भारतीय बुद्धिबळविश्वाची दणदणीत सुरवात

       


  मागील २०२२ च्या वर्षांची अखेर भारतीय बुद्धिबळ विश्वासाठी अत्यंत सुखद होती वर्ष संपायला दोन दिवस सु शिल्लक असताना २९ डिसेंबर रोजी संपन्न झालेल्या बुद्धिबळाच्या रॅपिड प्रकारातील स्पर्धेत भारताच्या 15 वर्षीय सविता श्री भास्कर यांनी  चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला तर वर्षाच्या अखेरच्या दिवशी ३१ डिसेंबर रोजी भारताच्या गुणकांचा आधारे पहिल्या क्रमांकाचा महिला बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर कोनेरू हंपी यांनी गतिक महिला ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिपचे ने रौप्य पदक जिंकले या आनंदात समस्त बुद्धिबळविश्व असतानांच वर्ष सुरु होऊन दोनच दिवस होत नाही तोच भारताला ७८ वा ग्रँडमास्टर मिळाल्याच्या सुखद धक्याने भारतीय बुद्धिबळविश्वाचा आनंदला पराचा उरला नाही

        सध्या कोलकाता या शहरात राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा सुरु आहेत ज्यामध्ये  ३१ डिसेंबर रोजी रात्री झालेल्या डावांमध्ये मुळच्या कोलकात्याचाच राहिवशी असलेल्या १९ वर्षीय कौस्तुभ चॅटर्जी यांनी ग्रँडमास्टर मितभा गुहा यांच्याबरोबर झालेल्या  सामन्यांत बरोबरी साधली ज्यामुळे ग्रँडमास्टर होण्यसासाठीच्या तिसऱ्या आणि अंतिम निकष पूर्ण झाला कौस्तुभ चॅटर्जी यांनी २५०० आलो रेटिंग या आधीच पूर्ण केल्याने कौस्तुभ चॅटर्जी यांची ग्रँडमास्टर म्हणून घोषणा होणे हि केवळ औपचारिकताच  राहिली जीऑल इंडिया चेस फेडरेशन कडून   जानेवारीस पूर्ण करण्यात आली आणि भारताला ७८ वा ग्रँडमास्टर मिळाला कौस्तुभ चॅटर्जी हे भारताचे ७८ वे आणि पश्चिम बंगालचे १० वे ग्रँडमास्टर आहेत भारताच्या ग्रँडमास्तरांची राज्यनिहाय यादी केल्यास त्यामध्ये ३७ ग्रॅण्डमास्टरांसह  तामिळनाडू पहिल्या क्रमांकाचे राज्य आहेत त्यानंतर प्रत्येकी १०  ग्रॅण्डमास्टरांसह महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल

दुसऱ्या क्रमांकांवर आहेत कॊस्तुभ चॅटर्जी यांची ग्रँडमास्टर म्हणून घोषणा होण्याच्या आधी ग्रँडमास्टर असलेले पश्चिम बंगाल तिसऱ्या स्थानी होते तर १० ग्रँडमास्टर असलेले महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी होते . औद्योगिक स्तरावर महाराष्ट्र मागे पडल्याचे आता नियमितपणे ऐकू येते किमान या क्षेत्रात तरी महाराष्ट्र्राची आघाडी टिकून राहण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्नशील राहायला हवे असो

    चॅटर्जी यांनी कोव्हीड साथरोगामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत असताना  ऑक्टोबर २०२१ मध्ये बांगलादेशात झालेल्या Sheikh Russel GM's meet या स्पर्धेत ग्रँडमास्टर साठीचा पहिला निकष पूर्ण केला त्या नंतर बारावीमुळे एका वर्षाची विश्रांती घेतली विश्रांती पाश्चात्य जोरदार पुनरागमन करत नोव्हेंबर २०२२ मध्ये झालेल्या Asian championship मध्ये दुसरा निकष पूर्ण केला या दरम्यान त्यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक असलेला २५०० इलो रेटिंगचा टप्पा गाठला त्यानंतर शेवटचा टप्पा त्यांनी डिसेंबरला पूर्ण केला आणि भारताला नवीन  ग्रँडमास्टर मिळाला

ग्रँडमास्टर हा 'किताब बुद्धिबळाची अंतरराष्ट्रीय संघटना फेडरेशन इंटरनॅशनल दि इचेस अर्थात फिडे या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध असलेल्या संघटनेकडून खेळाडूंचा गौरव करण्यासाठी देण्यात येणारा 'किताब असतो या पदकाचे काही निकष आहेत ते पूर्ण केल्यावरबुद्धिबळाची अंतरराष्ट्रीय संघटना फेडरेशन इंटरनॅशनल दि इचेस अर्थात फिडेकडून हा गौरव करण्यात येतो  कौस्तुभ चॅटर्जी आता या किताबाचे मानकरी झाले आहेत त्यांनी २०१० मध्ये वयाच्या व्या वर्षांपासून बुद्धिबळ खेळण्यास सुरवात केली त्यांचे भविष्यात भारतीय प्रशासन व्यवस्थेत (IAS ) येण्याचे स्वप्न आहे त्यांनी कोलकाता येथे झालेली ५९ वि राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा १० डावांमध्ये गुण मिळवून मितभा गुप्ता यांच्यासह प्रथम क्रमांकाने जिंकली आहे . स्पर्धेत डावात विजयी झाल्यास एक गुण आणि डाव अनिर्णयीत राहिल्यास अर्धा गुण देण्यात येत होता हे बघितल्यास आपणास त्यांचा खेळाचा दर्जा समजतो

सध्या जागतिक स्तरावर भारत बुद्धिबळातील महासत्ता म्हणून ओळखला जातो त्याचेच दृश्य स्वरूप म्हणून या घटनेकडे बघता येऊ शकते

 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?