भारत जगातील उभारती महासत्ता


भारत आगामी काळातील उभारतीम महासत्ता आहे याचा प्रत्यय सध्या वारंवार येत आहे दक्षिण अमेरिका ,ओशियाना आफ्रिका मध्यपूर्व आशिया , मध्य आशिया .युरोप आदी जगाच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे भारतात वाढलेले दौरे याचीच साक्ष देतात . गेल्या व ते अडीच वर्षांपासून असा एखादाच आठवडा असेल ज्यावेळी भारतात कोणत्यातरी देशाचे राष्ट्रप्रमुख आले नाहीत . किंवा भारताच्या परराष्ट्रमंत्री ,सरंक्षण मंत्री अन्य कोणत्यातरी देशांच्या अधिकृत दौऱयावर गेले नाहीत जगातील दोन देशातील संबंध हे फक्त आणि फक्त फायद्यावर चालतात आपला फायदा असल्याशिवाय कोणताही देश दुसऱ्या देशाबरोबर परोपकारी भूमिकेतून संबंध प्रस्थापित करत नाही याचा विचार करता जगात बळकट झाल्याचे दिसून येत आहे आणि हेच स्थान अजून बळकट कारण्यासासाठी चेक रिपब्लिकन या मध्य युरोपातील भूवेष्टित देशाचे परराष्ट्र मंत्री जॅन लिपावस्की २६ फेब्रुवारी-ते १  मार्च  दरम्यान भारताला अधिकृत दौऱ्यावर  येणार आहेत. त्यांच्यासमवेत संसद सदस्य, विज्ञान, संशोधन आणि नवोपक्रम विभागाचे उपमंत्री आणि उच्चस्तरीय अधिकारी आणि व्यावसायिक शिष्टमंडळ असेल

 .चेक रिपब्लिक आणि भारत यांच्यातील संबंध मध्ययुगापासून आहेत याकाळी दोन्ही देशांमध्ये मसाले आणि अन्य मूल्यवान वस्तूंच्या व्यापार होत असे चेक रिपब्लिक मधील सर्वात प्राचीन विद्यापीठ असलेल्या Charles University मध्ये संस्कृत भाषा जाणणारे अनेक व्यक्ती असल्याचे दाखले मिळाले

आहेत युरोपीय देशाना  भारताच्या संस्कृतीची माहिती होण्याच्या क्रियेमध्ये चेक रिपब्लिकन या देशातील नागरिकांचा मोठा सहभाग आहे . स्वातंत्र्यपूर्व भारतात मुबईमध्ये आणि कलकत्ता शहरात त्यांनी वकिलात स्थापन केली होती भारतातील सुप्रसिद्ध बूट आणि चप्पल निर्मिती कंपनी बाटा हि कंपनी मुळातील चेक रिपब्लिकन देशातील आहे भारताच्या प्रगतीत या देशाचे मोठे योगदान आहे १९६६ साली या देशाने शांततेच्या मार्गाने आण्विक तंत्रज्ञाच्या मदतीने विकास करता यावा यासाठी तसेच १९७३ साली शास्त्रीय तांत्रिक औद्योगिक सहकार्याबाबतचा आणि १९७८ साली समुद्री वाहतुकीविषयीविषयीचे नियमन करण्याबाबतचा करारा भारत आणि चेक रिपब्लिक या दरम्यान करण्यात आला आहे याखेरीज २००३ साली सरंक्षण विषयक सामुग्रीविषयक तसेच अन्य काही व्यापार वाढवण्याविषयीचे करार दोन देशात झाले आहेत 

  चेक रिपब्लिक या देशचे मंत्री जॅन लिपावस्की यांच्या भारत दौऱ्यात ते भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर पयांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतीलया चर्चेत दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधा आणि  परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा समावेश असेल . CII द्वारे २८  फेब्रुवारी  रोजी आयोजित भारत-EU व्यवसाय आणि शाश्वतता कॉन्क्लेव्हच्या उद्घाटन सत्रात परराष्ट्र मंत्री लिपावस्की देखील उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते त्याच दिवशी मुंबईला जातील आणि१ र्च  रोजी 

मुंबईहून स्वतःच्या देशात जातील परराष्ट्र मंत्री लिपावस्की यांची भेट जून २०२२ मध्ये डॉ. एस. जयशंकर यांच्या झेक प्रजासत्ताकच्या भेटीनंतर आहे जिथे त्यांनी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली होती. जानेवारी२०२३ मध्ये ऑस्ट्रिया दौऱ्यादरम्यान या दोन्ही मंत्र्यांची अलीकडेच व्हिएन्ना येथे भेट झाली होती.चे रिपब्लिकचे परराष्ट्र मंत्री परराष्ट्र मंत्री लिपावस्की यांच्या भेटीमुळे चेक प्रजासत्ताकसोबत भारताच्या द्विपक्षीय संबंधांना आणखी गती मिळण्याची अपेक्षा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?