सिंहावलोकन २०२२ खगोलशास्त्र


ग्रेनीयन कालगणनेनुसार सध्या सुरु असणारे वर्ष शनिवारी संपेल .  खगोलशास्त्राचा विचार करता येत्या शनिवारी संपणारे वर्ष अनेक नव्या संसोधनला जन्म देणारे ठरले . यावर्षी मानवाने विश्वाची बाल्यावस्था बघितली , भारताच्या अवकाश संसंधोधनचा  मोहिमेतील दोन  महत्वाचे टप्पे टप्पा यावर्षी गाठले गेले एका दुर्मिळ खगोलीय अविष्काराचा भाग होण्याची संधी खगोल अभ्यासकांना आणि खगोलप्रेमींना मिळाली

या वर्षाचा विचार करता १२ मे २०२२ हा दिवस खगोल शास्त्राच्या इतिहासात सुवर्णक्षणांनीं लिहला जाईल गेल्या कित्येक  वर्षांपासून खगोल शास्त्रज्ञांना खुणावत असणाऱ्या आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असणाऱ्या कृष्णविवराच्या फोटो शास्त्रज्ञांना मिळाला असल्याचे यावेळी जगभरात विविध पत्रकार परिषदेमार्फत एकाचवेळी जाहीर करण्यात आलेगुरुवारी  जाहीर करण्यात आलेल्या कृष्णविवराच्या फोटो घेण्यासाठी  इव्हेंट होरायझन टेलिस्कोपमार्फत ३०० खगोल शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होते.  इव्हेंट होरायझन टेलिस्कोप  हा जगभरात विविध ठिकाणी  विखरून असलेल्या रेडिओ  टेलिस्कोपचा समूह आहे . जगभरात विखरून ठेवल्यामुळे पृथ्वीएव्हढी रेडिओ दुर्बीण उभारून होणाऱ्या निरीक्षणाएव्हढा परिणाम साधला जातो .  या आधी सन २०१९ मध्ये शास्त्रज्ञांना कृष्णविवराच्या फोटो मिळाला होता जो कन्या राशी समूहातील एम ८७ या दीर्घिकेचा होता  

जगभरातील अनेक केंद्रांवर एकाच वेळी आयोजित पत्रकार परिषदेतयावेळी , संशोधकांनी सांगितले की धनु राशीत असणाऱ्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेल्या कृष्ण विवराची प्रतिमा घेणे  M87 दीर्घिकेच्या कृष्णविवराचा प्रतिमा घेण्यापेक्षा   अधिक कठीण होते  कारण  धनु राशीत दिसणारे कृष्णविवर  हे  M87* मधील कृष्णविवराच्या फक्त एक हजारव्या आकाराचे  आहे; दुसरे म्हणजे,पृथ्वीवरून दृष्टीची रेषेचा विचार करता या दोन्हीमध्ये अनेक घटक आहेत ज्यामुळे बऱ्याच  पदार्थांमुळे दृश्यमानता अस्पष्ट आहे; आणि आपल्या दीर्घिकेतील कृष्णविवर एम ८७ मधील दीर्घिकांमधील कृष्णविवरापेक्षा  पेक्षा खूपच लहान असल्यामुळे, त्याच्याभोवती फिरत असलेल्या वायूला  ती परिभ्रमण पूर्ण करण्यासाठी काही मिनिटे लागतात, उलट M87 मधील कृष्णविवराच्या भोवती फिरण्यासाठी आठवडे लागतात. ज्यामुळे प्रतिमा तयार करणे कठीण होते

.मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात खगोलशात्राज्ञांना अजून दोन महत्त्वाचे शोध लागले त्यातील एक म्हणजे शास्त्रज्ञांना 'ब्लॅक विडो' पल्सर प्रकारचा तारा सापडला आहे  हा आहे जो त्याच्या सोबत करणाऱ्या ताऱ्यांचे वस्तुमान कमी करत आहे . ताऱ्यांच्या मृत्यूचेअनेक प्रकार शास्त्रज्ञांनी शोधले आहेत जसे  ब्लॅकहोल , रेड जायंट स्टार  व्हाईट ड्रफ स्टार , वगैरे यातील एका एका प्रकार म्हणजे पल्सर स्टार या प्रकाराची ताऱ्यांचे वस्तुमान अत्यंत कमी जागेत एकटवलेले असते परिणामी त्यांचे गुरुत्वाकर्षण देखील मोठे असते गुरुत्वाकर्षण आणि आपले वजन यांचा जवळचा संबंध असतो त्यामुळे ज्याचे पृथीवर वजन जेमतेम १०० ग्रॅम आहे त्याचे पल्सर वरील वजन कित्येक टन किलो सहज भरू शकते हा पल्सर प्रकारातील तारा स्वतःभोवती अत्यंत वेगाने फिरतो या फिरण्याच्या दरम्यान ठराविक कालांतराने या ताऱ्यातून वेगाने  अतिनील किरणे बाहेर सोडली जातात . या किरणामुळेच ते शोधता येतात  खगोल शास्त्रज्ञांनी या पल्सरचे देखील काही उपप्रकार केले आहेत त्यातीलच एक म्हणजे ब्लॅक

