सिंहावलोकन २०२२ जग (राजकीय आणि आर्थिक ) सार्क देश वगळून

  


चालू ग्रेनीयन वर्ष संपायला आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे गेल्या वर्षभरात जगात काय घडले यांचा धावा घेतल्यास अनेक घडामोडी घडलेल्या दिसतात ज्यामध्ये रशिया युक्रेन यांच्यात झालेल्या इराण या देशात महिलांना बुरखा  घालण्याचा सक्तीविरोधात झालेले आंदोलन , अमेरिकेत महिलांना गर्भपाताचा अधिकार देण्यावरून झालेले आंदोलन , अमेरिकेत बंदूक बाळगल्याच्या अधिकारावरून रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रेक्तिक पक्षाच्या सदस्यांमध्ये आणि त्यांची सत्ता असलेल्या राज्यामध्ये सत्तासंघर्ष , अमेरिकेत झालेल्या त्यांच्या सभागृहांच्या निवडणुका (मिड टर्म निवडणुका ) तसेच फ्रान्समध्ये त्यांच्या अध्यक्षपदाच्या झालेल्या निवडणुका , काझकिस्तान देशात सरकारविरोधात महागाईच्या मुद्यावरून झालेले दंगे . युनाटेड किंग्डम या देशातील पंतप्रधानचे सत्तांतरण विसाव्या शतकाच्या राजकारणावर मोठा प्रभाव असलेल्या युनाटेड किंगडमच्या राणीचा अर्थात क्वीन एलिझाबेथ यांचा  मृत्यू तसेच शीतयुद्धची समाप्तीस कारणीभूत ठरलेल्या युनाटेड सोशालिस्ट सेव्हिंयत रशियाचे विघटनाच्या वेळेचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह  यांचे निधन यासह ऑस्ट्रेलिया या देशात झालेल्या संसदेच्या निवडणुकीत पर्यावरणाच्या मुद्यावरून झालेले सत्तांतरंण , आपल्या भारतासासह जगभरातील अमेरिकेसह युनाटेड किंगडम अस्या अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी ( आपल्या भारतात मध्यवर्ती बँकेला रिझर्व बँक म्हणतात तर युनाटेड किंगडममध्ये त्यास बँक ऑफ इंग्लंड , अमेरिकेत फेडरल बँक पाकिस्तानात स्टेट बँक ऑफ पाकीस्तान म्हणतात जगभरात या प्रमाणे प्रत्येक देशाची मध्यवर्ती बँक आहे )देशातील व्यजदरांमध्ये मोठे बदल करण्याचा घटनांचा समावेश होतो        

  वर्षाची सुरवात झाली काझकिस्तानमधील आंदोलनाने झाली वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात कझाकिस्तान देशातील सरकाने आपल्याकडील  महसुली आणि इतर जमा कमी आहेलक्षात आल्याने लिक्विफाईड पेट्रलियम गॅसएल पी जीवरील सबसिडी कमी करत त्याचे भाव तब्बल दुप्पट केले .सरकारच्या या निर्णयामुळे तेथील जनमत अत्यंत प्रक्षुब्ध झाले .त्यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात रस्त्यांवर हिंसक आंदोलने केली देशाच्या राजधानीच्या शहराच्या महापौरांच्या कार्यालयाची तोडाफेड केली परिस्थिती आपल्या नियंत्रणाच्या बाहेर जात आहे हे बघून तेथील प्रास्तवित दरवाढ रद्द केली मात्र तेथील आंदोलक शांत झाले नाहीत परिस्थिती आपल्या नियंत्रणात आंही हे बघून आपल्या  मंत्रिमंडळासह तेथील पंतप्रधांनी आपला राजीनामा दिला आणि देशात आणीबाणी जाहीर केली अन्य देशांना मदतीची याचना केली ज्याला रशियाने सकरात्मक प्रतिसाद देत आपले संरक्षण दल त्या देशात मदतीसाठी पाठवले      

