सवलती आवरा , निधीची तरतूद करा

   


       सध्या आपण कोणत्याही एसटी कर्मचाऱ्यास विचारले की तुला राज्यशासनास काही सांगायचे असल्यास तू क्या सांगशील अशे विचारले तर तो एकाच म्हणणे मांडेल /. " सवलती आवरा , निधीची तरतूद करा , आम्हाला नियमित वेतन देण्यास महामंडळाकडे पैसे नाहीये मात्र राज्य सरकारकडून सातत्याने नन्नाविण सवलती जहरी करण्यात येतात . आता या विविध सवलती मिळविलेल्या व्यक्ती जेव्हा या सवलतींचा फायदा घेत एसटी बसमधून फिरतो . तेव्हा या सवलतींमुळे आम्हाला अन्य सर्वसाधारण प्रवाश्याच्या तुलनेत काहीच उत्पन्न मिळत नाही . मात्र अन्य प्रवाश्याला प्रवास करण्यास जितका पैसा खर्च होतो तितकाच पैसा लागतो त्यामुळे त्या एका फेरीचा खर्च आणि उत्पन्न यांचा विचार करता समतोल बिघडतो . राज्य सरकारकाकडून आम्हाला या सवलतींमुळे बुडणारे उत्पनाचा परतावा मिळत असला तरी तो वेळेवर कधीच मिळत नाही दोन ते आधीच वर्षांनी तो मिळतो जो उशीरा न्याय म्हणजे अन्यायच या वाक्यप्रचारशी मिळणार असतो सबब राज्य सरकारने या सवलती आवरण्याची गरज आहे 

         आजमितीस अत्यंत कमी  म्हणजे मूळ भाड्याच्या जेमतेम १५ ते २० %  भाड्यात किंव काही प्रसंगी अगदी मोफतच प्रवास करणारे सुमारे १८ समाजघटक आहेत .  मी अनेकदा बस प्रवास करतो त्यामध्ये या सोइ सवलतीचा गैरफायदा घेणारे घेऊन प्रवास करणारे अनेकजण दिसतात . ते ज्या सोयीसवलतीचा फायदा घेत प्रवास करता आहेत त्याला ते खरोखरीच पात्र आहेत का ? अशा प्रश्न पडावा असे र्त्यांच्याकडे बघून वाटते दुर्दैवाने बस मध्ये बसणारा प्रवाशी जी सवलत घेत आहे त्यास तो खरोखरीच पात्र आहे का ? हे तपासणारी कोणतीच उपाययोजना सध्या आपल्या एसटीकडे नाही . कागदी प्रमाणपत्र बस कंडक्टरला दाखवून हि सवलत देण्यात येते मात्र हि

प्रमनपंक्तये बोगस आहे का हे तपासण्याची कोणतीच सोइ  बस कंडक्टरकडे नाहीजरी संशय आला तरी बस कंडक्टरला तिकीट द्यावेच लागेल ना दिल्यास प्रवाश्यांशी सौजन्यपुर्वक ना वागल्याचे दाखवून कारवाई होण्याची  टांगती तलवार आहेच . गुजरातची एसटी आपल्या प्रवाश्याला ज्येष्ठ नागरिकांची सोय देत नाही आपण ती देतो कर्नाटकाची एसटी खेळाडूंना विशेषसवलती देत नाही आपण देतो माझ्यामते या फुकटच्या सवलतींचा तात्कळ आढावा घेऊन देशातील इतर एसटी महामंडळे देत नाहीत त्या प्रकारच्या सोइ सवलती लगेच बंद करण्यात याव्यात 

      आपल्या एस्टीमधील कर्मचाऱयांना त्यांचे वेतन अत्यंत अनियमितपणे उशिरा मिळते  जर आपण सध्या जे काम करतोय त्याचे वेतन कधी मिळेल याची शास्वती नसेल तर त्याला ते काम करताना कार्य समाधान  (Work  Satisfaction ) मिळेल का ? याचा विचार राज्य सरकारने करण्याची गरज आहे कार्य समाधान  (Work  Satisfaction ) न झाल्याने त्याचा कार्यक्षमतेवर परिणाम झाल्यास त्याबाबत त्यास व्यक्तीलाच जवाबदार ठरणे कितपत योग्य ठरेल  खेडोपाडी जाणाऱ्या बसेसच्या ड्रायव्हर कंडक्टर ची गोष्ट सोडा नाशिक सारख्या मोठ्या गावात येणाऱ्या ड्रायव्हर कंडक्टरला सुद्धा रात्री त्रासात काढावे लागतात . रात्री नाशिकच्या महामार्ग बस्थानकावर जाऊन बघा रात्री येणाऱ्या बसेसच्या कर्मचाऱ्यांना खायला काहीही सोया नसते घरून आणलेले थंडगार अन्नच त्यांना खावे लागते आज अनेकबसेस खराब स्थितीत आहेत त्यांची दुरुस्ती करण्यास पैसे नसल्याने आहे त्याच स्थितीत त्यांना बसेस  चालवाव्या लागतात ते देखील या नादुरुस्ती बसेसमुळे अपघात होऊ न देण्याचा तणाव घेऊन या अश्या स्थितीतील बसेस चालवण्याचा तणाव तसेच लोकांची सार्वजनिक बस म्हणजे बापाचा माल असण्यासारखी

वागण्याची वृत्ती याचा परिणाम होणारच ना ? अनेक व्यक्ती बस थांबे सोडून स्वतःच्या घरासमरोर बस थांबवायची सक्ती करतात  विरोध केल्यास स्वतःची चूक लक्षात ना घेता तक्रार करतात मग सांगा कर्मचारी कसे काम करतील बसेस दुरुस्ती करण्यास पैसे नाहीत मात्र राज्य सरकारकडून विनाकारण सवलतींचा भडीमार करण्यात येतो तो थांबल्यास आणि लोकांचे सार्वजनिक म्हणजे स्वतःच्या बापाचा माल  हि मनोवृत्तीची बदल्यास आपली महाराष्ट्राची एसटी पुन्हा एकदा पूवीचाच ताकदीने फिरू लागेल हे नक्की 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?