श्रीलंका सरकारचा सर्वसामान्याना दरवाढीचा शॉक

         


 सध्या
आपली बहुतांशी माध्यमे पाकिस्तानी सरकारकडून किती मोठ्या विजेच्या दारात वाढ केली आहे याच्या रसभरीत बातम्या देत असताना आपल्या दुसऱ्या शेजारील देशात देखील विजेच्या दारात मोठी वाढ केली आहे आणि तो देश मागच्या वर्षी प्रचंड चर्चेत असणारा श्रीलंका श्रीलंकन सरकारने एक परिपत्रक काढत गुरुवार १६ फेब्रुवारीपासून देशातील विजेच्या दारात ६६ % वाढ केली आहे सरकारला आशा आहे की या निर्णयामुळे संकटग्रस्त श्रीलंकेसासाठी बेलआउट देण्याच्या विचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सहानुभूतीपूर्वक विचार करेल  वीज दरात वाढ झाल्याची घोषणा ऊर्जा आणि ऊर्जा मंत्री कांचना विजेसेक्रा यांनी केली. मागच्या वर्षी आर्थिक संकटाच्या अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगी  या दरात ७५ टक्क्यांनी वाढ केली होती 

      या दरवाढीमुळे . प्राप्तिकर 36 टक्के इतका जास्त असणाऱ्या श्रीलंकेत सर्वसामान्य नागरिकांच्या त्रासात भर पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे आम्हाला सर्व भर जनतेवर टाकण्याची मुळीच इछा नाही मात्र उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायाचा विचार करता या खेरीज आमच्याकडून कोणतंही व्यवहार्य ठरेल अशा उपाय नव्हतआम्ही मोठ्या अनिच्छेने ही वाढ केली आहे असे त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले नवीनतम दरवाढीचे

उद्दिष्ट ऊर्जा मंत्रालयाला जानेवारीमध्ये सरकारी अनुदाने बंद केल्यामुळे झालेल्या महसुलातील घट भरून काढण्यास मदत करणे आहे. ते पुढे म्हणाले की दरवाढीमुळे मंत्रालयाला दीर्घकालीन इंधन करार व्यवस्थापित करण्यात मदत होईल.असेही त्यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले

        सात दशकांतील सर्वात वाईट आर्थिक संकटावर मात करण्यासाठी IMF ने सप्टेंबरमध्ये श्रीलंकेला अब्ज ९० कोटी अमेरिकी डॉलरचे कर्ज देण्याचे मान्य केले, परंतु करारामध्ये कर वाढवणे, सबसिडी काढून टाकणे आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्ज कमी करणे समाविष्ट आहे ज्यानुसार श्रीलंकन सरकार विविध अनुदाने कमी करत आहे त्याच मालिकेत जानेवारीत ऊर्जा मंत्रालयाला देण्यात येणारी मदत थांबवण्यात आली त्यामुळे हि दरवाढ करण्यात येत आहे ,सध्या पाकिस्तानविषक बातम्यांमध्ये सातत्याने पाकिस्तान श्रीलंकेच्या वाटेने जात असल्याचे सांगण्यात येत आहे मागील वर्षी साधारण याच काळात आपण श्रीलंकन जनतेच्या आंदोलनाची विविध दृश्ये टीव्हीवर बघितली होती त्या पार्श्वभूमीवर त्यांची सध्याची स्थिती पाकिस्तानची भविष्यातील वाटचाल कुठे होईल याचा अंदाज बांधण्यासासाठी अत्यावश्यक आहे 

श्रीलंका आता मोठ्या प्रमाणात आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत मिळवत आहे आणि हि मदत सातत्याने मिळावी यासाठी विविध सरकारी अनुदाने पूर्णतःरद्द करत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहे जे तो जास्त चीनवर  अवलूंबून नसल्याने भारतासाठी आशादायक आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?