भारत इजिप्त मैत्री चिरायू होवो

            


  
आपण सन १९५० ला प्रजासत्ताक झालो त्या दिवसापासून दर वर्षी  आपला प्रजासत्ताक दिन मोठ्या दिमाखात साजरा करतो या निमित्याने २६ जानेवारीपासून पुढील  चार दिवस आपला शानदार सोहळा नवी दिल्लीत साजरा करण्यात येतो या चार दिवसाच्या सोहळ्यातील मुख्य सोहळ्याच्या पहिल्या दिवशी अर्थात २६ जानेवारी रोजी राष्टपतींच्या  निगराणीखाली नवी दिल्लीच्या राजपथावर सर्व संरक्षण दलांचे आणि काही राज्याचे पथसंचन होते जे आपण टीव्हीवर नेहमीच बघतो भारताच्या या भव्य सोहळयाला भारताच्या विशेष आमंत्रणावरून वेगवेगळ्या देशाचे राष्ट्रप्रमु विशेष बाब हजेरी लावतात . या २०२३ वर्षी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फताह अल सीसी या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत भारताच्या या सोहळ्याच्या इतिहासात प्रथमच कोणत्या तरी अरब देशाचा प्रमुख या सोहळ्याचा प्रमुख असणार आहे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांच्याकरवी ऑक्टोबर २०२२ मध्ये दिलेल्या निमंत्रणावरून इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फताह अल सीसी हे दौऱ्याला भेट देत आहे  इजिप्त हा भारतासाठी त्यांत महत्त्वाच्या साथीदार देश आहे . भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू , आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष नासिर यांनी एकत्र येत नाम या जागतिक व्यासपीठाची निर्मिती केली होती त्यावेळी जागतिक स्तरावर नव्यानेच स्वतंत्र्य झालेल्या देशांनी कोणत्याही जागतिक महासत्तेच्या प्रभावाखाली येता दोन्ही महासत्तांच्या राजकारणात पडता दोन्ही देशांपासून सारखेच अंतर राखतआपला विकास साधण्याचे महत्त्वाचे कार्य नामने केले होते . आता जागतिक राजकारणाचे संदर्भ बदलले असले तरी त्या काळाचा विचार करता नामाचे महत्व नाकारता येत नाही

      भारत आणि इजिप्त या जगातील दोन सर्वात जुन्या संस्कृतींचा प्राचीन काळापासून जवळचा संबंध आहे. अशोकाच्या आज्ञेमध्ये टॉलेमी-II च्या काळात त्याच्या इजिप्तशी असलेल्या संबंधांचा उल्लेख आहे. आधुनिक काळात, महात्मा गांधी आणि साद झघलौल यांनी त्यांच्या देशांच्या स्वातंत्र्याबाबत समान उद्दिष्टे सामायिक केली होती, हे संबंध राष्ट्राध्यक्ष नासेर आणि पंतप्रधान नेहरू यांच्यातील अपवादात्मक घनिष्ठ मैत्रीमध्ये उमलले होते,

ज्यामुळे १९५५ मध्ये दोन्ही देशांमध्ये मैत्रीचा करार झाला.राजदूत स्तरावर राजनैतिक संबंधांच्या स्थापनेची संयुक्त घोषणा १८  ऑगस्ट १९४७ रोजी करण्यात आली होती.

१९८० पासून, भारतातून इजिप्तमध्ये चार पंतप्रधानांच्या भेटी झाल्या आहेत:ज्यामध्ये १९८५ मध्ये  राजीव गांधी ; १९९५ मध्ये  पी. व्ही. नरसिंह राव आणि .आर  के. गुजराल तसेच  डॉ. मनमोहन सिंग  यांनी अनुक्रमें १९९९  आणि २००९ मध्ये दिलेल्या भेटींचा समवेश होतो

इजिप्तच्या बाजूने, विचार करावयाचा झाल्यास राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांनी १९८२ मध्ये, १९८३  मध्ये  आणि पुन्हा २००८ मध्ये भारताला भेट दिली. २०११  च्या इजिप्शियन क्रांतीनंतर इजिप्तबरोबर उच्चस्तरीय देवाणघेवाण सुरू राहिली आणि त्यानंतर राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांनी मार्च २०१३  मध्ये भारताला भेट दिली.

राष्ट्रपती सिसी यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकारने जून २०१४ मध्ये पदभार स्वीकारल्यानंतर, भारताच्या पररराष्ट्र मंत्र्यांनी  ऑगस्ट २०१५  मध्ये कैरोला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१५  मध्ये UNGA, साठी न्यूयॉर्क येथे जागतिक नेते जमले असताना इजिप्तचे राष्ट्रपती सिसी यांची भेट घेतली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान मोदी  यांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या  तिसऱ्या भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेदरम्यान राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांची भेट घेतली. राष्ट्रपती सिसी यांनी सप्टेंबर २०१६ मध्ये भारताला  भेट दिली

सध्या, इजिप्तमध्ये  सुमारे 3200  भारतीय राहतात , त्यापैकी बहुतेक कैरोमध्ये केंद्रित आहेत. अलेक्झांड्रिया, पोर्ट सैद आणि इस्माइलिया येथेही  काही जण राहतात  बहुसंख्य भारतीय एकतर भारतीय कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत किंवा विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये व्यावसायिक आहेत.       

 .इजिप्त हा पारंपारिकपणे आफ्रिकन खंडातील भारताचा सर्वात महत्त्वाचा व्यापारी भागीदार आहे. भारत-इजिप्त द्विपक्षीय व्यापार करार मार्च १९७८  पासून कार्यान्वित आहे आणि तो मोस्ट फेव्हर्ड नेशन कलमावर आधारित आहे आणि गेल्या दहा वर्षांत द्विपक्षीय व्यापारात पाच पटीने वाढ झाली आहे. २०१८-१९  मध्ये द्विपक्षीय व्यापार या व्यापारात खूपच माफक घट झालीइ जिप्शियन सेंट्रल एजन्सी फॉर पब्लिक मोबिलायझेशन अँड स्टॅटिस्टिक्स (CAPMAS) नुसार, भारत इजिप्तसाठी तिसरा सर्वात मोठा निर्यात बाजार, सहावा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि इजिप्तला 7वा सर्वात मोठा निर्यातदार होता.

त्या पार्श्वभूमीवर आपण हि भेट विचारत घेयला हवी


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?