सिंहावलोकन २०२२ सार्वजनिक वाहतूकव्यवस्था

         


 इंग्रजी नववर्ष सुरु होण्यसासाठी आता मोजकेच दिवस बाकी आहेत. या सरत्या २०२२ वर्षाचा विचार करता सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा विचार करता, अनेक बदलांचे वर्ष ठरले, कोणत्याहीउ देशाच्या प्रगतीत त्या देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते त्यामुळे आपल्या भारताचा विकासाचा अभ्यास करताना हे बदल अत्यंत महत्त्वाचे ठरतात .चला तर मग जाणून घेउया हे बदल

    आपल्या भारतात दोन प्रकारची सार्वजनिक  वाहतूक आहे त्यातील पहिली म्हणजे  सर्व भारतभर पसरली आणि केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली येणारी आपली भारतीय रेल्वे तर दुसरी आहे वेगवेगळ्या राज्य सरकारच्या अधिपत्याखाली कार्यरत असणारी त्या त्या राज्याची स्वतंत्र अशी सार्वजनिक परिवहन सेवा ज्यास सर्वसाधारणपणे एसटी असे संबोधनात येते . सरत्या २०२२ वर्षात दोन्ही प्रकारच्या वाहतूक व्यवस्थांमध्ये मोठ्या प्रमाणत बदल झाले पहिल्यांदा आपण रेल्वे या सर्व भारतभर पसरलेल्या वाहतूक व्यवस्थेबाबत बोलूया  या वर्षी रेल्वेच्या संदर्भात वंदे भारत एक्स्प्रेस , विद्युतीकरण ,मालवाहतुकीच्या सोयीसुविधा वाढवणे  तसेच रेल्वेची सुरक्षा वाढवणे,रेल्वेगाड्यांची गती वाढवणे  यांची मोठ्या प्रमाणत चर्चा झाली .

     अत्यंत सुखसोयीने युक्त असणाऱ्या आधुनिक अश्या वंदे भारत रेल्वेचे जाळे विस्तारण्यावर या वर्षे सरकारचा भर राहिला वर्षाच्या अखेरच्या बुधवारपर्यंत देशात  नवी दिल्ली ते कटरा , नवी दिल्ली ते वाराणसी . अह्मदाबाद ते मुबई , नागपूर ते बिलासपूर चेन्नई ते बंगळुरू आणि कोलकत्ता ते दिनदयाळ उपाध्याय जंक्शन या सहा वंदे भारत ट्रेन कार्यरत आहेत भविष्यात यांची संख्या मोठ्या प्रमाणत वाढवण्याचे रेल्वेचे नियोजन आहे . रेल्वेच्या विद्यतीकरणास यावर्षी अत्यंत वेगाने गती देण्यात आली फेब्रुवारी २०२२ मध्ये अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे

डिसेंबर २०२३ पर्यंत देशात संपूर्ण रेल्वेचे विद्युतीकरण केले जाणार आहे . जेव्हा ते जाहीर केले त्यावेळी सुमारे दोन वर्ष या कामासाठी निर्धारित करण्यात आली होती त्यातील एका  वर्षाची अर्थात ५० % कालावधीची सांगता येत्या ३१ डिसेंबरला होईल या एका एक वर्षात रेल्वेने आपले काम जवळपास पूर्ण केले आहे मराठवाड्यतील विद्यतीकरणाकरणावरून आपण पिंडी ते ब्रह्मांडी , घरोघरी मातीच्या चुली या म्हणीचा आधार घेत देशातील विद्युकीकरणाबाबत अंदाज बांधू शकतो आतापर्यंत  मराठवाड्यातील महत्वाचा रेल्वेमार्ग असलेल्या मनमाड ते  हुजूर साहेब जंक्शन नांदेड या मार्गावर  छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद ) ते परभणी या दरम्यानचा भाग वगळता अन्यत्र सर्वत्र विद्युतीकरणचे काम अंतिम टप्यात आहे आणि राहिलेल्या परभणी ते छत्रपती संभाजी नगर ( औरंगाबाद )  या टप्यातील विद्युतीकरणाचे काम वेगाने प्रगती करत आहे  रेल्वेगाड्यांची गती वाढावी यासाठी या वर्षी अनेक पॅसेंजर गाड्या बंद करून त्याठिकाणी एम. यु . आणि डेमू या प्रकारच्या गाड्या सुरु करण्यात आल्या तसेच रेल्वे धावत असतानारुळाच्या वळणावर गाड्यांची कॅमिओ होणारी गती लक्षात घेऊन टिल्लीटिंग प्रकारची रेल्वे सुरु करण्याबाबतचा अभ्यासाची या वर्षी घोषणा करण्यात आली आपण जसे महामार्गावर वेगाने दुचाकीने प्रवास करताना वळणावर गती कमी करण्याच्या ऐवजी थोडेशे झुकून गती कमी ना करता पुढे प्रवास करतो त्याच धर्तीवर या रेल्वे असतील   .                  

