वंदन महाराष्ट्राच्या आराध्य देवतेला

       


   छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकताच सर्व महाराष्ट्रयीन व्यक्तींची  छाती  गर्वाने फुलूनयेते  छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्य सर्वाना मनःपूर्वक खूप खूप  शुभेच्छा 

        तेराव्या शतकात यादवी साम्राज्य लयास गेल्यावर सुमारे साडेतीनशे वर्ष स्वतःचे सत्व विसरलेल्या समाजास गतवैभवाची आठवण त्यांनी करुन दिली .त्याचबरोबर भविष्याचा वेध घेत , मध्ययुगीन भारतीय ईतीहासातील आरमार उभारणारा एकमेव राज्यकर्ता हा बहुमान देखील मिळवला . राजेंखेरीज समुद्रापर्यत आपले राज्य नेणारे काही राज्यकर्ते आपणास मध्ययुगात सापडतात. मात्र आरमार उभारले ते छत्रपती शिवाजी  महाराजांनी .अजमल कसाब आणि मार्च 1993 च्या स्फोटामुळे समुद्राचा धोका आपणास लक्षात आलाच आहे .  भविष्याकडे डोळसपणे बघण्याची दृष्टी होती . छञपती शिवाजी महाराजांनी हे टोपीवाले दिसतात तेव्हढे साधे नाहीत त्यांचापासून जपून राहिले पाहिजे ,असे इंग्रजांबाबत मत व्यक्त केले होते. आणि या पुढील काळात हल्ले समुद्रामार्गे होतील तिही सिध्दता आपण करायला पाहिजे असेही मत व्यक्त केले होते .इंग्रजांनी केलेले नुकसान सर्वश्रुत आहेच .

      राजांचे कार्य  येव्हढ्यावरच थांबत नाही, त्यांनी स्थानिक जनतेची भाषा हीच राज्यकारभाराची भाषा असावी . यासाठी देखील प्रयत्न केले . त्यासाठी स्वतंत्र्य राज्यकारभार कोष देखील त्यांनी तयार केला . आजदेखील आपण स्थानिक न्यायालयांचा कारभार बहुतांश वेळा इंग्रजी भाषेतून करतो, तो जेव्हा स्थानिकांना समजेल अस्या मराठी भाषेत येईल ,तेव्हाच महाराजांंचे  रयतेच्या राज्याचे स्वप्न  प्रत्यक्षात साकार होईल, असे मला वाटते.महाराज्यांचा काळात सध्या ज्या प्रमाणे इंग्रजी भाषेतील शद्ब मराठीत रुढ होत आहे , त्याप्रमाणे अनेक फारशी शद्ब रुढ होते . महाराजांनी त्या फारशी शद्बांना मराठी प्रतीशद्ब दिले .माझ्या मते हे कार्य पुन्हा एकदा करण्याची नितांत गरज आहे 

     सध्याचा काळात "स्वाँट अँनालाइस्  या संकल्पनेला अनन्य साधरण महत्व आलेले दिसते .छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यया कार्यकाळात याचा अत्यंत खुबीने वापर केल्याचे दिसून येते. प्रतापगडावर  अफजल खानाचा काढलेला कोथळा असो अथवा  गमिनी काव्याचा आपल्या युद्धासाठी केलेला वापर किंवा लाल महालातील शाहिस्तेखानच्या केलेले फजिती. किंवा पुरंदरचा तह ही त्याची काही उदाहरणे.आपले उद्दिष्ट सध्या करताना काही वेळा माघार घ्यावी लागली तर ती पूर्णपणे माघार नसते तर त्यास पुढे मोठी झेप घेण्यासासाठी स्वतःला धनुष्याप्रमाणे मागे ताणणे असते हे आपणस पुरंदरच्या तहातून दिसते या तहात गमावलेले किल्ले राज्यांनी लवकरच स्वराज्यात समाविष्ट करून घेतले . त्याच प्रमाणे मानवी मनाचा देखील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या अभ्यास होता हे त्यांच्या आग्राच्या मोहिमेच्या नियोजनातून स्पष्ट होते . दुष्ट औरंगजेबने कट कारस्थान करून राज्यांना अटक केल्यावर

झालेल्या नाट्यमय वापर केल्याचे आपणास दिसते  मानवी मन एखादी गोष्ट सातत्याने करायला लागल्यास कंटाळते आणि कामात कंटाळा करते रोज करतो एखादेवेळी नाही केले तर काय होऊ शकते असा विचार करून मानवी मन वर्तन करते  या खुबीचा त्यांनी यशस्वीपणे वापर केलेला दिसतो पाठलाग करणाऱ्या शत्रूला कसा चकवा देयचा याचा वास्तुपातच महाराजांनी घालून दिला शत्रूला बेसावध कसे करावे ?हे सुद्धा आपणास महाराज्यांच्या चरित्रातून अभ्यासता येते 

 छत्रपती शिवाजी महाराजांचे अतूलनीय कार्य अतूलनीय आहे. ते एका ब्लॉग पोस्टचा विषय नाहीच, माझा हा छोटासा प्रयत्न होता, तो आपणास आवडला असेलच

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?