१३ वर्षापुर्वीची जखम

         

   आजपासून १३ वर्षापुर्वीची गोष्ट आहे. स्थळ पुणे कँम्प परीसरातील जर्मन बेकरी नामक शंभर वर्षाहुन अधिक काळ जूनी असणारी प्रसिद्ध  बेकरी. वेळ सायंकाळी साडेसातची . वीक एंड असल्याने तरुणाईच्या गर्दीने बेकरी भरलेली. अचानक कोणाच्या ध्यानीमनी नसतान बेकरीच्या एका आसानाखालील एका वस्तूचा अर्थात बाँम्बचा स्फोट झाला.  ज्यामध्ये पुण्यामध्ये शिकायला आलेल्या बंगाल राज्यातील विद्यार्थ्यांसह 2 परदेशी विद्यार्थ्यांना  एकुण १३ जणांचा  दुर्दैवी मृत्यू झाला.तर काही ज्युधर्मीय आणि काही स्थानिक नागरीकांस  ६० जण जखमी झाले. आणि पुण्याची नोंद सुद्धा  दहशतवादी हल्ला झालेल्या शहरात झाली.या दहशतवादी हल्ल्याला आपण  आज जर्मन बेकरी बाँम्फस्फोट म्हणून ओळखतो.आज या घटनेला १३ वर्षे पुर्ण होत आहे. त्यानिमित्ताने या घटनेत आप्तेष्ट गमवलेल्या, अथवा शाररीक आर्थिक नुकसान झालेल्या सर्वांचा दुःखाप्रकरणी  ह्रुद्यापासून संवेदना.या नंतर पुण्यात  जंगली महाराज रोडवरील छत्रपती संभाजी गार्डन जवळ एक आणि फरासखाना पोलीस स्टेशननजीक एक असे एकूण  दोन बॉम्ब ब्लास्ट झाले मात्र या ठिकाणी खूपच कमी नुकसान झाले जीवितहानी झाली नाही नाही म्हणायला जंगली महाराज रोडवर झालेल्या बॉम्बब्लास्ट मध्ये एका सायकलवर बॉम्ब ठेवणाराच व्यक्ती यात निधन पावला त्या दहशवादी  मांणसाखेरीज अन्य कोणीही या बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडला नाही पुणे शांतच राहिले 
         हा दहशतवादी हल्ला इंडियन मुहाज्जदीन या दहशतवादी संघटनेतर्फे करण्यात आला होता.या बॉम्बब्लास्ट मधील काही आरोपी  महाराष्ट्रातील लातूर शहरातील होते या बॉम्बब्लास्ट मधील  तळातले गुन्हेगार पकडले गेले, त्यांना शिक्षाही झाल्या. मात्र या कटाचे मुख्य सुत्रधार अजूनही मोकाटच फिरत आहे. त्या दोषींना जेव्हा शिक्षा
होईल.तेव्हाच खऱ्या अर्थाने यात होरपळलेल्या व्यक्तींना खरा न्याय देण्यासारखे होईल. मध्यंतरी मी १४ फेब्रुवारीला काही संघटनेकडून प्रेमीवीरांसाठी फटाके फोडण्याच्या आधीच एक दिवस म्हणजे १३ फेब्रुवारीला एका दहशतवादी संघटनेने फोडलेला फटका या अर्थाचे एक व्यंगचित्र या संदर्भात बघितले होते 
      आजमितीस जर्मन बेकरी पुन्हा सुरु झाली आहे. बाँम्बस्फोटानंतर सुमारे तीन वर्ष बेकरी बंद होती.पुण्यात शिकण्यासाठी देशभरातून विद्यार्थी येत आहेत. एका अर्थी सर्वकाही पुर्ववत झाले आहे. त्यावेळेस घोषणा करण्यात आलेल्या सोयी सुविधा काही अंशी  पोलीसांपर्यत पोहोचल्या आहेत. मात्र मुख्य सुत्रधार अजूनही मोकाटच आहे. ते गजाआड होणे अत्यंत आवश्यक आहे.ते लवकरात लवकर गजाआड होतील , अशी मनोकामना करत सध्यापुरते आपली रजा घेतो, जय हिंद 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?