अर्थव्यवस्था कोमात राजकारण जोरात


अर्थव्यवस्था कोमात राजकारण जोरात" , सध्या पाकिस्तानचे वर्णन याच शब्दात करावे लागेल   सध्या पाकिस्तानात अर्थव्यवस्थेमुळे तेथील नागरिकांना किती अडचणींना तोंड द्यावे लागत आहे तेथिल खाद्य पदार्थाचे वाढते भाव किती  भयानक स्थितीत पोहोचले आहेत  हे एव्हाना विविध माध्यमातून आपणस माहिती असेलच २६ जानेवारीपर्यंतचा विचार करता  इंटर बँकिंग प्रणालीमध्ये पाकिस्तानी रुपयाचा अमेरिकी डॉलरमधील  भाव हा २५५ पाकिस्तनी रुपया बरोबर अमेरिकी डॉलर हा होता खुल्या बाजारात या पेक्षा अधिकचा दर आहे २६ जानेवारीला एकाच दिवसात अमेरिकी डॉलरचा भाव हा २४  पाकिस्तानी रुपयांनी वाढला  यावरून तेथील अर्थव्यवस्था किती भयानक स्थितीत आहे हे समजते श्रीलंकेत जेव्हा जनमताचा उद्रेक झाला त्याचा आधीच्या पंधरवड्यात एकाच दिवशी श्रीलंकेच्या स्टॉक मार्केटमध्ये दोनदा लोअर सर्किट लागले होते (जेव्हा अचानक पत्याच्या बंगल्याप्रमाणे शेअर मार्केट मोठ्या प्रमाणात कोसळते तेव्हा ते अजून कोसळू नये यासाठी शेअर मार्केटचे व्यवहार काही काळासाठी बंद केले जातात त्यास लोअर सर्किट लागले असे म्हणतात ) २६ जानेवारीच्या रात्रीपर्यंत {हा लेख लिहण्यापर्यंत } पाकिस्तानच्या शेअर मार्केटमध्ये लोअर सर्किट लागल्याची बातमी नाही मात्र कदाचित तुम्ही हा लेख वाचत असताना ते लागले असल्याची शक्यता नाकारता येत नाही जर ते लागले तर पाकिस्तानी अर्थव्यवस्थेच्या शवपेटीवरील तो शेवटचा खिळा असेल असे म्हणायला हरकत नाही

         मात्र अर्थव्यवस्था अश्या पद्धतीने जवळपास  कोमात असताना त्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी पाकिस्तानी राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याचे सत्र सुरूच आहे इम्रान खान यांच्या कार्यकाळात देशाचे माहिती आणि प्रसारणमंत्री असलेलले फवाद चौधरी यांना २५ जानेवारीला पहाटे वाजता अत्यंत अपमानास्पद रीतीने अटक करण्यात आली फवाद चौधरी हे राजकीय नेते आहेत मात्र त्यांना एका अट्टल गुन्हेगारी व्यक्तींना  दहशतवद्याला अटक

