आपण तयार आहोत का ?

         


  
युरोप आणि आशिया खंडाच्या सीमेवर वसलेल्या तुर्कीये (जुने नाव तुर्कस्तान ) या देशाची पहाट  फेब्रुवारी रोजी महाविध्वंसकारी भूकंपाच्या उद्रेकाने उजाडली . हा लेख लिहण्यापर्यंत या ठिकाणी १५०० नागरिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे . तुम्ही हा लेख वाचेपर्यंत याची संख्य मोठ्या प्रमाणत वाढलेली असू शकते . तुर्कीये  (जुने नाव तुर्कस्तान ) या देशावर ओढवलेले संकट महाभयानक आहे , त्यात जीवास मुकलेल्या व्यक्तींना सर्वप्रथम विनम्र आदरांजली  जगात काही भूकंपाची केंद्रे आहेत तुर्कस्तान हा देश अश्या भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील भागात मोडतो त्या ठिकाणी याच्या गोदर देखील मोठ्या रिक्टर स्केलचे भूकंप जाणवले आहेत /या महाविनाशकारी भूकंपामुळे काही प्रश्नाला जन्म मिळाला आहे .त्याविषयी बोलण्यासाठी आजचे लेखन  

         तर तुर्कस्तान सारखाच भूकंपासाठी संवेदनशील भाग म्हणजे आपला उत्तर भारत होय .भूगर्भ शास्त्रज्ञांनी उत्तर भारतात मोठा भूकंप होण्याची दाट शक्यता असल्याचे या आधीच वारंवार स्पष्ट केले आहे  https://www.volcanodiscovery.com  या संकेतस्थळावर तुम्ही जगभरात दररोज  किती भूकंप होत आहेत याची प्रदेशनिहाय आणि तीव्रतानिहाय माहिती देण्यात येत असते या संकेतस्थळावर बघितल्यास छोटे आणि तुलनेने शुल्लक स्वरूपाचे अनेक भूकंप होत असतात मात्र तुर्कीयेला झाला तास मोठा भूकंप नसल्याने त्यासही विशेष

बातमी होत नाही इतकेच तसेच जर आपण वर्तनमानपत्रे  नियमित वाचत असं;यास सध्या भूगर्भातील हालचाली मोठ्या प्रमाणत वाढल्याचे आणि त्यामुळे जगभरातील भूकंपाची संख्या वाढल्याचे दिसून येईल.  या घडामोडीवरून एक प्रश्न जन्माला येत आहे आपण या सारख्या प्रश्नाला सामोरे जाण्यसासाठी तयार आहोत का ? किल्लारीचा भूकंप रात्री झाला तुर्कस्थानच्या भूकंप देखील रात्री झाला (त्यामुळेच मृतांचा आकडा वाढला आहे ) तसेच यानैसर्गिक संकटाची फारशी पूर्वसूचना मिळत नाही या गोष्टींचा विचार करता आपणस या ससाठी नेहमीच तयार असणे आवश्यक आहे

              जगभरात भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील म्हणून काही प्रदेश ओळखले जातात भारतातील हिमालयीन प्रदेश आणि मैदानी प्रदेश याच प्रदेशांच्या यादीत येतात ज्यामध्ये भारताचे उत्तर प्रदेश,  बिहार,  हिमाचल प्रदेश, .  हरियाणा उत्तराखंड, पंजाब सिक्कीमसह संपूर्ण ईशान्य भारत दिल्ली जम्मू काश्मीर लडाख चंदीगड इतक्या मोठ्याभूभागाचा समावेश होतो भारतातील बहुसंख्य लोक याच भागात राहतात  त्यामुळे एका फार मोठ्या लोकसंख्येवरील कधीही फुटू शकणारा टाइम बॉम्ब म्हणूनच याकडे बघायला हवे त्या दृष्टीने आपण काही

उपाययोजना केल्यास तरच आपण या संकटातून यशस्वी  बाहेर पडू हे नक्की अन्य नैसर्गिक संकटांची चालूल बऱ्याच आधी लागते तसे या संकटाचे नाही त्यामुळे आपणास कायमच या संकटासाठी सज्जराहावे लागणार आहे सध्याच्या राजकीय घडामोडी बघता सरकारी स्तरावर याचे नियोजन परिपूर्ण असले तरी सामान्य जनता त्या साठी पुरेशी तयार नसल्याचे आपणास सहजतेनं दिसते म्हणून सातत्याने एक प्रश्न विचारला जातोय या संकटाला तोंड देण्यास आपण  तयार आहोत का ?


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?