अर्थव्यवथा गाळात राजकारण जोरात

   


   अर्थव्यवथा गाळात राजकारण जोरात  या  एकाच वाक्यात पाकिस्तानातसध्या  घडणाऱ्या घडामोडींचे वर्णन करता येऊ शकते अर्थव्यवस्थेच्या  दुरावस्थेमुळे एकीकडे सर्वसामान्य जनता रोजच्या जगण्यासाठी अन्नास मोताद झाली असताना ,पाकिस्तानच्या गृहमंत्र्यासह विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तान तेहरीके ए इन्साफ या पक्षाचा अध्यक्ष उपाध्यक्ष यासह सर्व राजकारण्यांचे लक्ष मात्र पाकिस्तानी पंजाबच्या विधानसभेत रंगणाऱ्या राजकारणाकडे लागले आहे देशात असणाऱ्या चार राज्यांपैकी एका राज्यात दहशतवादी कृत्याने उच्चांक गाठला असताना .अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईस आलेली असताना  त्यावर बोलायचे सोडून देशातील एका राज्याच्या विधानसभेबाबत होणाऱ्या राजकारणाबाबत देशाचा गृहमंत्री माध्यमांना प्रतिक्रिया देत सुटला आहे या प्रतिक्रियांमध्ये त्या राज्यात  सत्ताधिकारी मात्र केंद्रीय सत्तेचा विचार करता विरोधी पक्ष असलेल्या पक्षाने लोकशाहीचे  सर्व संकेत पायदळी तुडवल्याचा आरोप करत आहे आहे देशाच्या   प्रगतीत ६० ते ६५ % वाटा चालणाऱ्या राज्यामध्ये  मोठ्या प्रमाणत राजकीय अस्थिरता आहे आमच्या आमदारांना स्वतःच्या बाजूने वाळवण्यासाठी केंद्रीय सत्तेत असणाऱ्या १७ पक्षांच्या आघाडीकडून प्रत्येकी  १ अब्ज २० कोटी पाकिस्तानी रुपयांचे अमिश दिल्याच्या आरोप राज्यतील सत्ताधिकारी पक्षाकडून करण्यात आलेला आहे   राज्याच्या विधानसभा विसर्जित करून नव्याने निवडणुका घ्याव्यात का ? हा मुद्दा ऊच न्यायालयात सुनावणीसाठी आलेलेआहे या मुद्यावर घेण्यात आलेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी सत्ताधिकारी पक्षाने सभागृहाचे सदस्य नसलेल्या व्यक्तींना सभागृहात आणून प्रस्ताव नामंजूर करून घेतल्याचा आरोप करत विरोधी पक्षाकडून या बाबत न्यायालयात दादअसल्याचे  सांगण्यात येत आहे 
राज्याच्या सत्तेत असणाऱ्या दोन पक्षाच्या आघाडीतील मोठा पक्ष ज्याने बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या १८गांपैकी १८० जागा मिळवल्यात अशा पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाकडून विधानसभा विसर्जित करण्याबाबत आग्रही भूमिका घेतली जात असताना  दुसरा छोटा पक्ष ज्याच्या ३७२ सदस्यांच्या साधनांत फक्त १० जागा आहेत असा पाकिस्तान मुस्लिम लीग कायदे गट हा पक्ष मात्र मात्र विधानसभा विसर्जित होऊ नये म्हणून झगडतोय हे चित्र आहे पाकिस्तानी पंजाबमधील सध्याच्या राजकारणाचे .

