२०२३ मध्ये पुढील खगोलीय चमत्कार आपली वाट बघत आहे !

     


       अंधाऱ्या  रात्री आपण  आकाशाकडे नजर टाकल्यास आपणास आकाशाचे नयनरम्य विलोभनीय दर्शन होते . ज्याचे आपल्या  सर्वांनाच प्रचंड आकर्षण असते   आपण आकाशाचे निरीक्षण करत असताना जर एखादा खगोलीय अविष्कार आकाशात दिसत असेल तर मग सोन्याहून पिवळे . या २०२३ वर्षात सुद्धा अश्या काही घटना आहेत ज्यावेळी आकाशाचे दर्शन करणे अत्यंत ऊत्तम आहे . चला तर जाणून घेउया या विषयी .

      या खगोलीयघटनांचे आपण सूर्यग्रहण , चंद्रग्रहण , उल्का वर्षाव ., धूमकेतूचे दर्शनसूर्यमालिकेतील ग्रहांचे विलोभनीय दर्शनविविध ग्रहांची एकमेकांशी होणारी युती . यासारख्या विविध प्रकारात विभाजन करू शकतो . त्यातील उल्का वर्षाव या प्रकारातील घटना सर्वप्रथम बघूया

        तर मित्रानो वर्षाची सुरवातच उल्का वर्षावाने होणार आहे , वर्षाच्या पहिल्या आठवाड्यातच बुटेस नक्षत्रातून उल्का वर्षाव होईल मात्र सदर उल्का वर्षाव  परंतु आकाशात कुठेही दिसू शकतो . 003 मध्ये सापडलेल्या 2003 EH1 नावाच्या नामशेष धूमकेतूने मागे सोडलेल्या धुळीच्या कणांनी त्याची निर्मिती केली असल्याचे मानले  हा उल्का वर्षाव वर्षभरात होणाऱ्या उल्कवर्षावांचा विचार करता मध्यम श्रेणीत येऊ  शकेल असा उल्काववर्षाव आहे   जाते.दरवर्षी   ते जानेवारीपर्यंत चालतो. या वर्षी   तारखेच्या रात्री आणि तारखेला पहाटे या उल्कावर्षावातून मोठ्या संख्येने उल्कावर्षाव होईल मात्र याच काळात पौर्णिमा असल्याने चंद्रबिबामुळे काहीशी अडचण येऊ शकते .    Lyrids उल्कावर्षाव. बघण्यासासाठी यावर्षी २२ आणि २३ एप्रिल हे दिवस सर्वोत्तम आहेत दरवषी १६ ते २५ एप्रिल दरम्यान हा उल्कावर्षाव होतो हा उल्कावर्षाव धूमकेतू C/1861 G1 थॅचरने मागे सोडलेल्या धुळीच्या

