ब्लॉकचेन या तंत्रज्ञाचा संपूर्ण आढावा घेणारे पुस्तक "साखळीचे स्वातंत्र्य

      


    सध्याचे जग वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञांचे आहे पूर्वी कधीही ऐकले  देखील नव्हते ,  अशी यंत्रें  आपण सध्या सहजतेने वापरतो ते तंत्रज्ञानामुळे अशी यंत्रें हाताळता येणे खूपच सोपे केल्यामुळे . पूर्वी विज्ञान कथांमधे एखादी संकल्पना मांडल्यावर ती प्रत्यक्षात येण्यासाठी अनेक दशकांचा कालावधी लागत असे आज हा कालावधी काही महिन्यावर आलेला आहे . हे तंत्रज्ञान वापरण्यासासाठी त्यामागच्या संकल्पना संपूर्णपणे माहिती असणे अत्यावश्यक नाही  किंबहुना या संकप्लनाबाबत पूर्णतःअज्ञानी असलो तरी चालते आता इंटरनेट कसे कार्य करते ? आपण एखादा शब्द इंटरनेटवर शोधण्यस्साठी टाईप केला तर गुगलच्या अमेरिकेसह जगभरात असंणाऱ्या सर्वरबाबत काय घडामोडी घडतात हे माहिती नसले तरी आपण इंटरनेट सहजतेने वापरू शकतोच मा ? मात्र तंत्रज्ञानमुळे वापराने सोपे झालेले यंत्र कसे कार्य करते ? आपण वापरत असलेल्या तंत्रज्ञाबाबत जगात काय नवीन संशोधन सुरु आहे ? त्यामुळे कोणते बदल संभवतात ? आदींची माहिती मिळाल्यास तंत्रज्ञाचा फायदा करून घेताना होणारा आंनद उत्तम ठरेल ना ? आपल्या सुदैवाने मराठीत असा आनंद देणारी अनेक पुस्तके आहेत आणि दिवसागणिक त्यांची संख्या सातत्याने वाढतच आहे या प्रकारच्या मराठीतील पुस्तकांचा मुकुटमणी म्हणता येईल असे "साखळीचे स्वातंत्र्य "हे पुस्तक मी नुकतेच सार्वजनिक वाचनालय नाशिक (सावाना )च्या मदतीने वाचले . 

        अनेक नवनवीन विषयांवरची मुळात मराठीत प्रसिद्ध करणारे आणि इंग्रजी आणि हिंदी भाषेतील प्रसिद्ध पुस्तकांचा मराठीत अनुवाद प्रसिद्ध करणाऱ्या घोटी (तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक )येथील मधुश्री प्रकाशनतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकात सध्या अत्यंत प्रसिद्ध असलेल्या बिटकॉइन , वेब ३. 0 , क्रिप्टो करन्सी , मेटाव्हर्स  आदी घटकांच्या मुळाशी असलेल्या ब्लॉक चेन या तंत्रज्ञाची ओळख करून देण्यात आली आहे दैनिक
लोकसत्तामध्ये सन २०२० मध्ये दर गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या ब्लॉकचेन विषयक लेखांचा संग्रह म्हणजे  सदर पुस्तक .सन  २०१७पासून ब्लॉकचेन या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या गौरव सूर्यवंशी यांनी हे पुस्तकाचे लेखन केले आहे . ८ भागात आणि ५६ प्रकरणांत सदर पुस्तक विभागले आहे  पुस्तक तांत्रिक विषयाची माहिती देणारे असले तरी पुस्तकाची भाषा सहजसोपी ठेवण्याकडे लेखकाचा प्रयत्न असल्याचे वारंवार दिसून येत आहे . याच प्रकाशनच्या द फ्री प्रेस या अनुवादित पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीत  र्हस्व आणि दीर्घच्या चुका मोठ्या प्रमाणत आढळल्या होत्या मात्र या पुस्तकात सदर प्रकार टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असल्याचा दिसून येत आहे या पुस्तकात सखोलपणे दोन्ही बाजू सोप्या भाषेत समजावूनसांगण्यात आल्या आहे ज्यामध्ये अर्थशसहस्त्र , समाजशास्त्र , आणि कॉम्पुटरविषयक विविध संकल्पनाचा समावेश आहे 
            या ८भागाच्या पुस्तकात पहिल्या भागात ३ प्रकरणाद्वारे  ब्लॉकचेनचा परिचय करून देण्यात आला असून दुसऱ्या भागात ३ प्रकरणात पैशाचा इतिहास सांगण्यात आला आहे . तिसऱ्या भागात दोन प्रकरणें असून यामध्ये बँकिंग आणि बिटकोंविषयी सांगण्यात आले आहे चोथ्या भागात ४ प्रकारांतून सायरफंक चळवळी बाबत माहिती देण्यात आलेली आहे ब्लॉकचेन तंत्रज्ञानीतील विविध संकल्पनासहा प्रकरणात पाचव्या भागात स्पष्ट करून सांगितल्या आहेत . सहाव्या भागात बिटकॉइन हि संकल्पना १२ प्रकारातून समजावून सांगण्यात आली आहे ८ प्रकरणात विभागलेल्या सातव्या भागात बिटकॉन सोडून ब्लॉक चेनचा उपयोग कोणत्या प्रकारे होतो यावर प्रकाश टाकण्यात आला आहे . आठव्या आणि शेवटच्या भागात १८

प्रकारात ब्लॉकचेन तंत्रज्ञानयामुळे कोणत्या प्रकारचा सकारात्मक बदल होव शकतो याचा अवलंब बिटकॉइन सोडून अन्य कोणत्या प्रकारे याआधी मोठ्या प्रमाणत यशस्वीपणे करण्यात आला आहे  २५० हुन थोडेशी अधिक पाने असलेल्या या पुस्तकांत सर्वत्र सूत्रबद्धता आढळते . एका प्रकरणातून दुसरे प्रकरण उलगडत जाते जी गोष्टी प्रकरणाची तीच गोष्ट भागांची त्यामुळे पुस्तक वाचताना कुठेही आपण काय वाचत आहोत ?असा प्रश्न पडत नाही सर्व गोष्टी सहजतेने समजत जातात . त्यामुळे तांत्रिक विषयाचे असून देखील पुस्तक कंटाळवाणे रटाळ होत नाही मग वाचणार ना हे पुस्तक ,साखळीचे स्वातंत्र्य 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?