भारत जर्मनी सहकार्याच्या नव्या पर्वाला प्रारंभ


सध्या देशातील सर्वच माध्यमे गुजरात आणि हिमाचल प्रदेशासह दिल्लीतील महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार ?  दिल्लीत चालली तशी आपच्या झाडूची कमाल गुजरातमध्ये किती यशस्वी होणार ? याबाबत विविध आखाडे तर्क बांधण्यात मग्न असताना नवी दिल्लीत भारत जर्मनी सहकार्याच्या नव्या पर्वाला प्रारंभ होत आहे कारण भारताच्या दौऱ्यावर आलेल्या जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ऍनालेना बेरबॉक यांच्या शिष्टमंडळाच्या ५ आणि ६ डिसेंबरच्या दौऱ्यात अनेक विषयावर सहमती दर्शवण्यात आली  . 
         . 02 मे 2022 रोजी बर्लिन येथे आयोजित करण्यात आलेल्या  6व्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलत (IGC) दरम्यान ठरवण्यात आलेल्या मुद्याचा आतापर्यतचा प्रवास कसा झाला आहे?  याचा आढावा यावेळी घेण्यात आला  त्यावेळी पर्यावरणपूरक  आणि शाश्वत विकास भागीदारी. द्विपक्षीय संबंधांच्या विविध घटकांविषयी दोन्ही देशांमध्ये कार्य करण्याचे ठरवण्यात आले होते या वेळी या मुद्याचा आढावा घेतांना   भारताला अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्या सामायिक वचनबद्धतेवर जोर देण्यात आला  -यावेळी . दोन्ही मंत्र्यांनी दहशतवादविरोधी सहकार्य आणि संरक्षण क्षेत्रात आणखी सहकार्याचा शोध घेण्यावर एकमत दाखवले . तसेच 

कॅमेरून, घाना आणि मलावी तसेच पेरू देशांचा विकास भारत आणि जर्मनींनी एकत्र करण्याच्या बाबत सहमती दाखवली  . हवामान बदलाच्या संकटाकडे जगाने  अधिक व्यापक स्वरूपात लक्ष द्यावे या उद्देश्यने मालदीव सारख्या जागतिक स्तरावर  समुद्राची जलपातळी वाढल्यामुळे समुद्रात बुडण्याचा धोका असलेल्या देशांनी स्थापन केलेल्या   स्मॉल आयलंड डेव्हलपिंग स्टेट्स (SIDS) या  संघटनेला सध्या भेडसावत असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी काय करता येईल याबाबत देखील दोन्ही देशांनी चर्चा केली भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री श्रीमती बेअरबॉक या दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांनी  भारत-युरोपियन युनियन (EU)यांच्यादरम्यान  मुक्त व्यापार करार, गुंतवणूक संरक्षण करार आणि भौगोलिक संकेतांवरील करारावरील वाटाघाटी पुन्हा सुरू करण्याचे स्वागत केले. युरोपीय युनियनमधील  भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार म्हणून, भारतीय बाजूने वाटाघाटी वेळेवर पूर्ण होण्यासाठी जर्मनीने मदत करावी अशी अपेक्षा भारताने यावेळी व्यक्त केली  याशिवाय  दोन्ही मंत्र्यांनी सर्वसमावेशक स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करार (MMPA) वर स्वाक्षरी केली भारतीय विद्यार्थी, व्यावसायिक आणि संशोधकांसाठी जर्मनीस सर्वात जास्त पसंती सध्या देण्यात येत आहे त्या पार्श्वभूमीवर 
व्हिसा अपॉईंटमेंट्स मिळवण्यात भारतीय नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्याचीगरज आणि व्हिसा प्रक्रिया क्षमता वाढवण्याची गरज जर्मनीने लक्षात   घ्यावी असे मत भारताकडून व्यक्त करण्यात आले
एकंदरीत भविष्यात महासत्ता म्हणून भूमिका जागतिक स्तरावर  बजावताना भारताला ज्या गोष्टीची गरज भासेल त्याची पायाभरणी करण्याचे मोठे काम सध्या भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात येत आहे ज्यामध्ये अनेक देशाशी भारत करार करत आहे त्याचाच एक महत्त्वाचा टप्पा या चर्चेतून गाठला गेला असे म्हटल्यास वावगे ठरू नये 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?