जागतिक राजकारणाला नवे वळण देणाऱ्या घटनेनंतरची 44 वर्षे!



11  फेब्रुवारी १९७९ ही फक्त एक तारीख नाहीये आज ४४ वर्षांनंतरही इराण ज्या क्रांतीची झळ सोसतोय त्या इराणच्या सु प्रसिद्ध (खरेतर कुप्रसिद्ध ) असणाऱ्या इस्लामी क्रांतीचा हा दिवस . गेल्या काही महिन्यापूर्वी इराण ज्या कारणाने धुमसत होता , त्या मॉरौलीटी पोलीस या संकल्पनेला जन्म देणाऱ्या इराणच्या इस्लमामी क्रांतीस येत्या शनिवारी ४४ वर्ष पूर्ण होत आहेत त्या निमित्याने या क्रांतीचया इविध टप्यावर प्राणास  प्राणास मुकलेला जीवांना भावपूर्ण आदरांजली .आजच्याच दिवशी 42वर्षापुर्वी अर्थात 1979 फेब्रुवारी 11 रोजी इराणमध्ये सुप्रसिद्ध खोमोनी क्रांती झाली. (याच वर्षी सेव्हियत सोशालिस्ट रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केले, ज्याची किंमत आज देखील अफगाणिस्तान भोगतोय.भारतीय राजकारणात सात्यत्याने चर्चिला जाणारा मंडल आयॊग याच वर्षाची निर्मिती असो.)

 आधुनिक मुल्यांवरील इराणची पायाभरणीचे स्वप्न घेवून त्याप्रमाणे सन 1961 पासून वाटचाल करणाऱ्या तत्कालीन इराणचे राजे शाह मोहमद्द  यांची सत्ता उलथवून टाकत , रुढिवादी धार्मिक विचारांचा प्रभाव असणारी राजवट ज्या दिवश्यापासून इराणमध्ये सुरु झाली, तो म्हणजे 1979 फेब्रुवारी 11. ज्याला आज 42 वर्षे पुर्ण होत आहे.त्यावेळच्या सरकारच्या काही धोरणांमुळे समाजात बेरोजगारी , आर्थिक विषमता वाढणे, या दोषांबरोबरच  इराणच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा फायदा अमेरीका देश घेत आहे. इराणला त्याचा काही फायदा होत नाही  तसेच आपण अमेरीकेचे गुलाम आहोत अशी भावना निर्माण झाली.ज्याचा फायदा तत्कालीन सरकारच्या विरोधात असणाऱ्या कट्टर मानसिकतेच्या लोकांनी घेतला,आणि इराणमध्ये धार्मिक क्रांती होवून 1921पासून धर्मनिरपेक्ष असी संविधानीक मान्यता असणारा

इराण हा देश संविधानीकरीत्या शिया इस्लामी देश बनला. ज्यामुळे अमेरीकाप्रणीत देशांनी त्याचावर आर्थिक बंधने लादली, ज्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था कोसळली. ज्यातून अधिक प्रमाणात कट्टरता तसेच अमेरीकेप्रती द्वेषात वाढ झाली. आखाती देशातील राजकारणाचे  संदर्भ या करंटीने पूर्णतः बदलले .सध्या आपणांस आखाती देशात जी कट्टरता अनुभवायास येतेत्याचा उदय होण्याच्या  त्याच्या सुरवातीच्या काळातील एक महत्वाची घटना म्हणून आपण या कडे बघू शकतो (१९७९ ,मध्येच अफगाणिस्तानमध्ये अमेरिका प्रणित धार्मिक सैन्य रशियाविरुद्ध लढण्यास सुरवात झाली ) इराणच्या लोकांच्या आधुनिकतेशी जुळणारी नाळ यामुळे काहीशी तुटली तो देश पारंपरिक कट्टरतेच विळख्यात गेला

 एका वर्षात सुरु होवून संपणाऱ्या  इराणी क्रांतीनंतर आपणास जगभरात कट्टरता वाढल्याचे दिसून येते. ज्याची झळ आपण अजूनही घेतोय जे दुर्दैवी आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?