इंडो चायनाची सफर घडवणारे अप्रतिम पुस्तक अपूर्वरंग 


आपल्या मराठीतील आमची काशी प्रवाशाची हकीगत या १९  व्य शतकाच्या पुस्कापासून प्रवास वर्णनाची मोठी पंरपरा आहे . जगातील विविवध प्रदेशाची माहिती मराठी भाषिक व्यक्तींनी प्रवास करून  मराठीत आणली आहे त्यामुळे ज्यांनी  काही कारणाने  त्या प्रदेशात प्रवास केलेला नाही .अश्या व्यक्तींना देखील त्या प्रदेशातलं प्रवास करण्याची अनुभूती मिळते आपल्या मराठीत अंशी अनेक प्रवासवर्णने प्रसिद्ध आहेत सुप्रसिद्ध लेखिका मीना प्रभू आशयाचे काही प्रसिद्ध प्रवास वर्णने प्रसिद्ध असलेल्या लेखकांपैकी एक. त्यांनी जगभरातील अनेक पदेशनानं भेट देत त्या ठिकाणचे आपले अनुभव पुस्तकरूपाने  शब्दबद्ध केले आहेत त्यांच्या आशयाचे एका पुस्तकांपैकी एक ज्यात  त्यांनी इंडॉ चायना भागातील अनुभव मांडलेलं आहेत असे पुस्तक अर्थात अपूर्वरंग भाग २ मी नुकतेच सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या सहकार्याने वाचले 
       सुमारे ३५० पाणी असलेल्या या पुस्तकात त्यांनी  भारतातील अंदमान निकोबार बेटांसह म्यानमार , कंबोडिया , थायलंड व्हिएतनाम . मलेशियाया पाच देशांची सफर घडवली आहे  पुस्तकाची भाषा अत्यंत सहजसोपी असून वर्णातम्क असल्याने पुस्तक कुठेही कंटाळवाणे झालेलं नाही मात्र या पुस्तकासाठी वापरलेली पाने फारशी उत्तम नाहीत पुस्तक सार्वजनिक वाचनालयाचे आहे हे मान्य केले तरी पुस्तक प्रसिद्ध होऊन फारशी वर्षे झालेली नाहीत असे असून देखील त्यांची पाने बरीच पिवळी पडलेली मला दिसली तसेच पुस्तकात चित्रे सुद्धा फारशी नाहीत मात्र चित्रांसाठी तुलनेने चांगला कागद वापरला आहे हीच ती समाधानाची बाब त्यामुळे पुस्तक काहीसे कंटाळवाणे होते त्यावर विशेष मेहनत घेयला पाहिजे होती असो 
 पुस्तकाची सुरवात त्यांच्या पास्पोर्टचे नूतनीकरण करण्यासाठी त्या पुण्यातील कार्यालयात गेले असता त्यांना आलेल्या अनुभवांपासून होते त्यांनतर लेखिका आपणास घेऊन जाते अंदमान निकोबार बेटांवर तेथील पोर्ट ब्लेयरचे सेल्युलर जेल , तसेच अन्य  बेटांवर  ,यावेळी लेखिका त्यानाच फिरताना आलेले अनुभव कथन करते यामध्ये तेथील खाद्य संस्कृती , तेथील विविध पर्यटनस्थले , तेथील समाजजीवन , लोकांची आर्थिक स्थिती सुधारल्याने विविध समाज घटक कोणत्या प्रकारे विमानप्रवास करतात विमान प्रवास्यांबाबतचे बदलते विश्व पर्यटकांविषयीचा स्थानिकांचा दृष्टिकोन आपल्या भारतीयांची पर्यटनविषयीची आस्था  याविषयी भाष्य करते आणि पहिले प्रकरण संपते दुसऱ्या प्रकरणात लेखिकेने त्यांचे म्यानमार मधील अनुभव सांगितले आहे त्या ठिकाणी त्यांनी मंडाले ,रंगून आदी ठिकाणी भेटी दिल्या . त्या ठिकणाशी असणारे भारताचे नटे त्यांनी आपल्या लेखांत हळुवारपणे मांडले आहे भारतीय संस्कृतीचा म्यानमारच्या संस्कृतीशी असणारा संपर्क , तेथील खाद्यप्रकार ,तेथील बौद्ध धर्माचा प्रभाव असणारी जीवनशैली आदी गोष्टींबाबबत लेखकेने भाष्य केले आहे संस्कृतीचे धागेदोरे स्पष्ट करताना त्यांनी भारतीय नांवे आणि म्यानमारची नवे यांची तुलना केली आहे
         तिसऱ्या आणि चौथ्या प्रकारांत व्हिएतनाम आणि कंबोडियाविषयी बोलताना त्यांनी येथीलअंतर्गत यादवी कम्युनिष्ट राजवटीत तेथील जनतेने भोगलेले त्रास हाल अपेष्टा , अमेरिकेच्या युध्दमुळे त्यांच्यावर झालेले अत्याचार त्यांच्या एकमेकांत गुंफलेला इतिहास तेथिल वाहतूक व्यवस्था तेथील संस्कृतीवर भारतीयांसह चीनचा
असलेलेआ प्रभाव तेथिल जतनतेने स्वीकारलेल्या चिनी रूढी पंरपरा , तेथील समाजजीवनवर असणारा बौद्ध धर्माचा प्रभाव , तेथील जनतेची भारतीयांशी असणारी नाळ तेथिल बौद्ध पॅगोडे ,देऊळ यांपाचव्या ची सफर लेखिका घडवते पाचव्या आणि सहाव्या प्रकरणात थायलंड आणि मलेशियाचे सफर घडवताना लेखिकेने थायलंडमधील कुप्रसिद्ध वेश्याव्यवसाय आणि मलेशियातील इस्लामी प्रभाव यावर आपली मते मांडत तेथील फिरण्याचा  अनुभव स्पष् केला आहे  या दोन्ही प्रवाश्यात त्यांनी तेथील वाहतूक व्यवस्था तेथील इऐतहासिक वास्तु धार्मिक महवताच्या वास्तु भौगोलिक कर्मातीच्या वस्तूंची सफर लेखिकेने घडवली आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?