कणांमुळे निर्माण होतो या धूमकेतचा शोध , १८६१ मध्ये लागला होता.या उल्का कधी कधी चमकदार धुळीच्या खुणा तयार करू शकतात जे कित्येक सेकंद टिकतात. त्यामुळे निर्माण होणारे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे असते   हा उल्का वर्षाव वर्षभरात होणाऱ्या उल्कवर्षावांचा विचार करता मध्यम श्रेणीत येऊ  शकेल असा उल्काववर्षाव आह Eta Aquarids उल्कावर्षाव बघण्यासाठी यावर्षी आणि मे  हे दोन दिवस उत्तम आहेत . हा उल्कावर्षाव सुप्रसिद्ध हॅलेच्या धूमकेतूमुळे होतो . हा उल्का वर्षाव वर्षभरात होणाऱ्या उल्कवर्षावांचा विचार करता ऊत्तम श्रेणीत येऊ  शकेल असा उल्काववर्षाव आहे या उल्कावर्षावात दक्षिण गोलार्धात तशी ६० उल्का तर उत्तर गोलार्धात तशी ३० पर्यंत उल्का दिसू शकतात हा उल्कावर्षाव कुंभ राशीतून होतो Delta Aquarids    हा उल्कावर्षाव यावर्षी २८ आणि २९ जुलै हे दोन दिवस उत्तम आहे दरवर्षी कुंभ राशीतून १२ जुलै ते २३ ऑगस्ट दरम्यान हा उल्काववर्षाव कुंभ राशीतून होतो हा उल्कावर्षाव  मार्सडेन आणि क्रॅच या खगोलशास्त्रज्ञांनी शोधलेल्या आणि त्यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या धूमकेतूमुळे होतो वर्षभरात होणाऱ्या उल्कावर्षावाचा विचार करता हा उल्कवर्षाव माध्यम श्रेणीत मोडणारा उल्कावर्षाव आहे ज्यामध्ये तशी २० उल्का दिसू शकतील .पर्सीड्स उल्कावर्षाव यावर्षी १२ आणि १३ ऑगस्ट रोजी सर्वोत्तम स्थितीत दिसेल वर्षभर होणाऱ्या उल्कावर्षावाचा विचार करता हा उल्कावर्षाव सर्वोत्तम श्रेणीत मोडता येऊ शकतो या उल्कवर्षावात तासी  ८०पर्यंत उल्का दिसू शकतात हा उल्का वर्षाव स्फीट  टटल या धूमकेतूमुळेदरवषी १७ जुलै ते २४ ऑगस्ट दरम्यान होतो आपल्याकडे हा पावसाचा कालावधी असल्याने याची मजा आपल्याला पुरेशी घेता येत नाहीड्रॅकोनिड्स उल्कावर्षाव वर्षभर होणाऱ्या उल्कावर्षावाचा विचार करताकिरकोळ या श्रेणीत हा उल्कावर्षाव आहे ज्यामध्ये फक्त तासी  १०उल्का पडतात 21P Giacobini-Zinner या धूमकेतूने द्वारे मागे सोडलेल्या धुळीच्या कणांद्वारे त्याची निर्मिती केली जाते,. ते १० ऑक्टोबर मध्ये दरवषी हा उल्का वर्षाव होतो यावर्षी या उलवर्षावाची सगळ्यात सगळ्यात चांगली  स्थिती ऑक्टोबर रोजी आहेओरिओनिड्स  हा मध्यम
श्रेणीतील उल्कावर्षाव आहे ज्यामध्ये तासी २० पर्यंत उल्का दिसू शकते . हा उल्कावर्षाव  सुप्रसिद्ध धूमकेतू, हॅलेच्या धूमकेतूमुळे होतो  दरवर्षी 2 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर या कालावधीत हा उल्कावर्षाव होतोटॉरिड्स हा दीर्घकाळ चालणारा किरकोळ उल्कावर्षाव आहेज्यामध्ये  तासी ते १० उल्का दिसतात . दरवर्षी 7 सप्टेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत  हा उल्का वर्षाव होतो यावर्षी या वर्षी 4 नोव्हेंबरच्या रात्री आणि 5 तारखेच्या पहाटे याची सर्वोत्तम अवस्था आहे हा उल्कावर्षाव का होतो याबाबत दोन मतप्रवाह आहेत एका मतानुसार  2004 TG10 या लघुग्रहामुळे तर  दुसऱ्या मतानुसार  तू 2P Encke या धूमकेतूमुळे हा उल्कावर्षाव होतो

लिओनिड्स उल्कावर्षाव. बघण्याची सर्वोत्तम वेळ १७ आणि १८ नोव्हेंबर आहे सिंह राशीतून होणार हा मध्यम किंवा किरकोळ श्रेणीत मोडणारा उल्कावर्षाव आहे ज्यामध्ये दर तासाला १५ उल्का पडतात हाउल्का वर्षाव दर ३३ वर्षांनी उत्तम स्थितीत येतो जेव्हा हा उलवर्षाव उत्तम स्थितीत असतो तेव्हा तासी १०० हुन अधिक वेगाने उल्कावर्षाव होतो या आधी २००१ साली तो सर्वोत्तम दिसला होता टेम्पल टटल या धूमकेतू मुळे ते ३० नोव्हेंबर रोजी हा उल्कावर्षाव होतो

