अजून एक !


सध्या भारतीय बुद्धिबळपटू सातत्याने चमकदार कामगिरी करत आहेत . अनेक स्पर्धांमध्ये लक्षणीय कामगिरी करत स्पर्धांचे विजेतेपद आपल्या खिश्यात घालत असताना कोणत्याही बुद्धिबळपटूची जो बुद्धिबळातील 'किताब मिळवण्याची इछा असते तो ग्रँडमास्टर या किताबाला देखील गेल्या काही महिन्यात भारतीय बुद्धिबळपटू सातत्याने गवसणी घालत आहेत्याच मालिकेत डिसेंबर रोजी  भारताला  आदित्य मित्तल हे ७७ वे ग्रँडमास्टर मिळाले आदित्य मित्तल हे मुबईचे रहिवाशी आहेत आदित्य मित्तल हे महाराष्ट्राचे १० वे ग्रँडमास्टर आहेत .

 ग्रँडमास्टर हा 'किताब बुद्धिबळाची अंतरराष्ट्रीय संघटना फेडरेशन इंटरनॅशनल दि इचेस अर्थात फिडे या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या संघटनेकडून खेळाडूंचा गौरव करण्यासाठी देण्यात येणारा 'किताब असतो या पदकाचे काही निकष आहेत ते पूर्ण केल्यावरबुद्धिबळाची अंतरराष्ट्रीय संघटना फेडरेशन इंटरनॅशनल दि इचेस अर्थात फिडेकडून हा गौरव करण्यात येतो .  स्पेनमधील बार्सिलोना येथे सुरु असलेल्या लोबरेगाट इंटरनेशनल

बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या फेरीत त्यांनी हे यश मिळवले  ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तीन निकषांपैकी पहिला निकष  सर्बिया ओपन 2021, मध्ये  दुसरा निकष लॉब्रेगॅट ओपन 2021 आणि शेवटचा तिसरा निकष  सर्बिया ओपन 2022  पूर्ण केले मात्र या तीन निकषांप्रमाणेच २५०० इलो रेटिंग ग्रँडमास्टर होण्यसासाठी आवश्यक असतात मात्र त्यावेळी त्यांचे तेव्हढे इलो रेटिंग नसल्याने त्यांना त्यावेळी ग्रँडमास्टर हा किताब मिळू शकला नाही  त्यांनी हि औपचारिकता डिसेंबर रोजी  पूर्ण केली,सोळावर्षीय आदित्य मित्तल यांनी स्पेनचाउत्तम खेळाडू समजल्या जाणाऱ्या वाजेहो पोन्स यांना लोबरेगाट इंटरनेशनल बुद्धिबळ स्पर्धेत सहाव्या फेरीत  बरोबरी मान्य करायला भाग पडून ग्रँडमास्टर हा 'किताब मिळवला 

आपल्याकडे वैयक्तिक खेळ म्हटल्यास प्रामुख्याने भाला फेक गोळा फेक आणि वजन उचलले आदी खेळांचाच विचार करण्यात येतो बुद्धिबळासारखे बैठे मात्र या खेळासारखीच शारीरिक क्षमता जोखणाऱ्या खेळाकडे काहीसे दुर्लक्ष होते . (होय बुद्धिबळासारख्या खेळात सुद्धा शारीरिक क्षमता आवश्यक आहे बुद्धिबळाच्या खेळात तुम्ही शारीरिक तंदरुस्त असाल तर आणि तरच तुमचे प्रदर्शन ऊत्तम होते शाररिक क्षमता टिकवण्यासासाठी विशेष प्रयत्न केल्याने अनेक जागतिक स्तरावर नावाजलेल्या बुद्धिबळपटूंची खेळातील सांगता दुर्दैवी झाली आहे . )अनेकदा ऊत्तम प्रदर्शन  करूनसुद्धा द्रोणाचार्य आणि अर्जुन पुरस्कारांमध्ये आपल्याला बुद्धिबळपटू अभावानेच  दिसतात या पुरस्कारामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळते . हा मुद्दा आपण लक्षात घेयला हवा . या सारख्या अनेक अडचणींचा सामना करत मूळच्या १०० %भारतीय असणाऱ्या या खेळात भारतीय बुद्धिबळपटू अत्यंत चमकदार कामगिरी करत आहेत गरज आहे त्यांना प्रोत्साहन देण्याची . मग देणार ना त्यांना प्रोत्साहन


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?