     रेल्वेला प्रवाशी वाहतुकीपेक्षा जास्त महसूल मालवाहतुकीतून मिळतो.  मात्र गेल्या काही वर्षात लोकप्रिय राजकारणाच्या कलामुळे याकडे दुर्लक्ष झाले जे दूर करण्याचा प्रयत्न यावर्षी मोठ्या प्रमाणत करण्यात आला ज्यामध्ये नव्या डब्याच्या निर्मितीस चालना देणे आणि डेडीकेडेड फ्रेड कॉरीडॉरच्या निर्मितीस अधिक निधी उपलब्ध करून देणे ,  जो  डेडीकेडेड फ्रेड कॉरीडॉर तयार झाला आहे त्याचा वापर सूर करणे आदी गोष्टी अमलात आणल्या गेल्या . इस्टन डेडीकेडेट फ्रेड काँरीडाँर , आणि वेस्टर्न डेडीकेडेट काँरीडाँर जून 2023पर्यत पुर्णतः वापरण्यास सुरवात करण्याचे रेल्वेचे निजोजन आहे त्यामुळे याचा कामासाठी त्यांत गती यावर्षी देण्यात आली मालवाहतुकीसाठी लागणाऱ्या डब्याची गरज लक्षात घेऊन यावर्षी एप्रिल महिन्यात येत्या वर्षात तब्बल ९० हजार मालवाहतुकीचे डब्बे बांधण्याची आणि त्यासाठी  रेल्वेने ३१ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली यासाठी करावयाच्या प्रशासकीय बाबींचा मान्यतेचा विचार केला असता  रेलेच्या या संदर्भातील काम बघणाऱ्या रेल डिझायन स्टॅंडर्ड ऑर्गनाझेशन हे फक्त एका दिवसात यास मान्यता दिली आतापर्यतच्या रेल्वेच्या इतिहासातील ही विक्रमी वेळ आहे

  या खेरीज रेल्वेचे अपघात टाळण्यासाठी कवच या सुरक्षा प्रणालीची यशस्वी चाचणी मार्च रोजी करण्यात आली नेक देशांंमध्ये या सारखी प्रणाली या आधीच कार्यान्वित असली तरी, त्यासाठी प्रतीकिमी 2कोटी रुपये खर्च होतो.तर भारतीय रेल्वेत वापरल्या  जाणाऱ्या कवच या प्रणालीस या खर्च्याचा 25% म्हणजेच फक्त 50लाख रुपये खर्च होणार आहे. ल्वेची एक उपकंपनी असलेल्या रिसर्च अँड स्टँटेस्टिक डेव्हलपमेंट आँरगनायझेशन या उपकंपनीचे या कामात मोठे साह्य झाले आहे.तसेच ईशान्य भारत आणि काश्मीर रेल्वेच्या नकाश्यात आणण्यस्साठी रेल्वेने यावर्षी खूप मोठ्या प्रमाणत प्रयत्न केले

 आता वळूया एसटीकडे तर आपल्या राज्यात प्रत्येक राज्याची स्वतंत्र अशी एस्टीसेवा आहे जिचे नियमन प्रत्येक राज्यसरकार आपल्या पद्धतीने करते त्यामुळे याच्या संचालनच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत  देशाच्या 

