सिंहावलोकन २०२२ , भारत आणि जागतिक परिषदा,

     


हे २०२२ वर्ष भारतासाठी अत्यंत महत्वाचे ठरत आहे . जगातल्या अनेक परिषदांमध्ये भारताने या वर्षी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली या परिषदांमध्ये कॉमनवेल्थ , ब्रिक्स , जी सेव्हन  इंडिया इस्राईल यूएसए . युएइ (आय.  टू  यु टू ) कॉन्फरन्स ऑफ पार्टीज   (कॉप ) शांघाय कॉ ऑपरेशन ऑर्गनायझेशन (,एससीओ ) , जी ट्वेन्टी , युनाटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल  (यु. एन.  एस  . सी .) आदी विवध मंचावर भारताची यावर्षी दाखल घेण्यात आली

               जून महिन्याचा अखेरच्या आठवाड्यत  आपले परराष्ट्रमंत्री एस जयशंकर रंवाडा या देशात गेले  होते तिथे ते काँमनवेल्थ हेड आँफ गव्हरमेट मिटींग (जी चोगम नावाने प्रसिद्ध आहे) मध्ये पंतप्रधान मोदींचे प्रतिनिधीत्व केले दोन वर्षाच्या खंडांनंतर चोगम आँफलाईन पद्धतीने प्रथमच झाली आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी आपल्या उद्धाटनपर प्राथमिक संबोधनात, काँमनवेल्थ देशांना परस्पर सहकार्याने स्वतःच्या आर्थिक विकास साधण्याची संधी असल्याचे, तसेच परस्पर देशात सध्या आहे त्या पेक्षा अधिक दळणवळण झाले पाहिजे. एकमेकांना विविध प्रकारे तंत्रज्ञान साह्य केले पाहिजे. सध्याचा कोव्हिड,19च्या साथीनंतरच्या काळात याचे महत्त्व अधिकच वाढले आहे.भारत कँमनवेल्थ देशांना सर्वतोपरी साह्य करायला तयार आहे आदी मुद्दे मांडले

         याचवेळी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  चीनतर्फे आयोजीत करण्यात आलेल्या ब्रिक्स परीषदेच्या १४ व्या अधिवेशात आँनलाईन पद्धतीने सहभाग नोंदवला .. या दोन्ही ठिकाणी भारताने परस्पर सहकार्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकास साधत कोव्हिड१९ च्या साथीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्याचा मुद्दा हिरीहिरीने मांडला आहे. ज्याचे स्वागत करण्यात आले आहे.. १४ व्या अधिवेशाप्रसंगी आपल्या उद्घाटनपर भाषणात पंतप्रधान मोदी

यांनी संघटनेच्या देशांमध्ये विविध प्रकारचे सहकार्य वाढवण्याची गरज बोलून दाखवली.ब्रिक्सच्या अनेक उपक्रमांनी तीची उपयुक्तता वेळोवेळी सिद्ध केली आहे. त्यात अधिक चांगली वाढ परस्पर सहकार्य वाढल्यास होईल.तसेच सध्या सुरु असणाऱ्या ऊपक्रमांसह नविन उपक्रम सुरु करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.पंतप्रधान मोदी यांनी अन्य सहभागी देशांच्या प्रमुखांनी आपल्या भाषणात राजकीय भाष्य केले असून देखील  राजकीय भाष्य करण्याचे टाळले .त्यांनी आपल्या भाषणाची सुरवात जागतिक योग दिनानिमित्त. त्यांचा त्यांचा देशात झालेल्या कार्यक्रमासाठी त्यांचे अभिनंदन केले.

