पाकिस्तानचे बुमरँग


आँस्टेलियातील  आदिवासी बुमरँग नावाचे शस्त्र वापरात,जे शिकारीच्यावेळी एखाद्या प्राण्याला फेकुन मारल्यावर सुरक्षीतपणे परत व्यक्तीचा हातात येते. मात्र आदिवासींनी  प्राण्यास बुमरँग मारल्यावर ते एखाद्या वेळी फेकणाऱ्यास देखील इजा पोहचवते. असाच काहीसा बुमरँग उलटण्याचा अनुभव सध्या पाकिस्तान घेत आहे.  स्वतः च्या फायद्यासाठी ज्या अफगाणिस्तानमध्ये धर्मांध तालिबानचे विषारी झाड लावले,त्याचीविषारी  फळे आता पाकिस्तानला चाखावी लागत आहेत. पाकिस्तानचा अफगाणिस्तान मधील अँबेसी समोर झालेल्या शक्तीशाली स्फोटात पाकिस्तानचा अफगाणिस्तानमधीलअँबेसिडर आणि त्यांचा डायव्हर गंभीर जखमी झाले आहेत. शुक्रवार 2डिसेंबर रोजी रात्री हा स्फोट झाला.या दोघांचा मृत्यू अगदी थोडक्यात बचावला असे प्रसिद्धीपत्रक पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्यामार्फत काढण्यात आले आहे. सयुक्त राष्टसंघात देखील याचा निषेध करण्यात आला यावरुन या स्फोटाची भीषणता आपण समजू शकतो 
    भारताच्या विरूद्ध वापरता यावा यासाठी पाकिस्तानने दूबळ्या अफगाणिस्तानची निर्मिती केली.अफगाणिस्तानला दुबळा करण्यासाठी तेथील कट्टरतेला पाकिस्तानकडून खतपाणी देण्यात आले.प्रसंगी जग धिक्कार करत असताना अफगाणिस्तानमधील लोकांना स्वनिर्णयाचा अधिकार असल्याचे वक्तव्य करून (इम्रान खान आँगस्ट 2020 )करून तालिबानला साह्यभूत ठरण्याचे काम पाकिस्तानने केले आजमितीस मात्र पाकिस्तानचीच निर्मिती असणारे तालीबान आता पाकिस्तानवरच उलटले आहे, काबुलच्या स्फोटामुळे हेच सिद्ध होत आहे. 
या स्फोटाच्या आधी चारच दिवसापूर्वी अफगाणिस्तानमधील तालीबानची पाकिस्तानी आवृत्ती असलेल्या आणि पाकिस्तानी सरककारतर्फे दहशतवादी संघटना म्हणून जाहिर करण्यात आलेल्या तेहरीके तालिबान पाकिस्तान या संघटनेकडून पाकिस्तानात सर्व देशभर दहशतवादी हल्ले करण्याची आणि शस्त्रसंधी एकतर्फी मागे घेण्याची
घोषणा करण्यात येवून क्वेटा शहरात बाँम्बस्फोट देखील करण्यात आला होता. त्यानंतर दोनच दिवसात झालेल्या या स्फोटामुळे पाकिस्तानची पश्चिम सीमा सुरक्षीत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या आधी गेल्या सहा महिन्यात दोनदा अफगाणिस्तान पाकिस्तान सीमेवर दोन्ही देशांच्या लष्करामध्ये चकमक उडाली होती.पाकिस्तानतर्फे अफगाणिस्तान सीमेवर उभारण्यात येणाऱ्या काटेरी कुंपणामुळे दोन्ही देशातील सबंध ताणले गेल्याची त्यास किनार होती.यानंतर बराच काळ दोन्ही देशांकडून सीमेच्या आरपार होणारा व्यापार आणि दळणवळण बंद होते.ज्याचा फटका दोन्ही देशातील नागरीकांना बसला होता, अफगाणिस्तानचे तर जास्तच नुकसान झाले होते.त्यामुळे सबंध ताणले गेले होते.ज्याचे पर्यवसन पाकिस्तानी अँबेसीमधील अधिकाऱ्याचा मृत्यूचा प्रयत्न करण्यापर्यत गेला .
 काही दिवसापूर्वी झालेल्या पुरुष क्रिकेट टी20 आशिया चषक स्पर्धेदरम्यान आपण या दोन्ही देशातील शत्रुत्व बघीतले होतेच.भारत पाकिस्तान मधील शत्रुत्वावापेक्षा ते अधिक प्रखर होते.ज्यास काही प्रमाणात ही पार्श्वभूमीवर होती.
   ब्रिटीश भारतात 1893साली अफगाणिस्तान आणि भारताची सीमा निश्चित करण्यात आली.1947साली पाकिस्तान अस्तित्वात आल्यानंतर ती अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा झाली. या सीमेला अफगाणिस्तानमधील दोन्ही तालिबान सह कोणत्याही सरकारने मान्यता दिली नाही. त्यांच्यामते या सीमेमुळे अफगाणिस्तानात प्रभावशाली असलेली पठाणी जनता विनाकारण विभागली गेली.या पठाणी जनतेच्या सर्व भुभागाला अफगाणिस्तानमध्ये समाविष्ट करुन घेण्यात यावे किंवा त्यांचा वेगळा देश करावा, असी अफगाणिस्तानची मागणी आहे. त्यास पाकिस्तानचा विरोध आहे. यावरून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात अनेकदा वाद झाले आहेत.
तालिबानच्या पहिल्या कार्यकाळात तालिबानला पाकिस्तानची मोठी गरज होती.त्याच्या तूलनेत आताच्या तालिबानला पाकिस्तानची  खुपच कमी आहे. त्यामुळे हा विरोध वाढला आहे.
अफगाणिस्तानमधील तालिबानला मदत करायची तसेच अमेरीकेला देखील मदत करायची या पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणामुळे तालिबानमधील एक गट कमालीचा नाराज झाला आणि त्यांनी तालिबानची पाकिस्तानी सरकारविरुद्धच लढणारी एक शाखा वेगळी काढली  ज्यास तेहरीके तालिबान पाकिस्तान असे नाव आहे.ज्यास अफगाणिस्तानमधील तालिबानची सुरवातीपासूनच सहानभूती होती.आता अफगाणिस्तानमध्ये तालीबानची सत्ता आल्याने त्यास प्रचंड ताकद आली आहे. पाकिस्तानात पुर्णपणे शरीया लागू करावा असी त्यांची मागणी आहे. पाकिस्तानी सरकारने तेहरीके तालिबान पाकिस्तानला दहशतवादी संघटना म्हणून जाहिर केले आहे. त्यामुळे
देखील अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सबंध दुरावले आहेत जे अँबेसी च्या स्फोटातून स्पष्ट झाले आहे.
अमेरीकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनी एकदा दक्षीण आशियाविषयी बोलताना पाकिस्तानचे नाव न घेता जो देश दुसऱ्या देशात विषारी साप सोडतो त्या देशाने साप उलटा फिरुन आपल्याच देशाचा फडसा पाडू शकतो,हे लक्षात घेणे आवश्यक असल्याचे वक्तव्य केले होते,जे आता पाकिस्तानच्या सत्ताधिकारी वर्गाला चांगलेच आठवत असेल. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?