सिंहावलोकन २०२२ भारत आणि भारताचे शेजारी


सध्या चालू ग्रेनीयन कॅलेंडर संपण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक आहेत . त्यामुळे हे दिवस सरत्या वर्षाचा आढावा घेण्याचे आहेत असे म्हटल्यास वावगे ठरू नये . हे सरते २०२२ वर्ष भारताच्या सीमा लागलेल्या देशांचा विचार करता अत्यंत वादळी ठरले . भारताच्या सर्व शेजाऱ्याच्या शी विविध बाबतीत भारताचा संबंध आला 

        मालदीव  या भारताच्या मुख्य भूमीच्या नैऋत्य दिशेला असलेल्या इस्लामिक देशाबाबरोबर भारताचे परराष्ट्र मंत्री २६ आणि २७ मार्च रोजी मालदीवच्या राष्ट्रपतींनी दिलेल्याआमंत्रणाचा स्वीकार करत दोन दिवशीय दौरा केला भारताचा बऱ्याच प्रमाणत संबंध आला २६ आणि २७ मार्च रोजी भारताचे परराष्ट मंत्री एस जयशंकर हे मालदीवच्या दौऱयावर होते परराष्ट्र मंत्र्यांच्या या दौऱ्यात द्विपक्षीय विकास सहकार्य, उद्घाटन/हस्तांतरण आणि मालदीवच्या सामाजिक-आर्थिक विकासाला हातभार लावणाऱ्या आणि तिची सुरक्षा वाढवणाऱ्या अनेक महत्त्वाच्या भारत-समर्थित प्रकल्पांच्या शुभारंभाशी संबंधित अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या ज्यानुसार मालदीवची राजधानी असलेल्या मले शहरापासून ५० किलोमीटर असलेल्या .अड्डू या शहरात भारताची वकिलात उभारली जाणार आहे याबाबबत सहमती करण्यात आली   या दौऱ्या दरम्यान त्यांनीमालदीवमधील अड्डू शहराला भेट दिली तसेच अध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांची आणि मालदीवचे परराष्ट्र मंत्री पअब्दुल्ला शाहिद यांच्याशी चर्चा केली . मालदीवचे अध्यक्ष ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर आले होते         या दौऱ्यावर दरम्यान मालदिव आणि भारताचे दळणवळाच्या पायाभुत सोईसुविधांची निर्मिती, सायबर सिक्युरिटी,

पारंपरिक शस्त्रसज्जता,व्यापार आणि सांस्कृतिक सबंध  विविध सहा बाबींवर करार करण्यात आले. या अंतर्गत भारत मालदिवची राजधानी माले ,राजधानी शेजारच्या बेटांशी जोडण्यासाठी एकुण साडेसहा किलोमीटरचा पुल बांधणार आहे. या आधी चीनने माले शहराला दुसऱ्या बेटांशी जोडण्यासाठी चार किमीचा पुल बांधला आहे. त्यावेळी आलेल्या कटू अनुभवातून शहाणे होत यावेळी हे कंत्राट मालदिवने भारताला दिले, हा एकप्रकारे भारताचा कुटनितीचा विजय आहे या खेरीज संरक्षणावरील डिलिव्हरेबल्सच्या बाबतीत, भारताने मालदीव राष्ट्रीय संरक्षण दलासाठी दुसरे लँडिंग अॅसॉल्ट क्राफ्ट (LCA) आणि पूर्वी प्रदान केलेल्या CGS Huravee च्या बदली जहाजाचा पुरवठा जाहीर केला. या व्यतिरिक्त,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकारविधानादरम्यान मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलाला 24 उपयुक्त वाहने भेट देण्याची घोषणा केली.दोन्ही नेत्यांनी SIFAVARU येथे तटरक्षक बंदराच्या पूर्व-बांधणी टप्प्यात झालेल्या "वेगवान प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले" तसेच  भारत संपूर्ण मालदीवमध्ये 61 पोलिस पायाभूत सुविधांची रचना आणि बांधकाम करणार आहे. भारताने Addu शहरात नॅशनल कॉलेज फॉर पोलिसिंग अँड लॉ एन्फोर्समेंट (NCPLE) बांधले आहे ज्याचे उद्घाटन आपले परराष्ट्र मंत्री एस   जयशंकर यांनी त्यांच्या देशाच्या भेटीदरम्यान केले होते. याच भेटी दरम्यान पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी मालडीवाला १ अब्ज अमेरिकी डॉलरचे अतिरिक्त कमी व्यजदराचे आणि दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यात येत असल्यासाचे जाहीर केले  

