हवामान वेगाने तीव्र होतंय आपण या बदलला तयार आहोत ?


ध्या जगभरातील हवामानाच्या घटनांकडे एक नजर टाकल्यास  कोणत्याही भारतीयांच्या  मनात प्रश्न एकच हवामान वेगाने तीव्र होतंय आपण या बदलला तयार आहोत का  ? सध्याच्या हिवाळ्याच्या काळात जगभरात अनेक ठिकाणी नीचांकी तापमानाचे गेल्या कितीतरी वर्षातील मोडले जात आहेत . हाडे पूर्णतः गोठवणारी थंडी अनुभवयास येत आहे आखाती प्रदेशातील ओमान हा देश सुद्धा या तडाख्यातून सुटला नाहीयेओमान य वाळवंटी देशात हिमवर्षाव झाला आहे चीनमध्ये गेल्या ५० वर्षातील निच्चांकी तापमान नोंदवण्यात आले आहे  अमेरिका देशात अनेक भागत तापमान शून्याचा खाली नोंदवण्यता आले आहे . दक्षिण कोरियामध्ये झालेल्या होमवर्षावामुळे अनेक गंभीर प्रश्नांना तेथील सरकार सामोरे जात आहे हि झाली हिवाळ्याची गोष्टी . मागच्या वर्षातील एप्रिल मे महिन्यातील  बातम्या आठवून बघा जर आठवत नसतील तर अजून दोन महिने वाट बघा उकळत्या तेलात पडलो तर नाहीना असे वाटावे इतक्या मोठ्या तापमानाच्या बातम्या आपणास ऐकायला / वाचायला मिळतील .त्याच प्रमाणे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात झालेल्या प्रचंड पावसाचा आपण अनुभव आपणास आठवत असेलच  हवामान प्रचंड लहरी झाल्याचेच यातून स्पष्ट होत आहे 

जगभरात या लहरी हवामानाच्या विरोधात लढण्यासासाठी विविध पाऊले उचलली जात आहे ज्यामध्ये युरोपीय युनियनने मधमाश्या फुलपाखरू छोटे कीटक यांची संख्या वाढण्यासाठी प्रयत्न करायला सुरवात करणे युनाटेड किंगडम (इंग्लंड ) या देशाच्या सरकारने पोलाद शुद्ध करण्याचा प्रक्रियते कोळस्यापासून निर्माण न करता निर्माण झालेल्या ऊर्जेचा वापर या क्षेत्रातील कंपन्यांनी करावा यासाठी मोठ्या प्रमाणत निधीची तरतूद करणे आणि यासाठी या क्षेत्रात कार्यरत कंपन्यांना मोठ्यास्तरावर अर्थसाह्य करणे जागतिक बँकेकडून हवामान बदलाच्या परिणामाविरुद्ध कार्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणत राखीव निधीची तरतूद करणे आदी उपाययोजना करण्यात येत

आहे जर्मनी आणि ऑस्ट्रेलिया, फिलिपाइन्स  या देशातील केंद्रीय सत्ता या हवामान बदलाच्या संकटाच्याबाबत सत्ताधिकारी वर्ग पुरेशी काळजी घेत  नाही या कारणामुळे बदलला . युनाटेड किंगडम (इंग्लड ) या देशात आम्ही फक्त हवामान बदलाविषयी कार्य करू असे सांगत एका राजकीय पक्षचा उदय झाला {युकेमध्ये बहुपक्षीय लोकशाही आहे मात्र तेथील राजकारणात जव्वाल्पास १०० % वाटा हा लेबर पार्टी आणि कॉन्झार्टिव्ह पार्टी या दोन पक्षांनीच व्यापलेला असल्याने अनेकांचा या देशात दोनच पक्ष आहेत असा गैरसमज होतो } त्यास आता चार वर्ष होत आहे फ्रान्समधील निवडणुकीत देखील हवामान बदल हा प्रमुख मुद्दा असतो 

       याउलट  भारतात काही स्वयंसेवी  संस्था आणि काही प्रमाणात सरकारी प्रयत्न वगळता हवामान बदल याविषयी काही ठोस होताना दिसत नाहीये पूर्वी जसे एखाद्या रोगाचा रुग्ण दाखवा हजार रुपये मिळवा या प्रकारच्या जाहिराती भिंतीवर दिसत त्याच  प्रमाणे कोणत्याही राजकारणी व्यक्तीने हवामान बदलाविषयीचे केलेले वक्तव्य दाखवा एक लाख मिळवा अशी सध्याची स्थिती आहे जगातील दुसऱ्या (किंवा पहिल्या सुद्धा )क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या आपल्या भारतात गेल्या काही वर्षातील हवमान बदलाविषयीचच्या  काही अहवालात सांगण्यात आलेली स्थिती आणि लोकसंख्या यांचा विचार करता पुरेसे बोलले जात नाहीये हवामान बदलाचे संकट समस्त भारतीयांना सारख्याच प्रमाणत भोगावे लागणार आहे हे संकट एका जाती धर्मातील लोकांना कमी कष्टकरी आणि दुसऱ्या 
एखाद्या जातीतील धर्मातील लोकांना अधिक कष्टकरी ठरणार नाहीये आज जगात हववमान बदलाचे जे परिणाम दिसत आहेत तितके तीव्र परिणाम सध्या भारतात दिसत नसले तरी आपल्या भारताला देखील या संकटाला सामोरे जावेच लागणार आहे ते आता जात्यात आहे आणिआपण सुपात इतकाच तो काय फरक मात्र आपण देखील जात्यात जारण आहोत हे सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे मात्र आपल्याकडील या बाबतची स्थिती बघता एका प्रश्न कायम उरतोच हवामान वेगाने तीव्र होतंय आपण या बदलला तयार आहोत ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?