विडो' पल्सर हा होय  या प्रकारला हे नाव  विडो स्पायडर्सवरून घेतले गेले आहे. या कोळ्याच्या प्रजातींमध्ये, वीण खेळ बहुतेक वेळा नर कोळीसाठी घातक असतो. मादी कोळी, संभोगानंतर, तिचा नर साथीदार खाते . या प्रकारात देखील  पल्सर तारा त्यांच्या सहकारी असणाऱ्या ताऱ्याचे  वस्तुमान .कमी करतो म्हणून त्याला हे नाव देण्यात आले आहे

तर दुसरा कृष्णऊर्जा आणि विश्वच्या मृत्यू विषयी होता आतापर्यटनच्या खगोल अभ्यासकांच्या मते विश्वाची उत्पत्ती एका अकल्पनीय मोठ्या महास्फोटात झाली आणि  स्फोटाच्यावेळी बिंदुवत असणारे वस्तुमान एका बिंदूपासून बाहेर फेकले गेले या फेकले गेल्यामुळे  विश्वाचा विस्तार होत आहे . मागील 13.8 अब्जावर्षापासून हा विस्तार होतच आहे त्यातही गंमत अशी कि या विस्ताराची गती  कमी होण्याऐवजी वाढत आहे याचे  शास्त्रज्ञांच्या मते कारण म्हणजे डार्क एनर्जी. . जी दिसतं नाही मात्र घडणाऱ्या घटना बघता तिचे अस्तिव मान्यच करावे लागते असह्या ऊर्जेचे स्वरूप म्हणजे डार्क एनर्जी . या डार्क एनर्जी  या स्वरूपातीळ ऊर्जेचा  रिप्लासिव्ह ताकद  गुरुत्वाकर्षण ताकदीपेक्षा जास्त असते  आणि त्यामुळे संपूर्ण विश्वाचा विस्तार होतो.असे शास्त्रज्ञाचे आतापर्यंतचे निरीक्षण होते . या नव्या संसोधननुसार  विश्व लवकरच विलक्षण आकुंचन सुरू करेल. त्यांनी त्यांचे संशोधन जर्नल सायंटिफिक प्रोसिडिंग्स ऑफ नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये मांडले आहे. या अभ्यासामागील शास्त्रज्ञांच्या चमूने विश्वाचे एक मॉडेल तयार केले आहे ज्यामध्ये डार्क एनर्जी ही निसर्गाची स्थिर शक्ती नसून तिचे  क्विंटेसन्स प्रकारात  एक अस्तित्व आहे. हे अस्तित्व कालांतराने क्षय होऊ 

शकते.त्यामुळे पुढील ६५ दशलक्ष वर्षांत विश्वाचा वेग थांबेल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. पुढील 100 अब्ज वर्षांमध्ये  विश्वाचे  विस्तारणे थांबेल  आणि ते आकुंचन  पावण्यास सुरवात होईल  आणि त्यानंतर अब्जावधी वर्षांनी, विश्वाचा मृत्यू पूर्ण होऊ शकतो

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात इसरोची एक सहयोगी संस्था असलेल्या पुण्याच्या  इंटर  युनिव्हरसिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी (आयुका )  च्या मार्फत कृष्णविवरासंबंधी एका आपल्या समस्त भारतीयांना गौरवास्पद वाटेल अशी घोषणा करण्यात आली . त्यांनी सन २०१५ पासून राबवण्यात येणाऱ्या अॅस्ट्रोसॅट या प्रकल्पांतर्गत ५०० व्या कृष्णविवराच्या जन्म झाल्याचे संकेत टिपले आहेत असे सांगितले भारतीय अवकाश संशोधन ज्या खडतर स्थितीत अपुऱ्या साधनसामुग्रीशिवाय , तसेच प्रचंड आर्थिक काटकसर करत सुरु झाले ते बघता हा फार मोठा टप्पा आहे जो यावर्षी गाठला गेला जे खरोखरीच कौतुकास्पद आहे

१२ मे प्रमाणे १२ जुलै हा दिवस सुद्धा खगोलशात्राप्रेमींसाठी अत्यंत महतवाचा होता कारण या दिवशी कारण या दिवशी मानवाने आपल्या सभोवताली अथांग पसरलेल्या विश्वाच्या बाल्यावस्थेतील फोटो टिपला नासा या संक्षिप्त रूपाने प्रसिद्ध असलेल्या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात नॅशनल अरनेटिक्स अँड स्पेस एजन्सीकडून संचालित करण्यात येणाऱ्या जेम्स टेलिस्कोपने  छायाचित्र टिपले सदर फोटोमुळे आजपासून १३ अब्ज वर्षांपूर्वी किंवा विश्वाचा जन्म झाल्यनंतरचा  ८० कोटी वर्षानंतर विश्व कसे होते . याचा उलगडा होणार आहे .विश्वाचे सध्याचे वय बघता ८० कोटी वर्ष म्हणजे विश्वा