उल्कावर्षावाचा राजा म्हणता येईल अशा उलकवर्षाव वर्षाच्या शेवटी बघता येईल जेमिनिड्स , उल्कावर्षावात सर्वोत्तम अवस्थेत  प्रति तास १२० बहुरंगी उल्का पाडण्याचा इतिहास आहे यावर्षी हि अवस्था १३ आणि १४ डिसेंबर रोजी गाठली जाईल मिथुन राशीच्या पार्श्वभूमीवर हा उल्का वर्षाव होईल . १९८२ मध्ये शोधलेल्या ३२०० Phaethon नावाच्या लघुग्रहामुळे हा उल्कावर्षाव होतो  दरवर्षी ते १७ सेंबरपर्यंतहा उल्काववर्षाव होतो

वर्षाची अखेर उर्सिड्स या किरकोळ उल्कावर्षावाने होईल आहे ज्यामध्ये तासी ते १० उल्का पडतील दरवर्षी१७

२५ डिसेंबर या कालावधीत हा उल्का वर्षाव होतो या वर्षी 21 तारखेच्या रात्री आणि 22 तारखेच्या पाहते हा उलवर्षाव सर्वोत्तम असेल

उल्कावर्षावानंतर वळूया ज्या विषयी समजत अत्यंत भीती आहे अश्या ग्रहणाकडे तर मित्रानो २० एप्रिलला सूर्यग्रहण आहे जे आपल्या भारताचा विचार करता कंकणाकृती दिसले आपल्या भारतात दक्षिणी  भागात जसे तामिळनाडू केरळ या राज्यात आणि अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेकडील भागात ते सदर सूर्यग्रहणाच्या जास्त आनंद घेता येईल तुमचे कोणी त्या ठिकणी परिचित असतील तर त्यांच्याशी २० एप्रिलला त्यांच्या गावी भेटण्याचे नियोजन आपण करू शकता५ मेला चंद्रग्रहण आहे जे संपूर्ण आशिया आणि ऑस्ट्रेलिया आणि पूर्व युरोप आणि पूर्व आफ्रिकेतील काही भागांमध्ये दिसेल.ग्रहणा दरम्यान चंद्र किंचित गडद होईल परंतु पूर्णपणे नाही. १४ ऑक्टोबरला कंकणाकृती सूर्यग्रहण होईल ग्रहण कंकणाकृती असल्याने सूर्याचा कोरोना (बाह्य आवरण ) दिसणार नाही ग्रहणाचा मार्ग दक्षिण कॅनडाच्या किनाऱ्यापासून पॅसिफिक महासागरात सुरू होईल आणि दक्षिण-पश्चिम युनायटेड स्टेट्स आणि मध्य अमेरिका, कोलंबिया आणि ब्राझील ओलांडून जाईल. संपूर्ण उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत आंशिक ग्रहण दिसेल २८ ऑक्टोबरला आंशिक चंद्रग्रहण होईल संपूर्ण युरोप, आशिया आणि आफ्रिका आणि पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये हे ग्रहण दिसणार आहे

मुबई पुणे नाशिक या सारख्या मोठ्या शहरातून काही संस्था ग्रहण दाखवतात . जे या शहराच्या आसपास राहत नाही किंवा जे अश्या संस्थेपर्यंत पोहोचवू शकत नाही अश्याव्यक्ती अंधश्रद्धा निर्मूलन संस्था या सारख्या संस्थांची मदत घेत ग्रहणाचा आनंद घेऊ शकतात नाशिकच्या रामकुंड परिसरात अंधश्रद्धा निर्मूलन संस्था दरवेळी मोफत  ग्रहण दाखवते आपण त्याचा फायदा घेऊ शकतात