         भारत उभरती महासत्ता आहे ,तिचे महत्व कमी करून, तिला जागतिक व्यासपीठावरून डावलून ,जगाचे घोडे पुढे चालू शकणार नाही याची अखेर उपरती झाल्याने जर्मनीकडून त्यांच्या देशात होणाऱ्या जी या परिषदेच्या अधिवेशनासाठी  अखेर भारताला बोलवणे आले . २६ आणि २८ जून २०२२ या दरम्यान जर्मनीतील बवेरियन आल्प्स च्या श्लॉस एल्मौ येथे हे अधिवेशन  झाले भारताने संयुक्त राष्ट्रसंघात रशियाविरुद्धच्या प्रस्तावावर पश्चिम युरोपीय देशांना पूर्णपणे अनुकूल होईल अशी भूमिका ना घेतल्याने या वेळेस भारताला जी परिषेदेच्या अधिवेशनात सहयोगी सदस्य म्हणून  बोलवायचे का ? यावरून  देशांमध्ये मतभेत झाले होते.  मुख्य आयोजक असलेला जर्मनीचे मत भारताला बोलवायचे असे  होते  त्यावरून  बराच वादंग झाला होता .अखेर जी च्या ४८ व्य अधिवेशनासाठी भारताला  आमंत्रण देण्याचे ठरले २६ ते २७ जून दरम्यान जर्मनीत होणाऱ्या अधिवेशनासाठीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिनिधित्व केले

            सप्टेंबर महिन्याच्या १५ आणि १६ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुघल संस्थापक बाबरच्या मूळ गावी अर्थात समरकंद या शहराला भेट दिली त्या ठिकाणी त्यांनी  २२ व्या शांघाय को ऑपरेशन ऑर्गनाझेशनच्या २२ व्या  अधिवेशनाला हजेरी लावली या अधिवेशनात भारताकडून सीमेबाहेरून होणारा दहशतवादी हल्ला . प्रादेशिक एकात्मकता या मुद्यांवर चर्चा केली गेली

          इजिप्तमध्ये सुरु असलेल्या कॉप २७ या अधिवेशनामध्ये भारताच्या लढ्याला यश मिळाल्याचे दिसले  कारण जीवाश्म इंधने कमी करण्याच्या भारताने शनिवार १२ नोवेंबर रोजी केलेल्या  आवाहनाला सोमवारी १४ नोव्हेंबरला

अलायन्स ऑफ स्मॉल आयलंड स्टेट्स (ASIS) ची स्थापना करणार्या 39 देशांनीही पाठिंबा दिला आहे अलायन्स ऑफ स्मॉल आयलंड स्टेट्स (ASIS) . ही लहान बेट असलेल्या देशांची संघटना आहे या संघटनेतील देश समुद्रपातळीत वाढ झाल्यामुळे नष्ट होण्याच्या धोका आहे  या संघटनेसह .युरोपियन युनियन आणि युनायटेड किंगडम यांनी देखील  भारताच्या आवाहनाला पाठिंबा दिला

         वर्षाच्याअखेरच्या महिन्यात तारखेला अर्थात डिसेंबरला भारताला जी ट्वेन्टी चे अध्यक्षपद मिळाले ज्या अंतर्गत भारताच्या व्यापाराची ताकद जगाला दाखवण्याबरोबरच भारताच्या विविध शहरात सध्या जगाला भेडसावणाऱ्या दहशवादी हवामान बदल या सारख्या विविध समस्येबाबत भारत जगाला काय आउअपय देऊ शकतो हे सांगण्यस्साठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे काही शहरात या नियमित्याने कार्यक्रम झाले सुद्धा आहेत

याच  डिसेंबर महिन्यात भारताला युनाटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल  (यु. एन.  एस  . सी .) चे अध्यक्षपद एका महिन्यासाठी मिळाले या महिन्यात भारतने तिथे आपली छाप पडत पाकिस्तानकडून देण्यात येणाऱ्या त्रासाबाबत त्याची खूप कोंडी केली आहे

एकंदरीत सरते वर्ष भारतासाठी जागतिक परिषदांचा विचार करता खूप काही देणारे ठरले हेच खरे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?