जनता वाऱ्यावर राजकारणी राजकारणता मग्न 

                   


 जनता वाऱ्यावर राजकारणी राजकरण्यात  मग्न असेच सध्याच्या पाकिस्तानच्या घडामोडी बघून म्हणावे लागे/ल एकीकडे मागच्या पावसाळ्यत आलेल्या महाविनाशकारी पुरामुळे देशात साठवलेल्या अन्नाचा मोठ्या प्रमाणत नाश  झाल्याने, आणि देशातील परकीय चलनाचा साठा अत्यंत न्यूनतम जवळपास शून्यवत झाल्याने देशातील आयत जवळपास पूर्णतः बंद आहे त्यामुळे देशात उद्भवलेल्या अन्नधान्याच्या अभूतपूर्व टंचाईमुळे जनता त्रासलेली असताना , देशातील राजकारणी मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्यात अत्यंत व्यस्त आहे 

             गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वाचा प्रस्ताव विरोधी पक्षांकडून मजूर केल्यावर इम्रान खान याना पदावरून पायउतार व्हावे लागले . त्यावेळी इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ यांच्या पक्षाच्या सर्व खासदारांनी (पाकिस्तानी प्रशाकीय भाषेत मेंबर ऑफ नॅशनल असँबली ) आपल्या पदाचे राजीनामे दिले सभागृहाच्या अध्यक्षाने ते सर्व तात्काळ मंजूर करण्याच्या ऐवजी ते विविध करणे पुढे करत मंजूर केले नाही इम्रान खान यांनी आपल्या राजकीय सभांमधून या बाबत सातत्याने टीका केली तरी त्यांनी राजीनामे मंजूर कार्यास तत्परता दाखवली नाही पुढे या २०२३ च्या जानेवारीत पाकिस्तानी पंजाब आणि खैबर ए पख्तुन्वा या प्रांतात्तील विधानसभेचे मुदतपूर्व विसर्जन केल्यावर आणि पंतप्रधांवर अविश्वासाचा प्रस्ताव दखल करण्याबाबत तयारी करण्याबात पूर्ण तयारीनिशी उतरत असल्याचे सूतोवाच केल्यानंतर तसेच  देशात संसदेच्या मुदतपूर्व निवडणुकीबाबत पूर्व वातावरण निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्यावर  गेली ९ महिने मजूर न केलेले खासदारानाचे राजीनामे मजूर करण्याच्या सपाटा लावला . राजीनामे मजूर करत सभागृहातील पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाच्या सदस्यांची संख्या कमी करणे ज्यामुळे
त्यांना विरोधी पक्षनेता होण्याची शक्यता धूसर खेळण्याची खेळी केली आहे त्यामुळे देशात मुदतपूर्व मध्यवर्ती निवडणुकीची शक्यता अधिक गडद झाली आहे पाकिस्तानी पंजाब आणि खैबर ए पख्तुन्वा या प्रांतातील विधानसभा विसर्जित झाल्याने तिथे ९० दिवसात निवडणुका घेणे पाकिस्तानी संविधानानुसार बंधनकारक आहे  पाकिस्तानी संविधानुसार तेथील प्रांतीय आणि संसदेच्या निवडणुका एकत्र  घेतल्या जातात  पाकिस्तानी पंजाब आणि खैबर ए पख्तुन्वा यादोन प्रांतातील एकूण विधानसभेच्या जागा पाकिस्तानमधील सर्व जागांच्या पैकी ६६ % आहे त्यामुळे पाकिस्तानात फक्त या दोन विधानसभेच्या निवडणुका होतील पाकिस्तानी संसदेच्या निवडणूक होणार नाही असे समजणे काहीसे चुकीचे ठरेल 

 विद्यमान पंतप्रधान काठावरचे बहुमत घेऊन सत्तेत आहेत पाकिस्तानी संसदेत बहुमतासाठी १७२ जागाआवश्यक असताना त्यापेक्षा फक्त २ जागा अधिक घेऊन १७४ सदस्यांच्या पाठींब्यावर शाहबाझ शरीफ सध्या पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावर विराजमान  आहेततेही १७ पक्षाच्या आघाडीचे मत घेऊन त्यामुळे विद्यमान सरकारविषयीचे जनसामान्यांचे मत विचारत घेता हि घडी फुटाणे सहज शक्य आहे असे झाल्यास शाहबाझ शरीफ याना सत्ता सिडावी लागले ते टाळण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा सुरु केली आहे  ज्यासाठी ते विविध कायदेशीर

पेचप्रसन्ग उभे करत इम्रान खान यांच्यावर विधी गुन्हे दाखल करत त्यांना राजकारणातून पूर्णपणे हद्दपार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत आपल्या विरोधकांचे मनसुबे उधळण्यासासाठी इम्रान खान विविध डावपेच रंगवत आहेतज्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात सध्या अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत मात्र यामुळे अर्थव्यवस्थेचे मोठ्या प्रमाणत नुकसान होत आहे ज्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे त्यांची परिस्थिती कुत्रा देखील खाणार आंही अशी होत आहे त्यांना कोणीच वाली राहिलेला नाही 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?