एकूण दळवालानात याच्या एकत्रित वाटा खूप मोठा आहे प्रत्येक राज्यातील कानाकोपऱ्यात याचे जाळे पसरले आहे रेल्वेच्या नकाश्यात आलेले कितीतरी भाग सुद्धा यामुळे देशाशी जोडले गेले आहेत असो

        आपल्या महाराष्ट्राचा विचार करता सार्वजनिक बस वाहतुकीचा विचार करता या वर्षाची सुरवात एसटी कर्मचाऱ्याचा संपणे झाले संपकाऱ्यांचाएसटीचे राज्य सरकारमध्ये पूर्णतः विलीनीकरण या  मुख्य मागणीसंदर्भात विशेष काहीही ठोस करता हा संप संपला देशाच्या इतिहासात रेल्वेच्या संपानंतर चाललेला मोठा संप म्हणून या कडे बघतात या खेरीज जून या आपल्या महाराष्ट्र एसटीच्या स्थापना दिनापासून आपल्या सेवेत शिवाय या ब्रँडनेमखाली इलेट्रीक बससेवा सुरु करणे , तसेच जुलै महिन्यापासून मनीचा वापर करत एसटीतील तिकीट काढण्याच्या सेवेचा शुभारंभ करण्यात आला यावर्षी संपानंतर एसटी बसेसची सेवा सुरु केल्यानंतर बसेसच्या नादुरुस्तीचे प्रमाण वाढल्याच्या अनुभव प्रवाश्याना दिसून आले पूर्वीच्या तुलनेत अपघाताचे प्रमाण देखील वाढले  महाराष्ट्र एसटीकडून कमी प्रदूषणकारी असणाऱ्या बीएस प्राणिलच्या बसेस ताफ्यात अन्य्यास सुरवात केली जुन्याआयुष्यमान संपलेल्या बसेसचा वापर करण्याचा मुद्दा यावर्षी चर्चेत आला

   इतर राज्यातील एसटीचा विचार करता  देशभरातील एल .एन. जी.वर चालणारी पहिली एसटी बस चालवण्याचा मान, गुजरात राज्य परीवहन महामंडळाला मिळाला आहे. गुजरात एसटीच्या विश्वामित्र या विभागातर्फे (बडोदा जिल्हा विभाग) नुकतेच याच्याशी संबधीत बसची प्रादेशिक वाहतूक विभागाकडे नोंदणी करण्यात आली. मुळच्या डिझेल बसमध्ये बदल करत, तीला एल. .एन.जी. इंधनावर चालवण्यासाठी सक्षम करण्यात आले आहे. एल. एन.जी या इंधनामुळे प्रदुषणात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. गुजरात राज्यातील एसटीबसमध्ये त्यांची बाय  अशी आसन रचना असलेल्या नव्या बसेस दाखल करण्यात आल्या महाराष्ट्र एस्टीमसमध्येइलेट्रैक बसेस दाखल होण्याच्या जरा आधी गुजरात एसटीमध्ये इलेट्रैक बसेस दाखल करण्यात आल्या गुजरात राज्याने महाराष्ट्र राज्यच्या थोडेसेच आधी कमी प्रदूषणकारी बीएस प्राणिलच्या बसेस आपल्याताफ्यात दाखल देखील केल्या . गोव्याने आपल्या ताफ्यातील इलेट्रीक बसेससाझे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढवले मध्यप्रदेश सरकारकडून आपल्या मृतवत झालेल्या एसटीमध्ये सुधारणा करण्याचे जोरदार प्रयत्न करण्यात आले कर्नाटक एसटी आणि केरळ एसटी यांच्या दरम्यान कोणी के एस आर टी  हे नाव वापरायचे यावरून सुरु सर्वोच न्यायालयात सुरु असणाऱ्या खटल्यामध्ये कर्नाटकाचा पराभव आणला यावर्षी हिमाचल प्रदेश तेलंगणा गुजरात आदी राज्यातील एसटीचे बाह्यरंग बदलण्यात आले

 

एकंदरीत सरत्या वर्षात देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल झाले हेच खरे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?