करण्यात यावी या पद्धतीने अटक करण्यात आली त्यांनी विद्यमान सरकारवर टीका करताना पाकिस्तानी निवडणूक आयोगावर असंसदीय शब्दात टीका केली पाकिस्तानी निवडणूक आयोग देशासाठी अत्यंत महत्वाचा असल्याने तो एक प्रकारे देशद्रोहच आहे असा आरोप करत इस्लामाबाद पोलिसांनी लाहोर पोलिसांच्या हद्दीत जाऊन त्यांना अटक केली { आपल्या संदर्भात बोलायचे झाल्यास महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन गुन्हेगारीला अटक करण्यासारखी हि स्थिती आहेया अटकेवरून  पाकिस्तानी राजकारणी व्यक्ती सध्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात व्यस्त आहे पाकिस्तानी पंजाब आणि खैबर पख्तुनवा  या प्रांताचे राज्यपाल केंद्रीय सत्ताधिकारी पक्षाला अनुकूल ठरणारी भूमिका घेत आहेत असा आरोप त्यांच्यावर सातत्याने करण्यात येत आहे . पाकिस्तानी संविधानुसार दोन्ही प्रातांच्या विधानसभा विसर्जित झाल्याने त्या प्रांतांच्या निवडणुका विधानसभा विसर्जित झाल्यापासून ९० दिवसात नव्या निवडणूका घेणे आवश्यक असताना त्या विसर्जित झाल्यावर १० दिवस झाले तरी त्या प्रांताच्या राज्यपालांनी अजून निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या नाहीत त्यामुळे इम्रान खान यांच्या पक्षाकडून अधिकाधिक तीव्र आंदोलन करण्यात येत आहे पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणूक होऊन आठवडा झाला तरी अजून महापौर निवडण्यात आलेला नाही तर त्यावरुन राजकारणाला वेग आला आहे ज्यामुळे अर्थव्यवस्थेकडे कोणाचेच लक्ष नाहीये असे म्हणण्यासारखी स्थिती आहे पाकिस्तानी संसदेत सुद्धा राजकारणाला वेग आला आहे एप्रिल महिन्यात इम्रान खान यांना सत्तेतून पायउतार
केल्यावर पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाच्या सर्व खासदारांनी आपल्या खासदारानी आपल्या पक्षाचे राजीनामे सभागृहाच्या अध्यक्षांकडे दिले मात्र सभागृहाच्या अध्यक्षांनी ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विविध कारणे  देत मंजूर केले नाही अखेर जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरवातीच्या दिवसात अचानक त्यांनी ते मंजूर केले हे राजीनामे मंजूर करण्यता यावे यासाठी दरम्यानच्या काळात इम्रान खान विविध प्रकारे हे राजीनामे मंजूर कऱण्यात यावे म्हणून दबाव आणले मात्र तेव्हा ते केले नाही पाकिस्स्टन तेहरीके इन्साफ या पक्षाच्या खासदारांचे  राजीनामे  मंजूर करण्याची मोहीम नॅशनल असेम्ब्ली (आपल्या लोकसभासदृश्य सभागृह )च्या अध्यक्षांनी सुरु केल्यावर पाकिस्तानी तेहरीक इन्साफ या पक्षाकडून बदलेल्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हे राजीनामे मंजूर करू नये अशी विनंती केली तरी नॅशनल असेम्ब्ली च्या अध्यक्षांनी त्यास केराची टोपली दाखवली . त्यावरून सध्या पाकिस्तनच्या राजरकारांत आरोप प्रत्यारोप करण्यासवेग आला आहे

 पाकिस्तान मध्ये राजकीय अशांतता निर्माण झाल्यास त्याचा परिमाण भारतावर देखील होतो, असा आतापर्यंतचा इतिहास आहे पाकिस्तान अन्नवस्त्रप्रधान देश आहे देशातील अशांतेमुळे हा साठा अयोग्य व्यक्तींच्या हाती जाण्याचा धोका नाकारता येत नाही पाकिस्तानच्या आसपासच्या देशांचा विचार करता पाकिस्तानमध्ये अशांतता निर्माण झाल्यास तेथील निर्वासित चोरट्या मार्गाने का होईना ते भारतात येण्यासासाठी पर्यटन करणार हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे पाकिस्तानमध्ये अराजकता निर्माण झाल्यास

त्याचा परिमाण दक्षिण आशियात मोठ्या प्रमाणत अशांतता निर्माण होईल जे भारताच्या प्रगतीला मारक ठरणार हे सांगायला कोण्या ज्योतिष्याची मदत लागायला नको त्यामुळे पाकिस्तनमधील घडामोडी आपल्यासाठी देखील महत्वाच्या आहेत

#ही_माझ्या_ब्लॉगवरील_पाकिस्तनविषयक_शंभरावी_पोस्ट आहे      


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?