मोदी पुतीन भेट यंदा नाय !

 


  दरवर्षी भारत आणि रशिया या दोन देशांच्या दरम्यान असणाऱ्या संबंधाला बळकटी देत दोन्ही देशातील व्यापारात वाढ व्हावी ,व्यापारात येणाऱ्या अडचणी कोणत्या ? त्या दूर करण्यासाठी काय करावे लागेल दोन्ही देशातील सांस्कृतिक  संबंध अधिक वृद्धिगंत होण्यासाठी काय पुरले उचलावीत यावर विचारमंथन होण्यासाठी   सन २००१ पासून भारत आणि रशिया या दरम्यान वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात येते सर्वसाधारणतः डिसेंबर महिन्यात या बैठकीचे आयोजन करण्यात येते .ज्यास इंडिया रशिया समिट म्हणतात . आता पर्यंत इंडिया रशिया समिटचे २०वेळा आयोजन करण्यात आले आहे  या समिटच्या वेळी  भारताचे कार्यकारी प्रमुख म्हणजेच पंतप्रधान आणि रशियाचे कार्यकारी प्रमुख अर्थात रशियन फेडरेशनचे अध्यक्ष हे एकमेकांना भेटतात सध्या भारताचे कार्यकारी प्रमुख म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत (राष्ट्रपतींना देशाचे संविधानात्मक प्रमुख म्हणतात ) तर रशियाचे  कार्यकारी प्रमुख अर्थात रशियन फेडरेशनचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन आहेत त्यामुळे हि भेट सध्या मोदी पुतीन भेट म्हणून ओळखली जाते 

 गेल्या काही वर्षांपासून २०२० चा अपवाद वगळता दर वर्षी होणारी हि इंडिया रशिया समिट यावर्षी  २०२२ ला सुद्धा होणार नाहीये २०२० या वर्षी होणारी समिट कोव्हीड १९ साथरोगाच्या उद्रेकामुळे रद्द करण्यात आली होती तर या वर्षी समिट रद्द होण्यामागे रशिया आणि युक्रेन युद्ध  दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे समिट होऊ शकणार नाही . असे कारण देण्यात आले आहे यावर्षी गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यातील निवडणुका

आणि संसदेचे हिवाळी अधिवेशन यामुळे नेहमी नोव्हेंबर महिन्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या समिटचे आयोजन डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत होऊ शकले नाही आता तर हि समिटच रद्द करण्यात आली आहे ही समिट दरवर्षी दुसऱ्या देशात आयोजित करण्यात येते म्हणजे २०१७ साली हि समिट रशियात  झाली २०१८ साली भारतात झाली २०१९ ला पुन्हा रशिया (२०२० या वर्षी हि परिषद झाली नाही)  २०२१ ला भारत  आणि २०२२ ला रशिया या पद्धतीने याचे आयोजन करण्यात येत  असते जर हि परिषद झाली असती तर पंतप्रधान मोदी रशियाच्या दौऱ्यावर गेले असते 

पाश्चात्य देशांकडून सातत्याने विरोध होत असतानां भारताने रशियाकडून नैसर्गिक इंधनाची आयात सुरूच ठेवणे रशिया आणि युक्रेन युध्दामुळॆ जगात निर्माण झालेली अन्न पदार्थांची झालेली टंचाई , तसेच वाढत्या महागाई विरीधात  भारताने घेतलेली भूमिका यामुळे या वर्षी होणारी इंडिया रशिया समिट अत्यंत महत्त्वाची ठरणार होती मात्र आता तसे होणार नाही कारण समिटच रद्द करण्यात आली आहे 

युद्ध सुरु झाल्यावर भारताने कायमच सध्याचे जग युद्धाचे नाही हि भूमिका घेतली  शांघाय को ऑपरेशन (एस सी ओ या नावाने हि परिषद अधिक प्रसिद्ध आहे ) मध्ये परिषदेच्या अधिववेशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांच्यात स्वतंत्र बैठक देखील झाली होती तेव्हा रशिया युद्ध चुकीचे असल्याने पंतप्रधान नरेंद मोदी यांनी पुन्हा एकदा सांगितले होते रशिया युक्रेन युद्धासाठी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी तसेच भारताची नैसर्गिक इंधनाची गरज भागवण्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल , आरोग्य मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री मनसुख मांडवीया आणि परराष्ट्र मंत्री डॉक्टर सुब्रम्हण्यम  जयशंकर (एस जयशंकर नावाने आपले परराष्ट्र मंत्री अधिक परिचित आहेत )यांनी रशियाचे  दौरे केले आहेत  त्या पार्श्वभूमीवर हि समिट होणार होती हि इंडिया रशिया समिट यावर्षी  २०२२ ला सुद्धा होणार नाहीये 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?