   एकीकडे पाकिस्तानी पंजाबमध्ये अशी स्थिती असताना केंद्रीय पातळीवर सुद्धा राजकारण मोठ्या प्रमाणत रंगत आहे केंद्रीय सत्तेत बसलेली १७ पक्षांची आघाडी प्रमुख विरोधी पक्षाच्या अध्यक्ष निवडणुकीसाठी कायमस्वरूपी अपात्र कशा होईल या साठीच्या खेळी खेळण्यात मग्न आहेत आपले मनसुबे पूर्णच होण्यसासाठी या १७ पक्षांच्या आघाडीने देशाच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे सह विद्यमान प्रमुख विरोधी पक्ष नेता आणि देशाचा माजी पंतप्रधान असलेल्या इम्रान खान यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याच्या बाबतीत तपास यंत्रणांना  कार्य केले जात नसल्याचा बातम्या प्रसार माध्यमांकडून देण्यात येत आहेत  महत्त्वाच्याशहरांच्या स्थानिक प्रशासनाच्या निवडणुकांच्या मतदारसंघाबाबत विरोधी सत्ताधिकरी पक्षातील काही पक्षच टीकेचा सूर लावत आहे देशातील महत्वाच्या निवडणुकांसाठी केंद्रीय सुरक्षादले  वापरता येऊ शकत नाहीही  शहरे ज्या राज्यात आहेत त्या राज्य सरकारांनी या निवडणूकींना सरंक्षण पुरवण्याबाबत उपाययोजना करावी असे निर्देश केंदाने राज्य सरकारला दिले आहेत त्यामुळे या निवडणुका होतील का ?यावरच प्रश्नचिन्ह आहे देशाची राजधानी असलेल्या इस्लमबाद मधील महानगरपालिकेच्या निर्धारित निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत केंद्रीय सत्तेत असणाऱ्या पक्षाकडून  विवीध करणे देत निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत निवडणुकीत पूर्णतः

हरणार असल्याने हे केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे कराची हैद्राबाद आदी सिंध राज्यातील महत्वाच्या शहरातील स्थानिक प्रशासनाच्या निवडणुका होतात का ?  हा मोठा प्रश्न उपस्थित होतो  देशाचा निवडणूक आयोग स्वतंत्रपणे काम करत नसून सत्ताधिकारी वर्गाचा पूर्णतःगुलाम झाल्याचा आरोप प्रमुख विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे आमच्या सर्व सदस्यांनी एप्रिल महिन्यात एकाचवेळी  नॅशनल असेम्ब्लीचे राजीनामे आले असताना नॅशनल असेम्ब्ली अध्यक्षाकडून ते सर्व राजीनामे एकाचवेळी मंजूर करण्यापेक्षा टप्या टप्याने का मंजूर करण्यात येत आहे यांवरून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे  देशाच्या आर्थिक स्थितीबाबत सत्ताधिकारी पक्ष आणि विरोधी पक्षांकडून एकमेंकावर आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत 

        एकीकडे अश्या प्रकारे राजकारण सुरु असताना देशाची अर्थयवस्था प्रचंड अडचणीत आहे देशाचा परकीय चलनाचा साठा वेगाने शून्यवत होण्याच्या दिशेने चालला आहे देशातील उपलब्ध नैसर्गिक संसाधने अधिक काळ वापरता यावीत म्हणूंन  विजेचे रेशनिंग चालू आहे देशाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी देशाचापंतप्रधान आणि लष्करप्रमुख विविध देशांच्या प्रमुखांकडे मिनातवाऱ्या करत आहेत देशात महागाईने कळस गाठला आहे त्याचबरोबर देहात अनेक अन्नधान्याच्या साठ्याने तळ गाठायला सुरवात केलीआहे पाकिस्तानात
अनेक लोकांकडे पैसे आहेत मात्र अन्नाचा साठाच शिल्लक नसल्याने नागरिक अन्न विकत घेऊ शकतं नाहीये  अमागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुराचे पाणी अजूनही पुरते ओसरले नाहीये ते पाणी बाहेर टाकायला पुरेशी यंत्रसामग्री पाकिस्तानकडे नाहीये एकंदरीत पाकिस्तान सध्या अस्मानी आणि सुलतानी दोन्ही प्रकारच्या संकटात सापडला आहे हेच खरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?