देशासमोरील प्रशांचा वेध घेणारे पुस्तक द फ्री व्हाईस

   

     गेल्या काही वर्षात कोणत्या विषयाची पुस्तके प्रसिद्ध होत आहेत /याचा आढावा घेतल्यास सध्या रोजच्या जगण्यात भेडसावणाऱ्या समस्येबाबत उहापोह करणारी , सध्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती देणाऱ्या पुस्तकांची संख्या गेल्या काही वर्षात वाढलेली दिसत आहे इंग्रजी, हिंदी या भाषांमध्ये  या प्रकारची पुस्तके मोठ्या प्रमाणत प्रसिद्ध होत असली तरी त्या पुस्तकांचे मराठीत अनुवाद हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्या कमी म्हणजे जेमतेम सहा महिने ते वर्षभरात प्रसिद्ध होतअसल्याने मराठी भाषिक वाचकांना देखील जगाशी नाळ जोडणे सहजशक्य होते त्या बद्दल या प्रकारची पुस्तके प्रसिद्ध करण्याबाबत भाषांतरणं प्रसिद्ध करण्यासारखी कायदेशीर आणि अन्य तांत्रिक मदत करणाऱ्या सर्वांचे आणि पुस्तके प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांचे मनःपूर्वक अभिनंदन 
          तर याच मालिकेतील एक प्रसिद्ध पुस्तक म्हणजे न्यू  दिल्ली टेव्हीव्हीजन असे पूर्ण नाव असलेल्या मात्र एन डी टी व्ही या संक्षिप्त नावानेच प्रसिद्ध असलेल्या वृत्तवाहिनी समूहाच्या  एन डी  टीव्ही इंडिया या हिंदी भाषिक वृत्तवाहिनीचे आता आतापर्यंत प्रमुख संपादक असणारे रवीश कुमार यांनी लिहलेले  द फ्री व्हाईस हे पुस्तक . सदर पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील प्रमुख सांस्कृतिक केंद्र असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना ) च्या सह्कार्यने वाचले 
        सदर पुस्तकाचे मराठीत वितरणाचे हक्क अत्यंत माहितीपूर्ण आणि नवनवीन विषयावर पुस्तके काढणारे प्रकाशन म्हणून ओळख असणारे घोटी (तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक ) येथील मधुश्री प्रकाशकाकडे आहेत .मूळ पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर जेमेतेम सहा महिन्यात त्यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे हे विशेष/ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी अनुवादित केलेल्या या पुस्तकाची भाषा अत्यन्त प्रवाही सहज समजणारी आहे फक्त पुस्तकात मुद्रणदोष मोठ्या प्रमाणत आहेत मी वाचलेल्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत "ऱ्य' आणि  "र्य ' या बाबतच्या अनेक चुका आढळतात कदचित पुढील आवृत्तीत हा दोष काढून टाकण्यात आला असेल  
        एकाचवेळी लोकांच्या तिरस्काराचा आणि प्रेमाचा अनुभव घेणारे ज्येष्ठ पत्रकार म्हणून रवीश कुमार ओळखले जातात /पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे पत्रकार म्हणून अनेक जण त्यांच्यावर पक्षपातीचा आरोप करत त्यांच्यावर टीका करतात त्याचवेळी ते त्यांच्या टीव्हीवरील आणि आता युट्युब चॅनेलवरील व्हिडिओतून आवाज उठवणाऱ्या विषयांमुळे ते अनेकांचे आवडते आदर्श आहेत . तर अश्या व्यक्तीने लिहलेल्या या पुस्तकात ९ प्रकरणातून त्यांनी सध्या लोकशाहीला भेडसावणाऱ्या विविध समस्येवर आपले व्यक्त केले आहे त्यामद्ये कुठेही विद्यमान सरकारवर प्रत्यक्षरित्या टीका करण्यात आलेली आंही किंवा विद्यमान सरकारच्या कार्यकाळात लोकशाही मुळ्ये घसरली अशा उल्लेख नाहीये किंवा पूवीच्या सरकार सरकारच्या कार्यकलालत या गोष्टी होत्या अशी तुलना देखील आहे १८४ पानाच्या या पुस्तकात पहिल्या प्रअभिव्यक्तीची आवश्यकता यात सांगितली आहे करणात जस्टीस लोया यांच्या मृत्यूचा हवाला देत सध्या लॉग आपले मत उघडपणे समाजमाध्यमानवर मांडण्यास कचरतात असे सांगितले आहे जे निकोप लोकसष्टीसाठी अयोग्य असल्याचे सांगितले दुसऱ्या प्रकरणांत फेक न्यूज याबाबत भाष्य केले आहे फेक न्यूज कश्या प्रकारे प्रसारित केल्या जातात /त्याचा समाजमनावर कोणत्या प्रकारे प्रभाव पडतो ? फेक न्यूजच्या विरोधात जगभरात कश्या प्रकारे लस्पस्ष्ट केले ढाई लढली जात आहे हे त्यांनी काही उदाहरणासह स्पष्ट केले आहे  तिसऱ्या प्रकरणांत पत्रकारांवरील हल्ल्याबाबत 
त्यांनी भाष्य केले आहे झुंडीच्या मानसशास्त्रात आणि तयामुळे सध्याच्या लोकशाहीला कोणत्या प्रकारे धोका आहे यावर चौथ्या प्रकरणात भाष्य केले आहे लोकशाहीतील नागरिकांचे अधिकारयामध्ये पाचव्या तर वृत्तवाहिनीवरील ज्योतिषांचा सुळसुळाट यावर सहाच्या  प्रकरणात सांगण्यात आले आहे सातव्या प्रकरणात प्रेम या मानसशात्राचा विचार करता अत्यंत सकारात्मक भावना म्हणून ओळखळल्या जाणाऱ्या मानवी आयुष्यतील प्रेम या बाबत भाष्य करण्यात आले आहे . भारतीयांचा प्रेम व्यक्त करण्याचा बाबतचा संकुचित दृष्टिकोन आणि लोकांच्या प्रेमाबाबचा अत्यंतअरुंद दृष्टिकोन आणि त्यामुळे समाजात निर्माण होणारे प्रश्न याबाबत कथन करण्यात आले आहे आठव्या प्रकरणात सर्वोच्च न्यायलायच्या एका निकालाचा हवाला देत लोकांच्या खासगीपणविषयीच्या विविध पैलूंबाबतची चर्चा या ठिकाणी करण्यात आली आहे शेवटच्या  आणि ९ व्या प्रकरणात भारतीय लोकांच्या स्वातंत्र्यदिनविषयीच्या समजुतींवर भाष्य केले आहे 
      जगात प्रत्येकात काही चांगल्या बाबी असतात काही नकारत्मक क बाबी असतात तस्यां त्या रवीश कुमार त्यांच्यात देखील आहेत मात्र समर्थ रामदास स्वामी यांच्या "उत्तमाची ते घ्यावे , मिळमळीत ते टाकुनी द्यावे " या उक्तीनुसार रवीश कुमार यांच्यातील उत्तम ते घेण्यासाठी किमान एकदा तरी हे पुस्तक वाचावेच .किमान एकदा तरी डोळ्याखालून घालण्यासारखे हे पुस्तक नक्कीच आहे मग कधी वाचायला घेताय हे पुस्तक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?