  श्रीलंकेचा विचार केला असता बिमस्टेक या परिषदेच्या अधिवेशनासाठी आपले परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी श्रीलंकेला भेट दिली . श्रीलंकेच्या आर्थिक समस्येच्या काळात भारतने नैसर्गिक इंधने , अन्नधान्य यांची मदत श्रीलंकेला मनवतावादी धोरणातून केली तसेच देशाच्या आर्थिक स्थितीतून देशाला बाहेर काढणयासाठी सत्ताधिकारी वर्गाला मोठ्या प्रमाणात विविध प्रकाराकची मदत केली श्रीलंकेचा आर्थिक प्रश्न जेव्हा जगात मोठ्या प्रमाणत चर्चित होता त्यावेळी त्यांचे विविध मंत्री प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी नवी दिल्लीत भारताबरोबर देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी चर्चा करत होते श्रीलंकेच्या आर्थिक समस्येत वाढ होऊ नये म्हणून वर्षाच्या सुरवातीला दीर्घ मुदतीचे अल्प व्याजदराचे कर्ज दिले श्रीलंकेच्या आर्थिक संकटाच्या सुरवातीच्या काळात काही श्रीलंकन नागरिक जीव वाचवण्यासाठी समुदातून तामिळनाडूच्या किनाऱ्यावर येतांना पकडले गेले होते  

  पाकिस्तानचा विचार करता मार्च महिन्यापासून पाकिस्तानच्या राजकारणात सातत्याने भारताचा उल्लेख येऊ लागला.  भारताचे परराष्ट्र धोरण आणि पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण याबबाबत इम्रान खान यांनी देशात घेतलेल्या राजकीय सभांमध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाची प्रशंसा केली भारताने रशियाकडून स्वस्तात नैसर्गिक इंधने आयातकरणे सुरु झाल्यावर याला अधिकच धार आली . पाकिस्तानी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ क्लीपमध्ये भारताचा देखील उल्लेख होता .यावेळी पाकिस्तानने ऑर्गनायझेशन ऑफ इस्लमामीक कंट्रीज , संयुक्त राष्ट्र संघटनेची आमसभा  आदी विविध ठिकाणी काश्मीरचा राग अवलल्याचा अयशस्वी प्रयत्न केला          

    अफगाणिस्तानमध्ये या वर्षी भारताची वकिलात पुन्हा सुरु करण्यात आली . तालिबाबानचा उदय झाल्यावर भारताची वकिलात बंद करण्यात आली होती भारताचे अफगाणिस्तानमधील  विविध विकास प्रकल्पाचे कामकाज सुरु करण्याबाबत तालिबानने या वर्षी सहमती दर्शवली आहे मात्र डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ते सुरु झालेले नाहीत

   नेपाळचा विचार करता नेपाळच्या राजकारणात आपले स्थान मजबूत व्हावे यासाठी भारतविरोधी विधाने करण्याची परंपरा याही वर्षी सुरु राहिली नेपाळच्या पंतप्रधानांनी भारताचा दौरा केला .भूतानचा विचार केला असता  त्यांच्या जंगलाचे संरक्षण व्हावे तसेच भूतानमधील दळण वळण सुधारावे या साठी भारताने नुकताच

उपग्रह अवकाश्यात सोडला चीनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास याही वर्षी सीमा अशांतच राहिली भारताने अमेरिकेबरोबर चीन सीमेनजीक केलेल्या युद्धाभ्यासाला चीनने  आक्षेप घेतला

बांगलादेशबाबत बोलायचे झाल्यास त्यांच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी वर्षाच्या सुरवातीला आणि बांगलादेशचे वाणिज्य मंत्री टिपू मुन्शी हे डिसेंबर महिन्यात भारताच्या भेटीवर आले आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा दौरा केला या वर्षात दोन्ही देशात Comprehensive Economic Partnership Agreement (CEPA) करण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली तसेच दोन्ही देशातील दळणवलन वाढवण्यासाठी भारतातील न्यू जलपैगुडी ते ढाका दरम्यान नवी प्रवाशी गाडी सुरु करण्यात आली 

एकंदरीत भारताचा विचार करता सरत्या वर्षात शेजारील देशांबाबत खूप काही घडले 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?