अब तक @७९


अब
तक @७९ ! चमकालांत नाअब तक @५६ हे ऐकले होते आता अब तक @७९ ,म्हणजे काय ? तर मित्रानो अब तक@ ७९ म्हणजे भारताच्या ग्रँडमास्टरांची संख्या आहे हो भारताच्या ग्रँडमास्टरांची संख्या आता ७९ झाली आहे तुम्ही म्हणत असाल दोन जूनलाच भारताला ७८ वा ग्रँण्डमास्टर मिळाला होताना तर हो तुम्ही बरोबर आहात जानेवारीला भारताला कौस्तुभ चॅटर्जी हे  ७८ ग्रँडमास्टर मिळाले  होते . कौस्तुभ चॅटर्जी हे भारताचे ७८ वे ग्रँडमास्टर होऊन ९६ तास पूर्ण होत नाही तोच भारताच्या ग्रॅण्डमास्टरांची एकाने वाढली आहे तामिळनाडू राज्याचे रहिवाशी असलेलं प्रणेश एम यांनी जानेवारी रोजी ग्रँडमास्टरपदाला गवसणी घातली . 

              स्वीडन देशात  २२ डिसेंबर २०२२ ते जानेवारी दरम्यान सुरु असणाऱ्या Rilton Cupया स्पर्धेत डावात   विजय आणि एका  पराभवासह आठ  गुणांची कामगिरी करत प्रणेश एम यांनी हा बहुमान पटकावला ग्रँडमास्टर होण्यसासाठीच्या तीन पात्रात प्रणेश एम यांनी या आधीच पूर्ण केल्या होत्या मात्र १६ वर्षीय प्रणेश एम

यांचे इलो रेटिंग हे ग्रँडमास्टरपदाला आवश्यक असणाऱ्या २५०० चा टप्पा ना गाठू शकल्याने त्यांना ग्रँडमास्टर पदाचा बहुमान मिळाला नव्हता . Rilton Cup या स्पर्धत २५ विविध देशांमधून आलेल्या १३६ खेळाडूंमधून सर्वोत्तम कामगिरी करत त्यांनी हा अडथळा देखील पार केला त्यामुळे आठवड्याच्या आत बुद्धिबळप्रेमींना पार्टी साजरी करण्याची संधी मिळाली

     त्यांनी जानेवारी 2020 मध्ये 18 व्या दिल्ली GM ओपनमध्ये पहिला नॉर्म जिंकला, त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये स्पेनमधील सनवे सिटगेस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महोत्सवात दुसरा. तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आशियाई कॉन्टिनेंटल चेस चॅम्पियनशिपमध्ये तिसरा नॉर्म जिंकला आणि शेवटी 2023 मध्ये ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक ELO अंक ओलांडला.प्रणेश यांनी  नॉर्वेच्या जीएम फ्रॉड ओलाव ओलसेन उर्केडलचा पराभव करून जीएम पदवी मिळविण्यासाठी आवश्यक अंतिम मानक गाठले  

   प्रणेश एम यांनी  गरीब आर्थिक परिस्थितीतुन  बाहेर पडत हे यश मिळवले . त्यांची आई करिकुडी या तमिलनाडुच्या एका छोट्याशा गावातअंगणवाडी सेविकांचे काम करतात याबद्दल भारताचे पहिले ग्रँडमास्टर आणि पाचवेळा विश्वविजेते असणाऱ्या बिशननाथन आंनद यांनी Congratulations to GM Pranesh on an excellent performance. He won with an incredible score”हे ट्विट करत शुभेच्छा दिल्या तसेच५ वेळा  विश्वविजेत्याअसणाऱ्या मॅग्नस कार्लसन यानाएकाच कॅलेंडर वर्षात दोनद हरवणाऱ्या तामिळनाडूचेच भूमिपुत्र असणाऱ्या ग्रँडमास्टर  प्रगण्यानंद आर  यांनी देखील त्यांना यशाबाबद्दल शुभेच्या दिल्या आहेत   (गेल्या काही

महिन्यात सातत्याने बुद्धिबळपटू अत्यंत चमकदार कामगिरी करत आहेत त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी या खेळाडूंची नावे लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे खेळाडूंची नावे  देत हे खेळाडू कोणत्या खेळाचे प्रतिनिधीत्व करतात असा प्रश्न राज्यसेवा परीक्षेत विचारला जाऊ शकतो २०२० साली झालेल्या यूपीएससीच्या परीक्षेत प्रिलिममध्ये विचारण्यात आलेले प्रश्न हे मोठ्या संख्येने खेळाशी संदर्भात होते हे आपण लक्षात घेयला हवे )

 एकंदरीत गेल्या काही महिन्यापासून भारतीय बुद्धिबळाचे सुवर्णयुगच सुरु असल्याचे दिसत आहे हे सुअवर्णयुग असेच सुरु राहिल्यास बुद्धीच्या या खेळामध्ये ग्रँडमास्टरांच्या संख्येने शतक गाठल्याचा क्षण लवकरच येऊ शकतो तो लवकरात लवकर यावा यासाठी आपण सर्व देवाला प्रार्थना करूया 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?