवस्था पूर्णतः कोलमडली सध्या साध्या आजारांनी त्यांचे  नागरिक मेले . पूर्वी श्रीमंत आयुष्य जगणारे अनेक बुद्धिजीवी लोक प्रचंड गरीब झाले 

चीनमध्ये दर पाच वर्षांनी होणारे चीनच्या कम्युनिष्ट पक्षाचे अधिवेशन यया वर्षी झाले चीनचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची ताकद आणि माझी त्याच्या आड  येणाऱ्या व्यक्तीचा कसा नाश  केला जातो हे जगाने यावेळी बघितले  चीनमध्ये मोठी  बँकिंग समस्या निर्माण झाल्याची आणि शी जीनपिंगच्या विरोधात तियान्मेन उठावाची आठवण करून देईल असा उठाव झाल्याचा बातम्या देखील चीनच्या बाबतीत आल्या याखेरीज तैवान प्रश्नावर चीनने आक्रमक भूमिका घेतल्याचे यावेळी दिसले कोव्हीड १९ च्या विरोधात लादण्यात आलेल्या लॉक डाऊन विरोधात यावेळी चीनमध्ये मोठे आंदोलन झाले 

बांगलादेशमध्ये विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात  विरोधी पक्षाने मोठे आंदोलन झाले जे अजूनही सुरु आहे बांगलादेशमध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांच्यावर होणारे अत्याचार या वर्षी वाढलेले दिसले  नेपाळमध्ये तेथील संसदेच्या निवडणुका झाल्या मात्र तत्या ठिकाणी कोणत्याच पक्षाला बहुमत न मिळाल्याने राजकीय पेचप्रसंग झाला जो अजूनही सुरु आहे 

एकंदरीत सरते वर्ष खूपच धुमसचक्रीचे ठरले हे नक्की 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?