भारत बदल राहा है


 गेल्या काही वर्षांपासून भारताचे परराष्ट्र धोरण अत्यंत आक्रमक होत आहे  तसेच भारताचे लष्करी सामर्थ्य देखील वाढत आहे डिसेंबर रोजी भारताच्या परराष्ट्र खात्यामार्फत आयोजित करण्यात आलेल्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत याचा अनुभव जगाने घेतला . एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या  सुरु असलेल्या युद्धाभ्यासाबाबतच्या मुद्यावरून चीनने घेतलेल्या आक्षेपावर प्रश्न विचारला असता त्यास परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिलेल्या उत्तरावरून  भारत हा आता  पूर्वीचा राहिलेला नसून अरे रा कारे म्हणणारा सामर्थ्यवान भारत झाला आहे हे जगाला पुन्हा एकदा समजले या आधी सुद्धा परराष्ट्र संबधाबाबतच कठोर भूमिका घेतल्याने भारत बदलला आहे यावर शिक्कमोर्तबाच झाले आहे    

तर मित्रानो सध्या भारत आणि अमेरिका दरम्यान उत्तराखंड येथील औली या ठिकाणी भारत आणि अमेरिका यांच्या दरम्यान लष्करी युद्धाभ्यास सुरु आहे हा  युद्धाभ्यास भारत आणि अमेरिका यांच्यातील १८ वा युद्धाभ्यास आहे सध्या ज्या ठिकाणी हा युद्धाभ्यास सुरु आहे ते औली हे ठिकाण भारत आणि तिबेट सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून  १०० किमी भारतीय सीमेत आहे मी येथे चीन म्हणत असलो तरी ते ठिकाण चीनने अनधिकृतरित्या ताब्यात ठेवले आहे असा आरोप ज्या प्रदेशाबाबत होतो त्या तिबेट सीमेपासून १०० किमी अंतरावर आहे औली या ठिकाणी युद्धाभ्यास केल्याने भारताने चीनसमवेत १९९३ आणि १९९६ साली केलेल्या कराराचा भंग होतो असा मुद्दा उपस्थित करत चीनने यावर आक्षेप घेतला आहे भारताच्या मते १९९३ चा करार चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता आणि शांतता राखण्याशी संबंधित आहे. १९९६ चा करार प्रत्यक्ष सीमारेषेवर  सैन्याच्या हालचाली आणि तैनाती संदर्भात परस्पर विश्वास विकसित करण्यासाठी दोन्ही बाजूंनी एकमेकांबाबत करावयाच्या   उपाययोजनांबद्दल होता.भारत आणि अमेरिका   यांच्यातील युद्धाभ्यासामुळे त्यावर कोणताही फरक पडत नाही भारतने कोणासमवेत आणि कुठेयुद्धाभ्यास करायचा हा भारताचा अंतगर्त प्रश्न आहे चीनने याबाबत बोलण्याची काही गरज नाही भारताकडून कराराचे उलंघन होते का याबाबत बोलणाऱ्या चीनने स्वतःच्या वर्तनावर लक्ष देत आपल्याकडून तर कराराचे उलंघन होत नाही ना ? या कडे बघावे असे   परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यावेळी सांगितले     

  भारत आणि चीन दरम्यान मे २०२० मध्ये लडाख जवळच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने घुसखोरी केल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे त्या पार्श्वभूमीवर आपण या इशाऱ्याकडे बघायला हवे असे सरंक्षण क्षेत्रातील तज्ञाचे मत आहे ३० नोव्हेंबर रोजी चीनने आक्षेप नोंदवल्यावर लगेच डिसेंबर रोजी भारताने चीनला ठणकावल्याने भारत पूर्वीचे आपले मवाळ परराष्ट्र धोरण सोडत जश्यास तसे उत्तर देणारा महासत्तेला साजेशीभूमिका घेत असल्याचे यानिमित्याने दिसून येत आहे असे याबाबत बोलले जात आहे १९६२ ऑक्टोबर नंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याचे या निमित्याने दिसून येत आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?