जागतिक स्तरावर हवामान बदलावरून नव्या वादंगाला सुरवात

     


  
गुरुवार १२ जानेवारी रोजी युनाटेड अरब अमिरात (युएइ) या  देशाने केलेल्या एका घोषणेने जागतिक स्तरावर   हवामान बदलावरून नव्या वादंगाला सुरवात झाली आहे . चालू वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात  किंवा डिसेंबर महिन्याच्या सुरवातीच्या आठवड्यात   युनाटेड अरब अमिरात या देशात होणाऱ्या Conference  Of Parties ( जे  आपल्या अद्यक्षरांवरून COP नावाने अधिक प्रसिद्ध आहे) च्या अधिवेशनाच्या संदर्भात केलेल्या एका घोषणेने हा वाद सुरु झाला आहे युनाटेड अरब अमिरात या देशाच्या राष्ट्रीय तेल उत्पादक कंपनीचे कार्य्रकरी प्रमुख या COP२८ चे प्रमुख  असतील हीच ती घोषणा होय . कोल्ह्याच्या तावडीत बकऱ्यांची सुरक्षा देण्याचा हा प्रकार आहे/स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी पर्यावरणाची हानी करणाऱ्या व्यक्तीच्या हाती पर्यावरणाच्या संरक्षणाची जवाबदारी कोणत्या अधिकारात देता येऊ शकते ? चोराच्या हाती खजिन्याचा किल्ल्या देण्याचा हा प्रकार आहे  या प्रकारच्या  प्रतिक्रिया या निमित्याने पर्यावरण रक्षण करणाऱ्या संस्था व्यक्ती यांच्याकडून उमटत आहेत तर Conference  Of Parties (COP ) चे संयुक्त राष्ट्र संघाच्या देखरेखेखाली  नियंत्रण करणाऱ्या United  Nation  Framework  Convention On  Climate Change ( जी आपल्या अद्यक्षरांवरून UNFCCCनावाने प्रसिद्ध आहेच्या मते या अधिवेशनाचे आयोजन करणाऱ्या देश त्याला वाटेल त्या व्यक्तीस अधिवेशनाचे अध्यक्ष करू शकते . याबाबत UNFCCची काहीही भूमिका नाही

जगाला हवामानबदल हे जागतिक संकट असल्याची जाणीव होऊन या बाबत काहीतरी करायला हवे ही जाणीव सर्वप्रथम १९७२ साली झाली त्यावर्षी स्टॉकहोम या शहरात पहिली अर्थ समिट झाली . त्यानंतर पुढील २० वर्ष हवामानबदलाविषयी फारश्या घडामोडी घडल्या नाहीत पुढे १९९२ साली जगाला मानवी हस्तक्षेपामुळे पृथीच्या हवामानाची हानी होत असून ती सुधारणे हे मानवाचे कर्तव्य असल्याचे प्रकर्षाने जाणवले आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने रिओ दि जानोरो या शहरात युनाटेड नेशन फ्रेमवर्क फॉर क्लायमेट चेंज या व्यासपीठाची स्थापना करण्यात आली १९९२ साली झालेले  हे अधिवेशन रिओ समिट म्हणून प्रसिद्ध आहे या रिओ समिट मध्ये हवामान बदलाविषयी ठोस कृती कार्यक्रम १९९२ मे रोजी ठरवण्यात येऊन १९९२ जून मध्ये संयुक्त

राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्य देशांनि त्यास मान्यता देण्यसासाठीदेशांची सही करण्यासाठी खुला करण्यात आला ज्यावर सर्व सदस्य देशांची सही होण्यसासाठी १९९४ मार्च २१ हा दिवस उजाडला या ठोस कार्यक्रमावर ज्या देशांनी सही केल्या त्यांचा एक गट स्थापन करण्यात आला त्यास कॉन्फरन्स ऑफ पार्टिज या नावाने ओळखतात . कॉन्फरन्स ऑफ पार्टीज या इंग्रजी शब्दाचे पहिले अक्षर घेऊन COP  हा शब्द तयार करण्यात आला आहे ज्याचा उच्चार कॉप करतात १९९४ साली सर्व देशांनी मान्यता दिल्यावर १९९५ पासून २०२० वर्षाचा अपवाद वगळता दर वर्षी जगभरातील सर्व देश हवामान बदलाविषयी काय करता येईल हे ठरवण्यासाठी एका शहरात एकत्र येतात त्यास कॉप अधिवेशन म्हणतात १९९५ साली पहिल्यांदा हे अधिवेशन झाले त्यास कॉप नावाने ओळखतात त्यानंतर कॉप ,कॉप या नावाने हे अधिवेशन सुरु आहे जे दर वर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येते या वर्षी होणारे अधिवेशन २८ वे आहे जेCOP २८ या नावाने होणार आहे जे युनाटेड अरब अमिरात या देशात होणार आहे जे मागील वर्षी (२०२२ ) नंतर अरब देशात होणारे दुसरे अधिवेशन आहे मागील वर्षी (२०२२ ) मध्ये इजिप्तमध्ये झालेले अधिवेशन अरब जगतातील COP अधिवेशन होते

      सध्या जागतिक हवामान बदलाच्याच्या मुळाशी नैसर्गिक जीवाष्म  इंधनाचा वापर कारणीभूत असल्याबाबत जगाचे एकमत झाले आहे त्यामुळे जग नैसर्गिक जीवाष्म इंधनाचा  वापर कमीत कमी करत पर्यायी इंधनाच्या संशोधनाकडे वळत आहे याबाबत भारतासारख्या देशांनी सौर उजेचा अधिकाधिक वापर करण्याबाबत अनेक देशांची मूठ बांधली आहे  जग जीवाष्म इंधनाच्य विरोधात एकवटले असताना ज्या राष्ट्रीय कंपनीचा मूळ आर्थिक स्तोत्राच मुळात जीवाष्म इंधने आहेत त्या कंपनीचा मुक्या कार्यकारी प्रमुख जागतिक हवामानबदलाविषयीच्य बेबींवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनाचा प्रमुख कशा काय होऊ शकतो अशा प्रश्न

या निमित्याने पर्यावरण प्रेमी उपस्थित करत आहे युनाटेड अरब अमिरात ने COP च्या प्रमुखपदी नेमलेल्या व्यक्तीमुळे यास अधिवेशनात मुक्तपणे चर्चा आणि ठराव होऊ शकणार नाही अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे युनाटेड अरब अमिरात च्या राष्ट्रीय तेलउत्पदक कंपनीच्या प्रमुखांनी या आधी झालेल्या १० COP अधिवेशनात युएन्टेड अरब अमिरात या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे त्यामुळे त्यांना परिस्तितीची पूर्व जाणीव आहे त्याच्या अध्यक्षतेखाली मनमोकळ्या वातवरणात चर्चा होईल असे युएइ च्या सरकारकडून सांगण्यात येत आहेएखाद्या कंपनीच्या  प्रमुखांनी COP चे प्रमुखपद घेण्याची हि इतिहासातील पहिलीच वेळ आहे त्यामुळे सगळ्या जगाच्या नजरा  याकडे लागलेल्या आहेत   त्यामुळे यावेळी काय ह्योते हे बघणे अत्यंत उत्सुकतेचे ठरेल हे नक्की



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?