, अर्थव्यववस्था मृतवत तरी राजकीय खेळ संपेचिना .

         ,   

    सध्या आपल्या शेजारील पाकिस्तानमधून येणाऱ्या बातम्या बघतिलयास त्यांचे "अर्थव्यववस्था मृतवत तरी राजकीय खेळ संपेचिना" या एकाच वाक्यात वर्णन करावे लागेल . आकाशाला भेदणारी महागाई हे वर्णन सुद्धा कमी पडेल इतक्या राक्षसी स्थितीवर पोहोचलेली महागाई दिवसागणिक वाढणारे नैसर्गिक इंधनाचे भाव . समोर बंदरात उभ्या असलेल्या कंटनेरमधून दिसत असून देखील त्या परकीय मात्र जीवनावश्यक असणाऱ्या वस्तुंचे मूल्य न चुकल्याने त्या वापरता येत नाहीत परिणामी जीवनवश्यक वस्तूंची अभूतपूर्व टंचाई . हातात पैसे असून देखील ती वस्तू बाजारातच उपलब्ध नसल्याने घेता न आल्याने आलेली हतबलता हे सर्व सामान्य नागरिकांचे चित्र .तर राजकारणी व्यक्ती  मात्र आपण या ग्रहावरचेच नाहीत अश्या अविर्भावात एकमेकांवर करत असलेले प्रसंगी न्यायालयात खटला दाखल करण्याची राजकारणी वृत्ती असे सर्व साधारण चित्र आहे सध्याच्या पाकिस्तानचे 
            आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून  लादण्यात आलेली बंधने पूर्ण करता यावीत यासाठी राष्ट्रपतींच्या सहमतीने १५ फेब्रुवारी रोजी त्यांच्या संसदेत मांडण्यात आलेल्या  मिनी बजेटमुळे तर सर्वसामान्य नागरिकांच्या हालात अजूनच भर पडली आहे पाकिस्तानी पंजाब साठीच्या लाहोर उच्च न्यायालयाने प्रांताच्या राज्यपाल आणि निवडणूक आयोगाला विधानसभेच्या निवडणुकांची तारीख का जाहीर करण्यात येत नाही अशी विचारणा केल्याने आणि
पाकिस्तानमध्ये १९७१ नंतर लागू करण्यात आलेल्या आणि सध्या वर्तमानात कार्यरत असणाऱ्या संविधानुसार विधानसभा विसर्जित झाल्यापासून ९० दिवसात निवडणुका घेण्याचे कायदेशीर बंधन आहे या निवडणुकांच्या तारखा त्या प्रांताच्या राज्यपालांकडून जाहीर करण्यात येतात.  पाकिस्तानी पंजाब आणि खैबर ए पखतनूंवा या प्रांताच्या विधानसभा जानेवारीत विसर्जित झाल्या मात्र अद्याप देखील पाकिस्तानी पंजाब आणि खैबर ए पखतनूंवा या प्रांताच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत या विरोधात विरोधी पक्ष असलेल्या पाकिस्तानी तेहरीके इन्साफ आणि इम्रान खान  यांच्याकडून सात्यत्याने राळ उठवली जात आहे केंद्रीय सत्तेत असलेल्या पाकिस्तानी डेमोक्रेक्तिक मूव्हमेंट या आघाडीतील बहुतेक पक्ष निवडणुकीत सहभाग घेण्यासाठी अनुच्छुक आहेत त्यामुळे निवडणूक होऊच नये यासाठी ते प्रयत्नशील आहेत  गेल्या तीन ते चार महिन्यात ज्या निवडणुका झाल्या त्या मध्ये इम्रान खान यांना मिळणारा पाठिंबा बघता आपले हसे होऊ नये यासाठी हि खेळी सत्ताधिकारी  पक्षाकडून खेळण्यात येत असल्याचा आरोप इम्रान खान यांच्याकडून करण्यात येत आहे स्वतःचे अपयश झाकण्यासाठी बाष्कळ विधानाला देखील गंभीर मानत आमच्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना अटक करण्यात येत आहे
त्यावरच्या उपाय म्हणून २४ तास आधी जाहीर करत आमच्याकडून जेल भरो आंदोलन सुरु करण्यात येईल असे इम्रान खान यांनी जाहीर केले आहे 
         आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी होणारी बोलणी फार काही हाती न येता संपत आहेत त्यामुळे दर फेरीदरम्यान आता तरी काही ठोस हाती येईल ? अशी आस सर्वसामान्य नागरिक लावून बसत आहे मात्र त्याच्या हाती सातत्याने निराशाच पडत असल्याने आणि देशातील प्रमुख राज्य असलेल्या पाकिस्तानी पंजाबमध्ये असणाऱ्या राजकीय अस्थिरतेमुळे , अर्थव्यववस्था मृतवत तरी राजकीय खेळ संपेचिना .असेच खेदाने पाकिस्तानविषयी म्हणावे लागते आहे 
#हि_माझी_करेन्ट_अफेयर_विषयक७८६_वी ब्लॉगपोस्ट_आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?