अन्य खगोलय अविष्काराचा विचार करता ३० जानेवारीची पहाट हि बुधग्रह बघण्यासाठीची सर्वोत्तम वेळ असेल यावेळी पूर्व दिशेला जमिनीलगतच्या आकाशात तो दिसत असल्याने जास्त मन उंचावी देखील लागणार नाही यांनतर बुध ग्रह बघण्यस्साठी ११ एप्रिलच्या सायंकाळसापर्यंतवाट बघावी लागणार आहे ११ एप्रिलला सायंकाळी सूर्यास्ताच्या पासून पुढील अर्धा ते पाऊण तास आपणास पश्चिमला क्षितीजाच्या सर्वोच्च ठिकाणी तो दिसले आपण मोकळ्या जागेत बघितले असता ज्या ठिकाणी आपणास जमीन आणि आकाश एकत्र आलेले दिसते त्यास क्षितिज

म्हणतात . त्यानंतर २९ मेला सूर्योदयापूर्वी  क्षितीजाच्या सर्वोच ठिकाणी आपणास बुध ग्रह बघता येईल १० ऑगस्ट या माझ्या जमन्दिनीसुद्धा संध्याकाळी आपण पश्चिमला आपण बुद्ध ग्रह उत्तम बघू शकतात   बुध ग्रह आकाश्यात सध्या डोळ्याने जरा प्रयत्न केल्यास दिसू शकतो मात्र सहजतेने दिसणे अवघड आहे

शुक्र बघण्यस्साठी जूनची संध्याकाळ हा उत्तम कालावधी आहे यावेळी पश्चिमेला आपण नजर तालुक्यास क्षितीजाच्या सर्वोच ठिकाणी अत्यंत ठळक असणारा शुक्र आपण सहजतेने बघू शकतो व्याध ताऱ्यानंतर शुक्र ग्रह त्यांच्या तेजस्वीपणामुळे सहज ओळखता येतो २३ ऑक्टोबरला पहाटे पूर्वेकडे सुद्धा आपणास शुक उत्तम दिसेल

     २७ ऑगस्टची रात्र शनी आणि त्यांच्या कड्या आणि त्याचे उपग्रह बघ्याची सर्वोत्तम वेळ असेल शनीचे फोटो काढण्यासाठी हि सर्वात उत्तम वेळ असेल यावेळेस शनी कुंभ राशीच्या पार्श्वभूमीवर असेल तो सर्वात ठळक असल्याने सहज ओळखता येईल दर ३० वर्षांनी शनी आणि पृथ्वी एकमेकांच्या अगदी जवळ येतात तो योग यावर्षी २७ ऑगस्टला जुळून येत आहे मात्र ३१ ऑगस्टला असणाऱ्या अजून एका खगोलीय घटनेमुळेया काळात टीव्हीपासून दूर राहावे  ( ज्याची माहिती पुढे येईलच  )  नोव्हेंबर रोजीची संध्याकाळ हि गुरु ग्रहाचे निरीक्षण करण्याची सर्वोत्तम वेळ आहे यावेळी गुरु आणि पृथ्वी यांच्यातील अंतर सर्वात कमी असेल

याखेरीज ३१ ऑगस्टला असणाऱ्या पौर्णिमेला आकाशात चान्द्रबिब सगळ्यात मोठे दिसेल ऑगस्ट महिन्यातील हि दुसरी पौर्णिमा असेल याआधी ऑगस्ट आणि जुलै रोजीच्या पौर्णिमेला देखील चान्द्रबिब उत्तम दिसणार आहे

याखेरीज १९ सप्टेंबर रोजी नेपच्यून आणि १३ नोव्हेंबर रोजी युरेनस रोजी सर्वोत्तम दिसतील मात्र १९ सप्टेंबर आणि १३ नोव्हेंबरची घटना सध्या डोळ्याने दिसणार नाही त्यासाठी दुर्बिणीची आवश्यकत आहे ते वगळता अन्य सर्व घटना सध्या डोळ्याने दिसू शकतात मग बघणार अन या घटना




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?