भारतीय बुद्धिबळ विश्वाचा शेवट गोड


एकेकाळी अमेरिकन आणि रशियन खेळाडूंचा दबदबा असलेल्या बुद्धिबळ  या मुळातील भारतीय खेळात अनेक भारतीय अत्यंत चमकदार कामगिरी करत आहेत . गेल्या २०२२ वर्षाच्या अखेरचा आठवडा देखील त्यास अपवाद ठरला नाहीये बिल्ट्झ आणि रॅपिड प्रकारातील बुद्धिबळ विश्वविजेत्या स्पर्धेदरम्यान भारतीय बुद्धिबळ  . केलेल्या कामगिरीमुळे हीच गोष्ट सिद्ध होत आहे काझकिस्तान या मध्य आशियातील देशातील अलमट्टी शहारत या स्पर्धा झाल्या 

स्पर्धात्मक पातळीवर बुद्धिबळ खेळाडूंना दोन्ही खेळाडूंना एक घड्याळ देण्यात येत  खेळाडूने खेळी केल्यावर आपल्या घडाळ्याचे बटन दाबायचे असते खेळाडूने बटन दाबल्यावर त्या खेळाडूंचे घड्याळ बंद पडते आणि प्रतिस्पर्ध्याचे सुरु असते .जर एखाद्या खेळाडूने चाली करण्यास जास्त वेळ लावला तर त्याची जास्त वेळ संत एखाद्या खेळाडूने कमी वेळ लावल्यास त्याची बरीच वेळ शिल्लकराहते जर एखाद्या खेळाडूची वेळ शिल्लक राहिली आणि एखाद्या खेळाडूची वेळ संपल्यास वेळ संपणाऱ्या खेळाडूची स्थिती कितीही उत्तम असली तरी तो खेळाडू हरतो बुद्धिबळाच्या पारंपरिक प्रकारात (क्लासिकल )प्रत्येक खेळाडूला दिंड तास देण्यात येतो तर जलद प्रकारात हीच वेळ प्रत्येकी १५ ते २० मिनिटे असते तर अति जलद स्पर्धेत हीच वेळ ५ मिनिटे ते १० मिनिटे इतकी दिलेली असते आपण पारंपरिक बुद्धिबळ स्पर्धेला क्रिटेटमधील टेस्ट मॅचची उपमा दिली तर जलद प्रकारास (रॅपिड ) वन डे आणि अति जलद प्रकारास (ब्लिट्झ ) टी २० म्हणता येऊ शकते  या तिन्ही प्रकारांपकी ब्लिट्झ आणि रॅपिड प्रकारातील या स्पर्धा झाल्या       

       वर्षाच्या अखेरच्या दिवशी ग्रँडमास्टर कोनेरू हंपी, यांनी  जागतिक महिला ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिपचे ने रौप्य पदक जिंकले. ३० आणि ३१ डिसेंबर या दोन दिवशी काझकिस्तान देशातील अलमट्टी या शहरात रंगलेल्या ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत  दुसऱ्या दिवशी हम्पी यांनी पहिल्या दिवसाचे अपयश पूर्णतः धुवून काढत अत्यंत सरस  कामगिरी केली . दुसऱ्या दिवशी झालेल्या ८ सामन्यात ७ विजय आणि एका बरोबरीसह साडेसात  गुणांची कामगिरी केली   या दरम्यान त्यांनी  विजेतेपदाच्या

सर्व दावेदारना पराभूत केले ज्यामुळे खेळाडूंच्या पदकतालिकेचा सर्व चेहरामोहराच बदलून गेला.  हंपी यांनी आघाडीच्या रशियन महिला बुद्धिबळपटू  गुनिना व्हॅलेंटिना, पोलिना शुवालोवा आणि चीनच्या टॅन झोन्घाई यांच्यावर उल्लेखनीय विजय मिळवला हंपी यांच्या पहिल्या दिवसाचा खेळ अत्यंत निराशाजनक झाला पहिल्या दिवशी झालेल्या ९ डावात सुरवातीचे २ डाव त्यांना गमवावे लागले होते पहिल्या दिवशी तत्या फक्त ५ गुणाचीच कामगिरी करू शकल्या .ज्यामुळे पहिल्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा त्या पदकाच्या शर्यतीत कुठेच नव्हत्या मात्र पहिल्या दिवशीचा खेळाचा स्वतःवर परिणाम होऊ ना दिल्याने त्यांनी दुसऱ्या दिवशी फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेत दुसऱ्या दिवशी झंझावाती खेळ केला आणि रौपय पदकाची कामगिरी केली दुसऱ्या दिवसाचा अखेर एकूण साडेबारा गुणाची कमाई करत त्यांनी हि अभिनंदस्पद कामगिरी केली यादरम्यान,त्यांनी  13व्या आणि 16व्या फेरीत आघाडीच्या रशियन बुद्धिबळपटू  गुनिना व्हॅलेंटिना, आणि पोलिना शुवालोव्हा यांच्यावर विजय मिळवला आणि त्यानंतर शेवटच्या फेरीत जागतिक जलद बुद्धिबळ चीनच्या टॅन झोन्घाई यांना  पराभूत   केले, या विजयासह हम्पी यांनी  शेवटच्या फेरीत रौप्य पदकाची खात्री केली. , भारताची दुसरी बुद्धिबळ खेळाडू महिला ग्रँडमास्टर हरिका द्रोणवली यांच्या समवेतची त्यांची मॅच  खूप खास होती,  जर  ही मॅच मॅच बरोबरीत झाली असती तर हंपी याना हरिका द्रोणवली यांच्याबरोबर प्ले ऑफ चा सामना खेळावा लागला असता आणि जर तो त्यांनी जिंकला असता तर त्यांना सुवर्णपदक मिळाले असते   यापूर्वी वर्ल्ड रॅपिडमध्ये सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकल्यानंतर हंपी यांचे  हे पहिले ब्लिट्झ पदक होते.

   त्यापूर्वी २९ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या बुद्धिबळाच्या रॅपिड प्रकारातील स्पर्धेत भारताच्या 15 वर्षीय सविता श्री भास्कर यांनी  चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. सविता यांनी  अंतिम दिवशी त्यांचा  स्कोअरमध्ये दीड गुणांची भर घातली आणि 8 गुणांच्या सर्वोत्तम टायब्रेकच्या

आधारे तिसरे स्थान मिळवले त्यामुळे  जागतिक चॅम्पियनशिपच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये पदक जिंकणाऱ्या   सर्वात तरुण भारतीय खेळाडू होण्याचा मान त्यांनी मिळवला . . भारताच्या महिला बुद्धीबळ खेळाडूंचा विचार करता प्रथम क्रमांकावर असलेल्या  कोनेरू हम्पी देखील शेवटपर्यंत पदकासाठी दावेदार होत्या  त्यांनी शेवटचा सामना जिंकला असता तर त्यांनी सुवर्णपदला गवसणी घातली असती  असते, परंतु टायब्रेकमध्ये त्या  सहाव्या स्थानावर राहिल्याने त्यांचे पदक हुकले मात्र ब्लिट्झ मध्ये पदक मिळवूंन त्यांनी वर्षाचा शेवट मात्र गोड केला हे नक्की

  भारतीय पुरुष खेळाडूंनी देखील या स्पर्धेत अत्यन्त चमकदर कामगिरी केली त्यामुळे फक्त मैदानी खेळातच भारत अग्रेसर नाही हेच सिद्ध होत आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?