महिलांच्या स्वातंत्र्याची नवी पहाट !


डिसेंबर महिन्यातील पाहिला रविवार जागतिक स्तरावर महिलांचा विचार करता अत्यंत महत्त्वाचा ठरला .  इराण या देशातील महिलांच्या त्रासास कारणीभूत असणाऱ्या मॉरल पोलीस  हा प्रकार समाप्त करत असल्याची  घोषणा देशातील सत्ताधिकारी वर्गाने करण्याचा तो दिवस आहे .  इस्लाममधील शिया हा पंथ ज्या देशाचा अधिकृत धर्म आहे असा जगातील एकमेव देश अशी ओळख असलेल्या इराणच्या सत्ताधिकरी वर्गाने घेतलेल्या या निर्ययाचे वर्णन  महिलांच्या स्वातंत्र्याची नवी पहाट असे केल्यास वावगे ठरणार नाही . पाकिस्तानबरोबर सीमा असणाऱ्या इराण या देशापासून सुरु होणाऱ्या आखाती प्रदेशात महिलांवर अनेक बंधने आज २०२२ साली देखील आहेत या अनेक बंधनांपैकी एक बंधन गळून पडून महिलांच्या स्वातंत्र्यबाबत एक पाऊल पुढे पडणें जगातील महिलांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे आहे याच आखाती प्रदेशातील सौदी अरेबिया हा देश महिलांना ड्रायव्हिंगची परवानगी देणारा जगातील शेवटचा देश होता . हि बाब आपण लक्षात घेयला हवी वाहन चालवण्याच्या अधिकार आखाती प्रदेशातील व्यक्तींना मिळाला असला तरी अनेक बंधने आखाती प्रदेशातील महिलाना अजूनही आहेत ती सर्व दूर होऊन पाश्चात्य महिलांप्रमाणे सर्व बाबीत मुक्त होण्याची आशा मोरॅलिटि पोलीस हि व्यवस्था मोडीत निघाल्यामुळे निर्माण झाली आहे

    एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस आणि . विसाव्या शतकाच्या सुरवातीला  प्रामुख्याने पाश्चात्य युरोपीय देश आणि अमेरिकेत महिलांच्या स्वातंत्र्यसाठी अनेक आंदोलने झाली ज्यामुळे महिलाना देशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानासह अनेक अधिकार मिळाले . जी प्रक्रिया आज देखील सुरु आहे मात्र जगभरात सुरु असणाऱ्या या सुधारणापासून आखाती प्रदेश कितीतरी लांब होता जगभरात समाज आधुनिक समानतेची मूल्य स्वीकारत महिलांना मध्ययुगीन जोखडातून मुक्त करत असतनाला मात्र आखाती देशातील महिला मात्र मध्ययुगीन जीवनच जगत होत्या मात्र १९ व्या शतकाच्या सुरवातीच्या दिवसात या प्रदेशात नैसर्गिक इंधनाचे सापडल्याने या प्रदेशातील लोकांचा पाश्चात्य देशाशी संपर्क आला ज्यामुळे या देशात उशिरा का होईना १९७० च्या

आसपास  महिलांच्या स्वातंत्र्याबाबत बोलणे सुरु झाले मात्र त्याची गती अत्यंत कमी होती परिणामी येथील कट्टरता जिंकली आणि महिलांचे स्वातंत्र्य काहीसे कमी झाले हि कट्टरता जिंकण्यासाठी आखाती प्रदेशातील सुधारणावादी शासनकर्त्याना विरोध करणाऱ्या परंपरावादी विचारसरणीच्या लोकांना अमेरिकेने देखील मोठी मदत केली होती हे विसरून चालणार नाही हे सुधारणावादी शासनकर्ते आपल्यास आणि आपल्या मित्र देशांना हव्या असंणाऱ्या किमतीत नैसर्गिक इंधने देणार नाहीत या भीतीपोटी अमेरिकेने आखाती देशातील शासनकर्त्या वर्गाच्या विरोधातीलव्यक्तींना मोठी मदत केली या मदतीमुळेच १९७९ साली इराणमध्ये क्रांती झाली आणि आधुनिक वाटेवर चालण्यासाठी धडपडणारा इराण मध्ययुगात गेला तेथील महिलांवर अनेक बंधने आली 

महिलांनी त्यांचे डोक्यासह संपूर्ण शरीर झाकले पाहिजे हे बंधन महिलांवर आले.  महिलांनी योग्य प्रकारे पेहराव केला आहे कि नाही हे ठरवायला स्वातंत्र्य धार्मिक पोलिसांची निर्मिती करण्यात आली . या धार्मिक पोलिसांकडून इराणच्या महिलांवर अनेक अत्याचार करण्यात आले डोके नीट झाकले नाही या छोट्याशा गोष्टीमुळे अनेक महिलांना कारावासाची शिक्षा देखील भोगावी लागली या धार्मिक पोलिसांच्या अत्याचारवरील शेवटची काडी सुमारे अडीच महिन्यापूर्वी ठेवली गेली इराण या देशाच्या वायव्य भागातून देशाची राजधानी असणाऱ्या तेहरान या शहरात  येणाऱ्या एका कुर्दिश वंशाच्या कुटूंबातील महसा अमिनी नावाच्या  एका २१ वर्षीय तरुणीला या पोलिसांनी पकडले आणि पोलीस स्टेशनला नेले दोन दिवसांनी पोलीस स्टेशनच्या रुग्णालयात उपचार सूर असताना तिचे निधन झाले पोलिसांच्या मते तिला जन्मपासून हृदययाला भोक होते त्यामुळे तिचे निधन झाले कुटूंबियांनी हे नाकारले कुटूंबियांच्या मते पोलिसांनी केलेल्या पाशवी अत्याचारामुळे तिचे निधन 

झाले महसा अमिनीच्या निधनामुळे इराणमध्ये जनक्षोम उसळला . महिलांनी ठिकठिकाणी डोके झाकणाऱ्या कपड्याची जाहीर होळी केली केस कापले या महिलांच्या आंदोलनाला  देशातील पुरुषांनी देखील पाठिंबा दिला या आंदोलनामुळे इराण या देशात सुमारे ३५० ते ४०० लोक मृत्युमुखी पडले  कतार देशात सूर असलेल्या फुटबॉलच्या विश्वचषकात देखील इराणच्या खेळाडूंनी आपल्या देशाचे राष्ट्रगीत गाऊन सरकार करत असलेल्या गळ्चेपीचा निषेध केला खेळाडूंच्या या वर्तनामुळे या आंदोलनामुळे अजूनच जास्त बळ मिळाले जगात इराणची नाच्चकी झाली .  अखेर इराणचे सरकार  नमले आणि या आंदोलनाच्या मुळाशी असणारे  धार्मिक पोलिसच देशाने रदबद्दल ठरवले .

लेखाच्या सुरवातीला सांगितल्याप्रमाणे आखाती देशातील महिलांना स्वातंत्र्याच्या मोठा टप्पा अजून गाठायचा आहे मात्र त्याची सुरवात झाली हे हे नक्की


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?