चा बाल्यावस्थेतील हे फोटो म्हणायला हवेत जेम्स टेलिस्कोप पृथ्वीपासून १५ लाख अंतरावरून आपल्या सभोवताली पसरलेल्या विश्वाचे निरीक्षण करणारी दुर्बीण आहे १००० कोटी अमेरिकन डॉलरपेक्षा जास्ती खर्च, तब्बल २० वर्षांचा कालावधी बनवण्यासाठी तर १०,००० पेक्षा जास्त वैज्ञानिक, अभियंते यांच्या अथक परिश्रमातून जेम्स वेब दुर्बिणीची निर्मिती करण्यात आली आहे  जी प्रकाशाच्या सर्व प्रकारच्या लहरींचे  आकलन करण्यास समर्थ आहे (मानवी डोळ्यास दिसतो तो प्रकाशाच्या अत्यंत छोटा भाग आहे मानवी डोळ्यास न दिसणारे प्रकाशाचे अनेक भाग आहेत ज्यामध्ये विविध किरणांचा समावेश होतो हे आपण लक्षात घेयला हवे ) पृथ्वीच्या वातावरणाचा अवकाश संशोधनावर काहीसा  प्रतिकूल परिणाम होतोत्यामुळे हा अडथळा दूर करण्यासाठी पृथ्वीच्या बाहेर दुर्बीण ठेवण्याचे मानवाचे प्रयत्न होते ज्यामध्ये मानवाने सर्वप्रथम हबल दुर्बीण अवकाश्यात सोडली त्यास आता तिसवर्षे झाली आहेत या काळात तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे तसेच हबलवर असणारी उपकरणे देखील खूप काळापासून कार्यरत असल्याने काहीशी मंदावली होती त्यामुळे त्यांची जागा घेणारी नवीन दुर्बीण आवश्यक होती म्हणून नासतर्फे अवकाशात नवीन दुर्बीण सोडण्यात अली ती म्हणजे जेम्स टेलिस्कोप होय जिच्यामार्फत हि छायाचित्रे घेण्यात आली आहेत   आजवर हबल ला ही पकडता न आलेल्या आणि विश्वाच्या प्रसारण पावण्याच्या स्थितीमुळे इन्फ्रारेड या प्रकाशाच्या तंरंग लांबीत गडप झालेल्या  प्रकाशाच्या त्या रहस्यावरील पडदा दूर करण्याच्या प्रकियेस जेम्स वेबने सुरवात केली

या वर्षी ८ नोव्हेंबरला ४० ते ४२ वर्षातून एकदाच होणारी चंद्र आणि युरेनस यांची युती खगोलप्रेमींनी अनुभवली यावेळी यावेळी आपणास चंद्रबिंब युरेनस ग्रहावरून जात्ताना दिसले जगभरातील हजारो खगोलप्रेमीनी याचा आंनद लुटला

२०२२ नोव्हेंबर १८ या तारखेची नोंद भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात एक मैलाचा दगड म्हणून झाली कारण  हैद्राबाद येर्थील खासगी कंपनी "स्कायरूट एरोस्पेस कंपनी" च्या मालकीचे रॉकेट घेऊन इसरोच्या मालकीच्या श्रीहरीकोटा तळावरून यशस्वी उड्डाण केले . ही घटना अत्यंत महत्वाची आहे . कारण भारतात प्रथमच एखाद्या भारतीय मालकीच्या  खासगी कंपनीचे रॉकेट उडाले आहे या आधी इसरोने अनेक अन्य देशांचे उपग्रह अवकाशात सोडले आहेत काही परदेशी कंपन्यांचे देखील उपग्रह अवकाशात सोडले आहे त्यामुळे भारत सरकार खेरीज अन्य मालकीचे उपग्रह रॉकेट सोडणे यात नवीन काही नाही नवीन 

आहे ते भारतीय मालकीच्या खासगी कंपनीच्या मालकीचे रॉकेट भारत सरकारच्या अधिपत्याखाली येणाऱ्या अवकाश संशोधन संस्थेच्या रॉकेट उड्डाण तळावरून आकाशात जाणे अवकाश संशोधन क्षेत्र कसे बदलत आहे याचा हा वस्तुस्थीतीदर्शक . पुरावाच म्हणावा

लागेल एकंदरीत सरते वर्षांनी खगोलशास्त्रप्रेमींना अनेक गोष्टी दिल्या हेच खरे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?