राजकीय अस्थिरतेच्या नव्या चक्रव्यूहात पाकिस्तान


सध्या पाकिस्तानातून येणाऱ्या बातम्या बघितल्या तर "राजकीय अस्थिरतेच्या नव्या  चक्रव्यूहात पाकिस्तान" असेच म्हणावे लागेल . केंद्रीय सत्त्तेत सहभागी असणाऱ्या पाकिस्तान डेमोक्रेक्तिक मूव्हमेंट या आघाडीतील पक्ष आपल्याला असणाऱ्या अधिकाराचा गैरफायदा घेत पाकिस्तानी पंजाब आणि खैबर ए पख्तुन्वा या प्रांताच्या विधानसभेच्या निवडणुकेच्या तारीख जाहीर करत नसताना कोणाच्या ध्यानीमनी नसताना पाकिस्तानी राष्ट्रपतींनी पाकिस्तान निवडणूक कायदा २०१९ द्वारे मिळलेल्या  अधिकाराच्या वापर करत या निवडणूका  २० फेब्रुवारी जाहीर केल्या आहेत . त्यांना या प्रकारे निवडणुका जाहीर करण्याचा अधिकार खरच आहे का ? यावरून पाकिस्तानमध्ये दोन गट पडले आहेत त्याचप्रमाणे पाकिस्तानी निवडणूक आयोगाच्या कार्यलयासमोर केलेल्या आंदोलनांसाठी दाखल केलेल्या खटल्यात इम्रान खान यांना  ३ मार्चपर्यंत अटकपूर्व जामीन मिळाल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे २२ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या जेलभरो आंदोलनाला सुरवात होण्याच्या आधीच मिळत असणारा प्रतिसाद बघता   "राजकीय अस्थिरतेच्या नव्या  चक्रव्यूहात पाकिस्तान" असेच म्हणावे लागेल 

एकीकडे राजकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात गोंधळाची स्थिती असताना पाकिस्तानची स्वतःचीच निर्मिती असलेली तालिबांकडून पाकिस्तानमध्ये होणारे दहशतवादी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणत वाढ झाली आहे देशातील सर्वात मोठे शहर जे देशाची आर्थिकराजधानी आहे अश्या कराची शहराच्या पोलीस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला करण्यापर्यंत त्य्याची मजल गेली आहे त्याचा आधी खैबर ए पख्तुन्वा  या प्रातांच्या राजधानीत अर्थात पेशावर या शहारत पोलीस मुख्यालयाच्या जवळ असणाऱ्या मशिदीत

बॉम्बस्फोट झाला होता त्याच्या आधी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद या शहरात मोठ्या हल्ल्यात तयार असलेल्या दहशतवाद्यांना अटक करण्यात आले होते मात्र या बरोबरच ढासळती अर्थव्यवस्था यामुळे केंद्रीय सत्तेच्या विरोधात जाणारे जनमत त्यामुळे सत्ता टिकावी यासाठी अधिकाराचा पुरेपूर्ण काही वेळा गैरवापर करत विरोधी पक्षाला नामोहरण करण्याचे प्रयन्त आणि या प्रयत्नाच्या विरोधात लढत पाकिस्तानी नागरिकांपर्यंत पोहोचण्याचचे इम्रान खान याचे प्रयत्न हे चित्र आहे पाकिस्तानच्या सध्याच्या राजकारणाचे

पाकिस्तानमधून फुटून बांगलादेश निर्माण झाला त्यावेळी सुद्धा पाकिस्तानमध्ये राजकीय पेचप्रसंग झाला होता हे आपण लक्षात घेतले तर या पराकोटीला पोहोचलेल्या सध्याच्या राजकारणाची स्थिती समजू शकते बलुचिस्तानची स्वातंत्र्यलढ्याला सध्या मिळणारे यश ,  खैबर ए पख्तुन्वा या प्रांतात   तेहरीके तालिबान पाकिस्तान च्या वाढत्या कारवाया बघता सध्याच्या काळ पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाचा आहे पाकिस्तान एकाच वेळी आर्थिक प्रश्न , राजकीय स्थिरता आणि वाढत्या दहशतवादी कारवाया या प्रशांवर लढत आहे

आपल्या हिंदू पुराणात महिषासूरची गोष्ट सांगण्यात आली आहे ज्यामध्ये देवीशी लढताना 

महिसासुराच्या  जमिनावर पडणाऱ्या रक्तापासून पुन्हा नवा महिषासुर निर्माण होऊन तो देवीशी लढत असे सांगण्यात येत आहे सध्याच्या काळाचा विचार करता आपल्या भारतासासाठी पाकिस्तान हा महिसासुरच आहे ज्याचे जितके तुकडे होतील तितके पाकिस्तान आपल्याशी लढतील  त्यामुळे  भारताला त्रास देण्याइतका शक्तिशाली नाही आणि फुटून जाईल इतका कमकुवत देखील नाही अशा पाकिस्तान आपल्यसासाठी महत्वाचा आहे त्यातच भारतचे हित आहे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?