   फ्रान्समध्ये [पहिल्या टप्यात कोणत्याच उमेदवाराला ५० % मते मिळाल्याने दोन टप्यात फ्रान्समध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये  पुन्हा एकदा इमॅन्युएल मॅक्रॉन निवडून आले एप्रिलमध्ये या निवडणुका झाल्या राहण्यासाठी लागणाऱ्या किमान खर्चात कसे राहता येईल ? निवृत्तीवेतन , निवडणूक सुधारणा  निर्वासित आणि सुरक्षितता -राष्ट्रीय प्राधान्य विरुद्ध  पूर्ण नूतनीकरण रशिया आणि नाटो युरोपीय युनियनमध्ये राहायचे की नाही ? याबाबत सार्वमत घेण्यबाबतची उमेदवारांची भूमिका आणि आपल्या भारतीयांपैकी अनेकांसाठी अत्यंत महतवाचा असणारा मुस्लिम महिलांना हिजाब घालण्यास बंदी घालण्याचा निर्णय यावर या निवडणुका लढवण्यात आल्या .      

    वर्षाच्या सुरवातीपासूनच बॅँक ऑफ इंग्लंड दारात वाढ करत होती मे महिन्यापासून अमेरिकेची फेडरल बँक आणि भारताच्या रिझर्व बँकेसह जगभरातील मध्यवर्ती बँकेकडून व्याजदरात वाढ करण्यास सुरवात झाली  याच मे महिन्यात   हवामान बदल अर्थव्यवस्था आणि सुरक्षितेचा विश्वासया मुद्यांवर ऑस्टेलियात तेथील संसदेच्यानिवडणुका झाल्या आणि गेल्या तीनसंसदेच्या कार्यकाळात पंतप्रधान असलेल्या स्कॉट मॉरिसन यांचा पक्षाला पराभव बघावा लागला 

    जून आणि जुलै महिन्यात अमेरिकेत शस्त्रास्त्र बाळगण्याच्या मूलभूत अधिकार असणे आणि महिलांना गर्भपाताचा अधिकार नसणे या दोन मुद्यांवरून प्रचंड वादंग उठले आपल्या अधिकाराच्या वापर करत न्यूयॉर्क राज्याच्या विधानसभेने शास्त्रस्त बाळगण्याच्या अधिकरावर बंदी घालणारे विधयेक पसंमत केले असे करणारे तेअमेरिकेतील  पहिले राज्य होते जून महिन्याच्या अखेरीस महिलाच्या गर्भपाताच्या अधिकारावर बंधने लादणारा निर्णय अमेरिकेच्या फेडरल सर्वोच्च न्यायालायने दिला याचअमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात काँग्रेसच्या हाऊस ऑफ रिपेझँटिव्ह या सभागृहाच्या सर्वांच्या सर्व जागांसाठी तर सिनेट या सभागृहाच्या ३३ जागांसाठीतसेच काही राज्याच्या गव्हर्नर पदासासाठी मतदान झाले यावेळी अपेक्षेप्रमाणे विरोधी पक्षाला अर्थात रिपब्लिकन पक्षाला बहुमत मिळाले

   या दरम्यान ३१ ऑगस्टला  मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन झाले विसाव्या महायुद्धाच्या राजकारणात कळीचा मुद्दा झालेल्या शीतयुद्धची सांगता ज्या यु . एसएसआर च्या पतनाने झाली ते यु . एसएसआर चे तन ज्यांच्या सहीने झाले ते म्हणजे मिखाईल गोर्बाचेव्ह होय त्यांच्या निधनाने शीतयुद्धाच्या काळात

जिवंत असणारा एक महत्वाचा मानवी दुवा निखळला आहे 

महिलांच्या पेहरावावर लक्ष ठेवणाऱ्या पोलिसांच्या विशेक्ष दलाकडून महसा अमिनी या युवतीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यावर ११ सपेठेबरपासून महिलांच्या स्वातंत्र्यच्या मुद्यावर इराणमध्ये हिंसक आंदोलन झाले ज्यामध्ये हा मजकूर लिहण्यापर्यंत ५४० लोकांना प्राणास मुकावे लागले आहे आंदोलनास मिळणार पाठींबा बघून डिसेंबरला इराणमध्ये महिलांच्या पेहरावंसंदभातील अनेक बंधने अखेर हटवण्यात आली एकंदरीत सरते २०२२ हे वर्ष जागतिक स्तरावर आर्थिक आणि राजकीय घटनांचा आढावा घेतल्यास अत्यंत वादळी ठरले 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?