आपली एसटी बदलतीये !

     


आपली एसटी बदलतीये ! होय आपली एसटी बदलतीये .एकेकाळी अस्वचतेचे आगर समजण्यात येणाऱ्या  बस्थानकांचे रुपडे पालटत आपली एसटी आता अधिकाधिक प्रवाशी हिताय होण्याकडे वेगाने वाटचाल करत आहे . एसटीच्या वाढेल तिथे प्रवास सारख्या योजनांचा फायदा घेत आपल्या एसटीतून फिरल्यास हि बाब सहजतेने लक्षात येते . बस्थानकातून बाहेर पडणाऱ्या आणि बस स्थानकात येणाऱ्या बसेसची माहिती विनासायास प्रवाश्याना व्हावी यासाठी एस्टीविशेष प्रयत्नशील असल्याचे सहजतेने समजते . वेळोवेळी होणारे  बसेसच्या वेळापत्रकातील बदल नव्याने सुरु होणाऱ्या बसेसची नोंद , बंद झालेल्या बसेसची माहिती रद्द करण्याची प्रक्रिया बस्थानकावर लावलेल्या वेळापत्रकात न करणे . किंबहुना वेळापत्रक वाचता आले तरी बेहत्तर या प्रकारच्या पद्धतीचे वेळापत्रक भिंतीवर टांगने वेळापत्रकाच्या ठिकाणी बसेसची माहितीच्या ऐवजी अन्य जाहिरातीच दिसणे त्यामुळे बसेसची व्यवस्थित माहिती ना मिळणे  . बसस्थानकात वेळापपत्रक असलेल्या भिंतीनजीक असलेली अस्वच्छता ज्यामुळे वेळापत्रक बघणे हा एक त्रासदायक अनुभव या पूर्वी असायचा मात्र हे सर्व इतिहासजमा
करण्याचा चंग एसटीने बांधला असल्याचा अनुभव एसटीतून फिरताना आपणास येतो काही अतिशय गर्दीच्या बस स्थानकावर इलेट्रीक बोर्डवर संबंधित फलाटावर कोणती बस लागणार आहे हे दर्शवणारे फलक सुद्धा लागलेले आहेत ज्यमुळे पूर्वीपेक्षा बस शोधणे सोपे झाल्याचा अनुभव मला माझ्या प्रत्येक सहलीदरम्यान येतो तो आपणास देखील आलेला असेल 

     एसटीच्या प्रत्येक बसस्थानकावर आपणास हे चित्र दिसेलच असे म्हणणे धाडसाचे ठरेल मात्र सध्या एसटीचा विचार करता पूर्वीपेक्षा मोठ्या प्रमाणात या बाबत सुधारणा झाल्या आहेत हे मात्र नक्की . त्यामुळे सध्या ज्या बस स्थानकात सध्या चित्र बदललेले नाही अश्या ठिकाणी सुद्धा हे लवकरच बदललेलं तीही बसस्थानके प्रवाशी हिताय होतील हे नक्की आणि हे बदल एसटीला इतर अनेक समस्यांनी ग्रासले असताना होत आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे या अडचणीतून मार्ग काढत एसटी हे बदल करत आहेत जे खरच स्वागतार्ह्य आहे एसटीत अजूनही सुधारणा हव्यात हा मुद्दा मान्य केला तरी गेली कित्येक वर्ष काहीच न बदलेल्या एसटीत हे बदल होत आहेत हा मुद्दा अत्यंत महत्त्वाच्या आहे आपण एसटीतील बदलाची हि सुरवात महयनु शकतो या एसटीच्या प्रयत्नांना

आपण आनंदाने स्वीकारता त्याबाबत एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास एसटी कर्मचारो आपल्या अडचणी विसरून अधिकाधिक प्रवाशी हिताय सेवा देतील ज्यामुळे एसटीचा दर्जा सुधारून आपलाच फायदा होणार आहे . 

कोणत्याही मनुष्याला काम करताना कमीत कमी अडचणी आल्यास त्या व्यक्तीला कार्यसमाधान मोठ्या प्रमाणात मिळून त्या व्यक्तीचा कामाचा दर्जा मोठ्या प्रमाणत सुधारतो आपले एसटी कर्मचारी याच बाबत मार खातात सर्वसाधारण व्यक्ती राहू शकणार नाही अश्या स्थितीत एसटी कर्मचारी राहत असल्याने त्याच्यात काही प्रमाणात पाट्या टाकण्याची वृत्ती निर्माण होते एसटी प्रवाशी हि समस्या लक्षात ना घेता त्यांच्यावर टीका करतात आणि एसटीतुन प्रवास करणे टाळतात . ज्यामुळे एसटी कर्मचाऱ्याचा अडचणीत वाढ होते परिणामी एसटी कर्मचाऱ्याचा उत्साह अजून मावळतो आणि एक दुष्ट चक्र सुरु होते याला तोडायचे असल्यास आपण

राज्याच्या महसुलात मोठी वाढ करणाऱ्या एसटीतून (एसटी १७ % कर राज्य शासनाला देते ) प्रवास करायला हवा एसटीच्या आवडेल तिथे प्रवास सारख्या अनेक योजना आहेत ज्यातून अत्यंत कमी खर्चात फिरता येते मग करणार ना फिरायला सुरवात  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?