रशिया युक्रेन युद्धाची तीव्रता वाढणार का?

       


 रशिया युक्रेन युद्धाची तीव्रता वाढणार का ?असा प्रश्न सध्या निर्माण होत आहे त्याला कारण आहे जर्मनीने युक्रेनला आम्ही आमच्या बनावटीचे रणगाडे देऊ इच्छितो अशी घोषणा केल्याचे  २६ जानेवारीला जर्मनीने ही घोषणा  घोषणा केल्यानंतर काही तासातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन बायडेन यांनी देखील आम्ही देखील आमचे रणगाडे युक्रेनला देऊ इच्छितो अशी घोषणा केली . रशियाच्या सरंक्षण मंत्रालयाने याबाबत प्रतिक्रिया देताना यामुळे युद्धाची भीषणता वाढण्याची शक्यता दाखवली आहे . मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्षांनी याबाबत काहीही मतप्रदर्शन हा लेख लिहण्यापर्यंत केलेलेनाही युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष यांनी या निर्णयाचे स्वागत करताना आम्ही या मदतीमुळे अधिक सक्षमतेने लढू शकू अशा आशावाद व्यक्त केला आहे  ऊत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जॉन ऊन यांनी रशिया युक्रेन युद्ध थांबवण्याबाबत युनाटेड नेशन अपयशी ठरल्याची टीका केली आहे याबाबत रशियाकडून उत्तर कोरिया रशियनबरोबर असलेली त्यांच्या सीमावर्ती प्रदेशात काय उपद्रव करतो याकडे लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे 

        जर्मनीने रणगाडे देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यस्ख युद्धभूमीवर हे रणगाडे दिसण्यासासाठी काही महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे सध्या युक्रेन सेव्हियत बनावटीच्या रणगाडे वापरत आहे त्यापेक्षा जर्मनी आणि अमेरिकेत वापरण्यता येणाऱ्या रणगद्याचे तंत्रज्ञान वेगळे आहे त्यामुळे हे रणगाडे वापरण्याचे कौशल्य युक्रेनच्या सैनिकांना शिकावे लागणार आहे त्यासाठी सुमारे ३ ते ४ महिने लागू शकतात त्या नंतरच हे रणगाडे प्रत्यस्ख युद्धभूमीवर दिसू शकतील आतापर्यंतच्या ११ महिन्यात पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी आणि अमेरिकेने दारुगोळा , आणि विविध प्रकराची क्षेपणास्त्र आदींची मदत केली आहे रणगाडे मिळण्याची शक्यता निर्माण झाल्यावर युक्रेनने पाश्चात्य युरोपीय देशांकडे जेट या प्रकारच्या लढाऊ विमानाची मागणी केली आहे . मात्र रणगाड्याच्या बाबतीत जशी कॊशल्याची समस्या आहे तीच याही बाबतीत आहे जर युक्रेनला हि मदत मिळाल्यास या युद्धाची तीव्रता मोठ्या प्रमाणत वाढणार हे सूर्य प्रक्शाइतके स्पष्ट आहे 

       गे ल्या ११ महिन्यापासून सुरु असलेल्या या युद्धादरम्यान युक्रेनची बाजू घेणाऱ्या  पश्चिम युरोपीय देशांच्या नैसर्गिक इंधनाच्या पुरवठ्यात कमी करून पश्चिम युरोपीय देशांवर दबाव निर्माण करण्याच्या प्रयत्न केला आहे  आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध नेत्यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांच्याशी विविध जागतिक व्यासपीठावर चर्चा केली मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरल्याने युद्ध ११

महिने झाले तरी अद्याप सुरूच आहे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध युक्रेनच्या भूमीवरलढले जात असल्याने या युद्धात युक्रेनचे सर्वसामान्य नागरिक प्राणास मुकले आहेत युक्रेनच्या विविध साधनसामुग्रीचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहेज्यामुळे आज जरी युद्ध थांबले तरी हे नुकसान भरून काढण्यासाठी युक्रेनला मोठी किंमत मोजावी लागेल . त्या पार्श्वभूमीवर आपण या घडामोडी बघायला हव्यात 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?